फोटो सौजन्य: सोशल मीडिया
वॉश्गिंगटन: अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकी अवघ्या पाच दिवसांवर येऊन राहिल्या आहेत. या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या तोंडावर देशातील राजकीय तापमान वाढत चालले आहे. डेमोक्रॅटिक पक्षाचे नेते राष्ट्राध्यक्ष जो बायडेन आणि रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांच्यातील शब्दयुद्ध चांगलेच तीव्र झाले आहे. मीडिया रिपोर्टनुसार एका प्रचार रॅलीदरम्यान बायडेन यांनी ट्रम्पच्या समर्थकांवर कडवट टीका केली होती.
कचरा ट्रक चालवून डोनाल्ड ट्रम्प यांने बायडेन यांना चोख प्रतुयत्तर
त्यानंतर या टीकेचे प्रत्युत्तर देण्यासाठी ट्रम्प यांनी ‘कचरा ट्रक’द्वारे अनोख्या पद्धतीने आपला निषेध दर्शवला. बायडेन यांनी आपल्या भाषणात ट्रम्प समर्थकांवर टिका करताना त्यांची तुलना “कचऱ्याशी केली होती. यावर प्रतिक्रिया देत, डोनाल्ड ट्रम्प यांनी विस्कॉन्सिन येथील प्रचार रॅलीसाठी स्वतः कचऱ्याचा ट्रक चालवत आले. बांधकाम जॅकेट घालून ट्रकवर बसून ट्रम्प यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी डोनाल्ड ट्रम्प यांनी बाडेन यांच्या विधानाचा निषेध केला. त्यांनी पत्रकारांना विचारले, “माझा कचरा ट्रक कसा वाटला? हा ट्रक कमला हॅरिस आणि जो बायडेन यांना समर्पित आहे,” असे म्हणत ट्रम्प यांनी बायडेनवर पलटवार केला.
हे देखील वाचा- कमला हॅरिस की डोनाल्ड ट्रम्प, कोण मारणार बाजी? सर्वेक्षणातून आले समोर
बायडेन यांचे विधान “अमानवीय”
बाडेन यांची टीका त्यांच्या समर्थकांमध्ये तीव्र प्रतिक्रिया निर्माण करणारी ठरली. प्रचार सभेत त्यांनी पोर्तो रिकोला कचऱ्याचे तरंगणारे बेट म्हणणाऱ्यांवर टीका केली. यावर ट्रम्प यांनी हा मुद्दा उचलून धरत बायडेन यांची टीका 2016 मध्ये हिलरी क्लिंटन यांनी ट्रम्प समर्थकांविषयी केलेल्या “दुःखदायक” विधानाशी तुलना केली. बायडेन यांच्या विधानाचा निषेध करत रिपब्लिकन सिनेटर मार्को रुबिओ यांनी पेनसिल्व्हेनियातील ट्रम्प समर्थकांसमोर या विषयावर भाष्य केले. ट्रम्प यांच्या प्रचार रॅलीतही या मुद्द्यावर जोरदार चर्चा झाली. ट्रम्प यांनी बायडेन यांचे विधान “अमानवीय” असल्याचे म्हटले.
हे देखील वाचा- भारत-चीनच्या ‘LAC’ कराराचे अमेरिकेने केले स्वागत; आपली भूमिकाही मांडली
कमला हॅरिस 1 टक्क्याने डोनाल्ड ट्रम्प यांच्या पुढे
मीडिया रिपोर्टनुसार, कमला हॅरिस 1 टक्क्याच्या आघाडीसह ट्रम्प यांच्या पुढे आहेत. या सर्वेक्षणात 44 टक्के जनता हॅरिस यांना मत देण्याच्या विचारात असल्याचे दिसून आले, तर 43 टक्के लोक ट्रम्प यांना मत देण्याची शक्यता आहे. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुका 5 नोव्हेंबरला होणार आहेत. या निवडणुकीत कमला हॅरिस व डोनाल्ड ट्रम्प यांच्यातील ही तीव्र निवडणूक लढत अपेक्षित आहे. या निवडणुकीत, या तीव्र शब्दयुद्धाने उमेदवारांचे समर्थक चांगलेच एकत्र आले असून, दोन्ही पक्षांनी आपल्या प्रचारात अधिक जोर वाढवला आहे.