अंतराळवीर Sunita Williams यांना किती मिळतो पगार? किंमत वाचून व्हाल थक्क
फक्त आठ दिवसांच्या अंतराळ मोहिमेवर गेलेले मूळ भारतीय वंशाच्या अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि बूच विल्मोर यांना तांत्रिक अडचणींमुळे आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर (आयएसएस) अडकून पडावे लागले.
फक्त आठ दिवसांच्या मोहिमेसाठी नासकडून बूच विल्मोर आणि भारतीय वंशाच्या अंतराळवीर सुनीता विलियम्स यांची निवड करण्यात आली होती. पण जेव्हा ही मोहीम सुरु झाली तेव्हा अचानक काही तांत्रिक अडचणींमुळे या दोन्ही अंतराळवीरांना आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानक म्हणजेच आयएसएसवर अडकून पडावे लागले. यानंतर हे अंतराळवीर पुन्हा पृथ्वीवर येणार का? असे प्रश्न विचारले जाते होते. पण आज सर्वांनाच या प्रश्नाचे उत्तर मिळाले आहे.
Sunita Williams Story: बनायचं होतं डॉक्टर, झाल्या आंतराळवीर…; कसं होतं सुनीता विल्यम्सचं आयुष्य?
खरंतर नऊ महिन्यांहून अधिक काळ उलटला होता दोन्ही अंतराळवीरांना अडकून. अशावेळी त्यांना पुन्हा पृथ्वीवर आणण्यासाठी स्पेसएक्सच्या ‘ड्रॅगन’ या अंतराळ यानला आयएसएसवर पाठवण्यात आले. याच यानाच्या साहाय्याने सुनीता विलियम्स आणि बूच विल्मोर पृथ्वीवर पोहोचले. तब्बल 287 दिवस सुनीता आणि बुच अडकलेले होते. पण आता दोघे सुखरूप आहे. पण तुम्हाला कधी प्रश्न पडला आहे का की या अंतराळवीरांचा पगार किती असतो? चला याबद्दल जाणून घेऊया.
नासाच्या माजी अंतराळवीर कॅडी कोलमन यांच्या म्हणण्यानुसार, अंतराळवीरांना ‘ओव्हरटाइम’ मिळत नाही. फेडरल कर्मचारी म्हणून त्यांचा अंतराळात जितका वेळ जातो, तो वेळ पृथ्वीवरील सामान्य कामकाजाच्या तासांशी संबंधित मानला जातो. अंतराळातील खाणपिण्याची व्यवस्था आणि खर्च नासा करतो. अंतराळात असताना, त्यांना 347 रुपये प्रतिदिन दैनिक भत्ता दिला जातो.
2010-11 मध्ये कोलमन 159 दिवसांच्या मिशनवर अंतराळ स्थानकावर होत्या. त्याच दरम्यान, त्यांना एकूण 636 डॉलर (55 हजार रुपये) दैनिक भत्ता मिळाला. ह्या हिशोबाने, सुनीता आणि बुच यांना 287 दिवसांसाठी 1,148 डॉलर (एक लाख रुपये) ओव्हरटाइम मिळाले असतील. हे आकडे वर खाली देखील होऊ शकतात.
इस्रायली सैन्याचा पुन्हा विध्वंसक हल्ला; 10 मिनिटांत गाझामध्ये 80 हल्ले, 400 हून अधिक मृत्यू
दोन्ही अंतराळवीरांना जीएस 15 पे ग्रेड दिला जातो, जो फेडरल कर्मचाऱ्यांचा सर्वात वरिष्ठ पे ग्रेड आहे. या ग्रेडनुसार, त्यांना वार्षिक 1 लाख 25 हजार 133 ते 1 लाख 62 हजार 672 डॉलर, म्हणजेच 1.08 कोटी ते 1.41 कोटी रुपये वेतन मिळते. यावरून, 287 दिवसांसाठी त्यांना अंदाजे 81 लाख ते 1.05 कोटी रुपये संभाव्य वेतन मिळू शकते.