बांगलादेशातील मॉब लिंचिंगमध्ये मोठा खुलासा; हिंदू तरुण दीपू दासविरुद्ध ईशनिंदेचा कोणताही पुरावा सापडला नाही ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया)
Dipu Chandra Das lynching evidence update : बांगलादेशातील (Bangladesh) अल्पसंख्याक हिंदू समुदायावर होणाऱ्या अत्याचाराच्या मालिकेतील सर्वात क्रूर घटना म्हणजे मयमनसिंग येथील दीपू चंद्र दास (Dipu Chandra Das) यांची झालेली हत्या. या घटनेने संपूर्ण जगाला हादरवून टाकले होते. सुरुवातीला ईशनिंदेचा (धार्मिक भावना दुखावल्याचा) आरोप करून जमावाने हे कृत्य केल्याचे सांगितले जात होते. मात्र, आता बांगलादेशच्या सुरक्षा दलांनी (RAB) केलेल्या अधिकृत तपासात या हत्येमागील एक अत्यंत भयानक आणि संतापजनक वास्तव समोर आले आहे. दीपू दास यांच्यावर करण्यात आलेले सर्व आरोप पूर्णपणे निराधार आणि खोटे असल्याचे सिद्ध झाले आहे.
RAB-14 चे कंपनी कमांडर मोहम्मद समसुझमान यांनी या प्रकरणाचा अधिकृत तपास अहवाल उघड केला आहे. तपास पथकाने दीपू दास यांचे फेसबुक अकाउंट, व्हॉट्सॲप चॅट्स आणि सर्व सोशल मीडिया ॲक्टिव्हिटीची कसून तपासणी केली. मात्र, कोणत्याही प्लॅटफॉर्मवर धार्मिक अपमान किंवा आक्षेपार्ह मजकूर सापडलेला नाही. विशेष म्हणजे, ज्या जमावाने “अल्लाहु अकबर” च्या घोषणा देत दीपूला जिवंत जाळले, त्यापैकी एकाही व्यक्तीने दीपूला कधीही अनुचित बोलताना प्रत्यक्ष ऐकले नव्हते. हा केवळ अफवेच्या जोरावर केलेला हत्याकांड होता.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Epstein Files : जेफ्री एपस्टाईनशी संबंधित किमान 16 फायली गहाळ! 24 तासांत ट्रम्पचे फोटोही डिलीट; अमेरिकेत तुफान गदारोळ
तपासातील सर्वात धक्कादायक बाब म्हणजे ही हत्या पूर्वनियोजित कट वाटत आहे. १८ डिसेंबरच्या रात्री दीपू दास ज्या कपड्याच्या कारखान्यात काम करत होते, तिथेच त्यांच्या एका मुस्लिम सहकाऱ्यासोबत त्यांचा वाद झाला होता. हा वैयक्तिक राग काढण्यासाठी त्या सहकाऱ्याने दीपूवर ईशनिंदेचा खोटा आरोप केला. परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे पाहून कारखाना प्रशासनाने कारखान्याचे नुकसान टाळण्यासाठी दीपूला चक्क कारखान्याच्या आवाराबाहेर काढून दिले. बाहेर दबा धरून बसलेल्या हिंसक जमावाने दीपूला गाठले, त्यांची निर्घृण हत्या केली आणि मानवी क्रूरतेचा कळस गाठत त्यांचा मृतदेह झाडाला लटकवून पेटवून दिला.
Moments before the lynching- video of #DipuChandraDas from the factory. Evidence suggests the dispute was over money owed, not blasphemy.
The blasphemy charge appears to be fabricated after the killing. A Hindu man lynched, and a false narrative built to justify mob violence.… pic.twitter.com/gr5ZpCTfGR — The Alternate Media (@AlternateMediaX) December 20, 2025
credit : social media and Twitter
या हत्येचा अंगावर शहारे आणणारा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर जगभरातून टीका झाली. त्यानंतर बांगलादेशी पोलिसांनी कारवाईचा वेग वाढवला आहे. एएसपी मोहम्मद अब्दुल्ला अल मामून यांनी सांगितले की, सुरुवातीला दोन जणांना अटक करण्यात आली होती, मात्र आता अटकेतील लोकांची संख्या ७ वर पोहोचली आहे. पोलीस आता व्हिडिओ फुटेज वापरून जमावातील इतर लोकांची ओळख पटवत आहेत. या कटाचा मुख्य सूत्रधार कोण होता, याचा शोध घेण्यासाठी आणखी तीन संशयितांची कसून चौकशी केली जात आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Bangladesh Violence: हिंदू तरुणाच्या लिंचिंग प्रकरणी 10 जणांना अटक; भारतीय उच्चायुक्तालयात सुरक्षा व्यवस्था वाढवली
या घटनेमुळे आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघटनांनी बांगलादेशमधील ‘जमावशाही’वर (Mobocracy) तीव्र चिंता व्यक्त केली आहे. ‘कोअॅलिशन ऑफ हिंदूज ऑफ नॉर्थ अमेरिका’ (CoHNA) ने जागतिक माध्यमांच्या मौनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. हिंदू संघटनांच्या मते, बांगलादेशात वैयक्तिक स्वार्थ साधण्यासाठी आणि हिंदूंचे अस्तित्व संपवण्यासाठी ‘ईशनिंदा’ हा एक सोयीस्कर शस्त्र म्हणून वापरला जात आहे. भारतातही या घटनेचे तीव्र पडसाद उमटले असून, बांगलादेशातील हिंदूंना संरक्षण देण्याची मागणी जोर धरत आहे.
Ans: दीपू दास यांच्यावर ईशनिंदा (Blasphemy) आणि धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप कारखान्यातील सहकाऱ्याने केला होता.
Ans: नाही, RAB-14 च्या तपासात असे स्पष्ट झाले आहे की दीपू दास यांच्या सोशल मीडिया किंवा वागण्यात ईशनिंदेचा कोणताही पुरावा मिळालेला नाही.
Ans: पोलिसांनी आतापर्यंत ७ जणांना अटक केली असून ३ संशयितांची चौकशी सुरू आहे.






