'अरुणाचल आमचा होता, आहे आणि राहील...'; चीनच्या मनमानीवर भारताचा मात्र ठाम पवित्रा; जरी केला डिमार्च ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया)
Arunachal Pradesh dispute : अरुणाचल प्रदेशातील (Arunachal Pradesh) रहिवासी आणि भारतीय नागरिक पेमा वांगझोम यांना शांघाय विमानतळावर अवघ्या ट्रान्झिटच्या प्रवासादरम्यान जवळपास १८ तास ताब्यात ठेवण्यात आल्याच्या प्रकरणाने भारत–चीन(India-China) तणावाला नवे वळण दिले आहे. लंडनहून जपानला जात असलेल्या पेमांना चीनच्या अधिकाऱ्यांनी त्यांचा भारतीय पासपोर्ट “अवैध” ठरवत थांबवले आणि चौकशीच्या नावाखाली स्वतंत्र कक्षात धरून ठेवले. या धक्कादायक प्रकारानंतर भारताने त्वरित कारवाई करून चीनकडे औपचारिक निषेध अर्थात ‘डिमार्च’ जारी केला. भारताने स्पष्ट इशारा दिला की चीनने वस्तुस्थितीला नकार देऊन वास्तविकता बदलत नाही.
भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी सांगितले की पेमा वांगझोम यांचा पासपोर्ट पूर्णपणे वैध असून त्या कायदेशीररीत्या प्रवास करत होत्या. त्यांचा शांघायमध्ये फक्त तीन तासांचा ट्रान्झिट होता. मात्र, चिनी अधिकाऱ्यांनी त्यांच्या पासपोर्टवर ‘अरुणाचल प्रदेश’ जन्मस्थान नमूद असल्याचे कारण देत त्यांना ताब्यात घेतले. भारताने याला स्पष्ट मनमानी कारवाई ठरवत चीनला कठोर शब्दांत उद्देशून म्हटले की अरुणाचल प्रदेश हा भारताचा अविभाज्य आणि अविभक्त भाग आहे. तेथील प्रत्येक नागरिकाला भारतीय पासपोर्ट बाळगण्याचा आणि जगात कुठेही प्रवास करण्याचा पूर्ण अधिकार आहे.
हे देखील वाचा : Constitution Day 2025 : भारतीय संविधानातील सर्वात शक्तिशाली कलम कोणते? जाणून घ्या त्याची खरी ताकद
भारताच्या म्हणण्यानुसार, चीनची ही कृती आंतरराष्ट्रीय हवाई प्रवास नियमांचेही उल्लंघन करते. कारण चीनच्या स्वतःच्या धोरणानुसार, सर्व देशांच्या नागरिकांना २४ तासांसाठी व्हिसा-मुक्त ट्रान्झिटची परवानगी देण्यात येते. त्यांनी या धोरणालाच हरताळ फासत पेमांना जवळपास १८ तासांसाठी ठेवले. या काळात त्यांना दडपणाखाली प्रश्न विचारले गेले आणि मानसिक त्रासाला सामोरे जावे लागले, असे पेमांनी सोशल मीडियावर सांगितले. तीन तासांचा प्रवास त्यांच्या आयुष्यातील ‘भयानक अनुभव’ ठरला.
Our response to media queries on statements made by the Chinese Foreign Ministry⬇️
🔗 https://t.co/3JUnXjIBLc pic.twitter.com/DjEdy7TmTK — Randhir Jaiswal (@MEAIndia) November 25, 2025
credit : social media
भारताने घटनेची माहिती मिळताच तातडीने पेमाशी संपर्क साधला. यूकेमधील एका मैत्रिणीच्या मदतीने पेमा भारतीय अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचू शकल्या. शांघायमधील भारतीय दूतावास व वाणिज्य दूतावासाने तत्काळ हस्तक्षेप केला आणि रात्री उशिरा त्या चीन सोडण्यात यशस्वी झाल्या. भारताच्या कारवाईने चीनवर दबाव निर्माण झाला असून या प्रकरणावर भारताची भूमिका अत्यंत स्पष्ट आहे की, कोणताही देश अरुणाचलचे अस्तित्व कागदोपत्री बदलून वास्तवावर परिणाम करू शकत नाही.
हे देखील वाचा : Science News: विज्ञानात 100 वर्षानंतर क्रांती! ब्लॅकहोलच्या टक्करीनंतर ऐकू आला ‘रिंगडाउन’ सिग्नल; समजून घ्या यामागील तथ्य
भारताच्या निषेधानंतर चीनचे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते माओ निंग यांनी प्रतिक्रिया देताना पुन्हा दावा केला की ‘झांगनान’ म्हणजेच अरुणाचल प्रदेश हा चीनचा भाग आहे. त्यांनी तपासणी कायदेशीर होती, पेमांना विश्रांती आणि जेवण दिले, असे म्हटले. मात्र पेमा वांगझोम यांच्या प्रत्यक्ष अनुभवाने चीनचे हे दावे फोल ठरत असल्याचे स्पष्ट झाले आहे. भारताने पुन्हा एकदा स्पष्ट केले आहे की चीन कितीही वेळा नकाशे, नावे किंवा राजकीय दावे बदलले तरी अरुणाचल प्रदेश भारताचाच भाग राहणार आहे. आणि तेथील नागरिकांना कोणताही देश अशाप्रकारे त्रास देऊ शकत नाही.
Ans: त्यांच्या पासपोर्टवर अरुणाचल प्रदेश जन्मस्थान असल्याने चीनने तो अवैध ठरवला.
Ans: भारताने तीव्र निषेध नोंदवत औपचारिक ‘डिमार्च’ जारी केला.
Ans: अरुणाचल प्रदेश हा भारताचा अविभाज्य आणि कायदेशीर भाग आहे.






