इराण व अमेरिकेमधील संघर्ष वाढला (फोटो- सोशल मीडिया)
अमेरिका-इराणमध्ये कोणत्याही क्षणी युद्ध सुरू होण्याची शक्यता
कतारमधील एअरबेस केला जातोय रिकामा
अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला गंभीर धमकी
World War 3: गेल्या काही दि वसांपासून अमेरिका आणि इराणमधील संघर्ष शिगेला पोहोचला आहे. दोन्ही देशांमध्ये कोणत्याही क्षणी युद्ध भडकण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला थेट धमकी दिली आहे. इराणच्या खामेनेई सरकारविरोधी आंदोलनाने तीव्र रुप धारणे केले आहे. त्यातच आता तेहरानने अमेरिकेच्या प्रादेशिक तळांवर हल्ला करण्याची धमकी दिली आहे.
अमेरिकेच्या प्रादेशिक तळांवर हल्ला करण्याचा इशारा देण्यात आला आहे. कतारमध्ये अमेरिकेचा एअरबेस आहे. त्या एअरबेसमधून अमेरिकेने आपल्या कर्मचाऱ्यांना बाहेर काढण्यास सुरुवात केली आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला धमकी दिली असतानाच अमेरिकेने पाऊल उचलले आहे.
अल उदेद एअरबेसवरील कर्मचाऱ्यांना माघार घेण्याच्या सूचना अमेरिकेने केल्या आहेत. हा निर्णय तेहरानने हल्ल्याची धमकी दिल्यानंतर घेण्यात आला आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला गंभीर परिणाम सहन करण्याची धमकी दिली आहे. इराणने लोकांना फाशी झाली तर, तुम्ही कल्पना केली नसेल अशी शिक्षा भोगावी लागेल असा इशारा ट्रम्प यांनी इराणला दिला आहे.
Iran Protest 2026: जग संपणार? इराणचा नाश निश्चित; ‘Wing Of Zion’ इस्त्रायलबाहेर, विषय काय?
इराणचा नाश निश्चित; ‘Wing Of Zion’ इस्त्रायलबाहेर
पंतप्रधान नेतन्याहूंचे विमान अचानक इस्त्रायलबाहेर गेल्याने इराण इस्त्रायलवर हल्ला करणार अशी देखील चर्चा सुरू झाली आहे. या विमानाने दक्षिण इस्त्रायलच्या एअर फोर्स बेसवरून उड्डाण केल्याचे समोर आले आहे. याआधी देखील तणावाचे वातावरण असताना हे विमान इस्त्रायलच्या बाहेर गेले आहे. जेव्हा-जेव्हा इराणविरुद्ध संघर्ष तीव्र होतो, तेव्हा हे विमान इस्त्रायलच्या बाहेर पाठवले जाते.
13 एप्रिल 2024 मध्ये देखील इराणने मिसाईल हल्ला केल्यावर ‘विंग ऑफ जायन’ हे विमान इस्त्रायलबाहेर पाठवण्यात आले होते. हे विमान ज्या एअरबेसवर असते, तोच एअरबेस इराणने लक्ष्य केला होता. त्यानंतर 13 जून रोजी इस्त्रायलने इराणच्या अण्वस्त्र ठिकाणांवर हल्ला केला होता. त्यानंतर काही वेळाने हे विमान इस्त्रायलच्या बाहेर गेले होते.
इराणमधील परिस्थिती बिकट
इराणमधील परिस्थितीत सध्या बिकट होत चालली आहे. इराणच्या खामेनेई सरकारविरोधी आंदोलनाने तीव्र रुप धारणे केले आहे. निदर्शने अधिक हिंसक झाली आहे. यामुळे प्रचंड अस्थिरतेचे वातावरण पसरले आहे. या निदर्शनांमध्ये आतापर्यंत २००० लोकांचा मृत्यू झाल्याचे आणि अनेजण जखमी झाल्याचे समोर आले आहे. याच वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर भारताने आपल्या नागरिकांसाठी महत्त्वपूर्ण सूचना जारी केल्या आहेत.






