Year Ender 2025 : चक्रीवादळ, भूकंप ते पूर, भूस्खलनापर्यंत... जगभरात 'या' नैसर्गिक आपत्तींनी केला कहर (फोटो सौजन्य: iStock)
सध्या २०२५ हे वर्ष संपत चालले आहे. दरम्यान या वर्षात जगभरात मानवासाला अत्यंत वेदनादायी प्रवास करावा लागला. हवामन बदलामुळे अनेक नैसर्गिक आपत्तींनी मानवाच्या आयुष्य उथलपुथल करुन टाकले. या नैसर्गिक आपत्तींमुळे अनेक भयावह दृश्ये आपल्याला पाहायला मिलतात. भूकंप, पूर, भूस्खलन, चक्रीवादळामुळे प्रचंड विध्वंस घडला. सेंटर फॉर सायन्स अँड एन्व्हायर्नमेंट आणि डाऊन अर्थ क्लायमेट इंडिया २०२५ ने दिलेल्या अहवालानुसा, भारतात जानेवारी ते सप्टेंबरदरम्यान ९९ टक्के अतिवृष्टी, पूर, उण्षतेची लाट किंवा वादळे यांची नोंद झाली.
Year Ender 2025: या वर्षात नोकरीच्या संधी कुठल्या क्षेत्रात वाढल्या? जाणून घ्या
उत्तराखंडमध्ये पूर आणि भूस्खलन : ऑगस्ट ते सप्टेंबर २०२५ दरम्यान मुसळधार पाऊस, ढगफुटी, पूर, भूस्खलनाची मालिका सुरु होती. देहरादून, गढवाल परिसरात रस्ते, पूल, घरे, यामुळे पाण्याखाली गेले होते. तसेच धाराली, चमोली यांसारख्या जिल्ह्यांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. मोठ्या प्रमाणात जीवतहानी झाली होती. अनेक पर्यंटकही सप्टेंबर दरम्यान चमोलीमध्ये अडकले होते.
आसाम आणि मणिपूर : तर आसाम आणिम मणिपूरमध्ये जून २०२५ मध्ये मुसळाधार पावसामुळे पूर आला होता.
यामुळे सुमारे ८ लोक प्रभावित झाले होते. ब्रम्ह्मपुत्रा, आणि बराकसह अनेक नद्यांची पातळी वाढल्या होत्या. दैनंदिन जीवन विस्कळीत झाले होते. अनेकांचा मृत्यू झाला होता. बराक व्हॅली, दिमा हाओस जिल्ह्यात पूर आणि भूस्खलनामुळे रस्ते रेल्वे वाहतूक ठरप्प झाली होती.
जम्मूतील वैष्णो देवी मार्गावर भूस्खलन : ऑगस्टमध्ये जम्मूतील वैष्णो देवी मार्गावर भूस्खलन आणि ढगफुटीमुळे मोठी जीवितहानी झाली होती. या भूस्खलनात ५ भाविकांचा मृत्यू झाला होता, तर १४ भाविक जखमी झाले होते.
दिल्लीसह अनेक राज्यांमध्ये भूकंप : तसेच जुलै २०२५ दरम्यान दिल्ली आणि आसपासच्या अनेक राज्यांमध्ये भूकंपाचे धक्क जाणवले होते. ४.४ रिश्टर स्केलच्या तीव्रतेचा भूकंप हरियाणातील झज्जरजवळ जाणवला होता. ज्याचे हादरेल दिल्ली-एनसीआरमध्ये बसले होते.
भूकंपाचे धक्के : जागतिक पातळीवर मार्च २०२५ दरम्यान म्यानमारमध्ये ७.७ तीव्रतेचा भूकंप झाला होता. ज्यामुळे २,७०० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला होता. अनेक पायाभूत सुविधा उद्ध्वस्त झाल्या होत्या. पाकिस्तान आणि अफगाणिस्तानच्या सीमेवर देखील ६.० तीव्रतेचा भूकंप झाला होता. यामध्ये देखील मोठ्या प्रमाणात जीवितहानी झाली होती. रशियामध्ये ८.८ तीव्रतेचा भूकंपामुळे त्सुनामीचा धोका वाढला होता.
पूर अन् भूस्खलन, चक्रीवादळ : हवामान बदलामुळे या आपत्ती तीव्र झाल्याा होत्या यामध्ये पूर, अतिउण्षणता, चक्रीवादळ, दुष्काळ यांचा समावेश होता. अमेरिका आणि लॉस एंजेलिसमध्ये वणवे पेटले होते. ज्याचा इतर देशांना फटका बसला होता. ऑक्टोंबरमध्ये चक्रीवादळ मोंथा आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीला धडकले होते. तर डिसेंबरमध्ये दित्वाह चक्रीवादळामुळे श्रीलंकेत प्रचंड पूर आणि भूस्खलन झाले होते. ४०० हून अधक लोकांचा यामध्ये बळी गेला होता.
तसेच व्हिएतनाममध्ये चक्रीवादळ बुआलोई, काजिकी वादळाने चीनच्या हैनान बेटावर, तर रागासा वादळाने हॉंगकॉंग, चीन, तैवान आणि फिलिपाइन्समध्ये प्रंचड विध्वंस घडवला होता. दरम्यान याच वेळी गाझातही संघर्ष सुरु असताना मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे. हजारो लोक बेघर झाले आहेत.






