इस्लामी विचारसरणीमुळेच जर्मनीतील ख्रिसमस मार्केट बंद!" अमेरिकेच्या गुप्तचर प्रमुख तुलसी गॅबार्ड यांचे खळबळजनक विधान ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया)
Tulsi Gabbard AMFEST 2025 speech latest : अमेरिकेच्या (America) नॅशनल इंटेलिजन्सच्या नवनियुक्त संचालक तुलसी गॅबार्ड (Tulsi Gabbard) यांनी ‘अमेरिकाफेस्ट’ (AMFEST) या परिषदेत बोलताना एका अत्यंत संवेदनशील विषयावर हात घातला आहे. “जगातील अनेक देशांमध्ये सध्या भीतीपोटी ख्रिसमसचे सण रद्द केले जात आहेत, हे कशाचे लक्षण आहे?” असा सवाल उपस्थित करत त्यांनी इस्लामी विचारसरणीवर जोरदार हल्ला चढवला आहे. त्यांच्या या विधानाने जागतिक राजकारणात आणि सुरक्षा यंत्रणांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.
ख्रिसमसचा सण जवळ येत असताना जर्मनीतील अनेक प्रसिद्ध ख्रिसमस मार्केट्स सुरक्षेच्या कारणास्तव रद्द करण्यात आली आहेत. यावर भाष्य करताना तुलसी गॅबार्ड म्हणाल्या की, ही केवळ एका देशाची समस्या नाही, तर इस्लामी विचारसरणीमुळे निर्माण झालेला हा एक आंतरराष्ट्रीय धोका आहे. सण-उत्सवांच्या काळात होणारे संभाव्य हल्ले आणि वाढता कट्टरतावाद यामुळे पाश्चात्य जगातील सांस्कृतिक स्वातंत्र्य धोक्यात आले असल्याचे त्यांनी नमूद केले.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Epstein Files : जेफ्री एपस्टाईनशी संबंधित किमान 16 फायली गहाळ! 24 तासांत ट्रम्पचे फोटोही डिलीट; अमेरिकेत तुफान गदारोळ
तुलसी गॅबार्ड यांनी आपल्या भाषणात एक महत्त्वाचा फरक स्पष्ट केला. त्या म्हणाल्या, “इस्लामवादाकडे केवळ धर्म म्हणून पाहणे चुकीचे आहे. ही एक प्रबळ राजकीय विचारसरणी आहे.” गॅबार्ड यांच्या मते, या विचारसरणीमध्ये वैयक्तिक स्वातंत्र्य, महिलांचे हक्क आणि नागरी स्वातंत्र्याला कोणताही वाव नाही. ही विचारधारा अमेरिकेच्या संविधानातील ‘स्वातंत्र्य’ या मूळ पायाशी पूर्णपणे विसंगत आहे. अमेरिकेत स्वातंत्र्याचा स्रोत सरकार नाही तर ‘देव’ आहे, ही श्रद्धा या विचारसरणीमुळे धोक्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.
TULSI GABBARD at AmFest: “The threats from this Islamist ideology come in many forms. As we approach Christmas, right now in Germany they are canceling Christmas markets because of this threat.” “When we talk about the threat of Islamism, this political ideology, there is no… pic.twitter.com/jOf3O3l05D — Fox News (@FoxNews) December 21, 2025
credit : social media and Twitter
गॅबार्ड यांनी केवळ युरोपच नव्हे तर अमेरिकेतील परिस्थितीवरही चिंता व्यक्त केली. त्यांनी न्यू जर्सीमधील पॅटरसन शहराचे उदाहरण दिले, जे स्वतःला “पहिले मुस्लिम शहर” म्हणून अभिमानाने मिरवते. तिथे स्थानिक पातळीवर इस्लामिक तत्त्वे लादण्याचे प्रयत्न सुरू असल्याचा दावा त्यांनी केला. तसेच ह्यूस्टनसारख्या मोठ्या शहरांमध्येही शरिया कायदा लागू करण्यासाठी कायदेशीर आणि राजकीय मार्गांनी हालचाली सुरू आहेत, असा इशारा त्यांनी दिला आहे. हा धोका भविष्यातील नसून तो आता आपल्या दारात उभा आहे, असे त्यांनी निक्षून सांगितले.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : ‘ती’ अफवाच निघाली खोटी,ज्यामुळे DeepuDas बनला जमावशाहीचा बळी; Bangladeshमधील मॉब लिंचिंगमध्ये धक्कादायक खुलासा
केवळ अमेरिका किंवा युरोपच नाही, तर ऑस्ट्रेलियातील अलीकडच्या दहशतवादी घटनांचा उल्लेख करत त्यांनी स्पष्ट केले की, जिथे जिथे इस्लामी विचारसरणीचा प्रभाव वाढत आहे, तिथे तिथली सुरक्षा, समृद्धी आणि शांतता धोक्यात आली आहे. “ऑस्ट्रेलियामधील घटना अनपेक्षित नाहीत, कारण तिथे झालेली घुसखोरी आणि विचारसरणीचा प्रसार हेच त्याचे मूळ आहे,” असे त्या म्हणाल्या. तुलसी गॅबार्ड यांचे हे विधान अशा वेळी आले आहे जेव्हा संपूर्ण जग ख्रिसमस आणि नवीन वर्षाच्या स्वागताची तयारी करत आहे. गुप्तचर विभागाच्या प्रमुख या नात्याने त्यांनी केलेले हे दावे आगामी काळात आंतरराष्ट्रीय सुरक्षा धोरणांमध्ये मोठे बदल घडवून आणू शकतात.
Ans: सुरक्षेच्या कारणास्तव जर्मनीतील ख्रिसमस मार्केट रद्द होण्यामागे इस्लामी विचारसरणीमुळे निर्माण झालेला धोका कारणीभूत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
Ans: त्यांच्या मते ही एक राजकीय विचारसरणी आहे जी वैयक्तिक स्वातंत्र्य आणि अमेरिकन लोकशाही मूल्यांच्या पूर्णपणे विरोधात आहे.
Ans: त्यांनी न्यू जर्सीतील पॅटरसन आणि टेक्सासमधील ह्यूस्टन या शहरांमध्ये शरिया कायद्याचा प्रभाव वाढत असल्याचे उदाहरण दिले.






