अमेरिकेने केली 'या' अत्याधुनिक क्षेपास्त्राची यशस्वी चाचणी; 13 हजार किमीपर्यंतच्या शत्रूला नष्ट करण्याची क्षमता (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
वॉशिंग्टन: अमेरिकेने पुन्हा एकदा संपूर्ण जगाला आपली ताकद दाखवली आहे. 19 फेब्रुवारी ला अमेरिकेने कॅलिफोर्नियात वॅंडेनबर्ग स्पेस फोर्स बेसमध्ये आपल्या Minuteman III या अत्याधुनिक इंटरकॉन्टिनेंटल बॅलिस्टिक मिसाइलची (ICBM) यशस्वी चाचणी केली. या चाचणीचा उद्देश अमेरिकेच्या अणु शस्त्रांच्या सुरक्षा, विश्वासार्हता आणि कार्यक्षमतेचे प्रदर्शन करणे होता.
अमेरिकेने दाखवली ताकद
ही चाचणी अमेरिकेच्या नियमित प्रक्रियेचा भाग असून याआधीही अमेरिका अनेक वेळा यशस्वी चाचण्या करत आलेला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या चाचणीत अमेरिकी हवाई दल आणि वॅंडेनहर्ग स्पेस फोर्स बेसच्या टीमने एकत्रित काम केले. मिसाइलमध्ये कोणतेही शस्त्र नसले तरी त्यावर टेलीमार्ड जॉइंट टेस्ट असेंबली रीएंट्री व्हेइकल लावण्यात आले होते. यामुळे मिसाइलच्या हालचालींवर लक्ष ठेवता आले.
ही चाचणी अमेरिकेच्या अणु धोरमाचा महत्वाचा भाग
अमेरिकेचे कार्यवाहक हवाई दल सचिव गॅरी अॅशवर्थ यांनी जारी केलेल्या निवेदनानुसार, या चाचणीमुळे अमेरिकेच्या न्यूक्लियर डिटेरन्स मिशनवरील विश्वास अधिकच दृढ झाल्याचे सांगितले. तसेच स्पेस लॉन्च डेल्टा 30 चे डेप्युटी कमांडर कर्नल डोरियन हैचर यांनी, या चाचणील अमेरिकेच्या अणु धोरणाचा महत्त्वाचा भाग म्हटले आहे.
त्यांच्या म्हणण्यानुसार, अणु शस्त्रे युद्ध रोखण्यासाठी महत्वाची भूमिका बजावतात. त्यांनी असेही म्हटले की, अमेरिकेच्या शत्रूंनी हल्ला करण्याचा प्रयत्न केला, तर त्यांना मोठे नुकसान सहन करावे लागेल. ही चाचणी अमेरिकेची आणि त्यांच्या मित्र राष्ट्रांची सुरक्षा मजबूत असल्याचे संकेत देते.
काय आहे खासियत?
अमेरिकेचे LGM-30G Minuteman III हे जगातील सर्वात अत्याधुनिक इंटरकॉन्टिनेंटल बॅलिस्टिक मिसाइल आहे. हे मिसाइ आधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज असून आणि अणु हल्ला करण्याची क्षमता बाळगते.
मिसाइची वैशिष्ट्ये
ही चाचणी अमेरिकेच्या संरक्षण क्षमतेचा एक भाग असून, त्यावरून अमेरिकेचा भक्कम राष्ट्रीय सुरक्षा धोरण दिसून येतो.