'ॲमेझॉन ऑटोझ' सेवा (फोटो- ट्विटर)
ऑटोमोबाइल

कार खरेदी करायला शोरूममध्ये जाताय? Amazon Autoz सेवेबद्दल जाणून घ्या, 2027 पासून...

Amazon Autoz: या सेवेच्या मार्फत ग्राहकांना घरबसल्या नवीन आणि जुन्या गाड्यांची मॉडेल्स पाहता येणार आहेत. तसेच किंमतीची तुलना देखील करता येणार आहे.

तेजस भागवत
  • ॲमेझॉनवर कार खरेदी करण्याची सुविधा मिळणार

  • 2027 पासून इंग्लंडमध्ये सुरू होणार सेवा

  • ॲमेझॉन-हयूंदाईने भागीदारी केल्याची माहिती

Amazon Autoz: ग्राहकांना कार खरेद करणे अधिक सोपे व्हावे यासाठी आता काही ऑनलाइन प्लॅटफॉर्म्सने पुढाकार घेतल्याचे दिसून येत आहे. ऑनलाइन शॉपिंग क्षेत्रातील दिग्गज कंपनी ॲमेझॉन आता कार खरेदीच्या-विक्रीत देखील आपले पाय मजबूत करण्याचा प्रयत्न करताना दिसून येत आहे. कंपनीने ब्रिटनमध्ये 'ॲमेझॉन ऑटोझ' सेवा सुरू करण्याच्या निर्णय घेतला आहे.

'ॲमेझॉन ऑटोझ' सेवा 2027 पासून युके म्हणजे इंग्लंडमध्ये सुरू होणार आहे. 'ॲमेझॉन ऑटोझ'च्या माध्यमातून ग्राहकांचा कार खरेदीचा अनुभव अधिक सोपा आणि पारदर्शक करण्याचा कंपनीचा हेतु असणार आहे. या सेवेच्या मार्फत ग्राहकांना घरबसल्या नवीन आणि जुन्या गाड्यांची मॉडेल्स पाहता येणार आहेत. तसेच किंमतीची तुलना देखील करता येणार आहे. ग्राहकांना आपल्या पसंतीची कार ऑनलाइन रिझर्व्ह करता येणार आहे.

Made In India उत्पादनांचा जागतिक डंका! Amazon ची भारतातून E-Commerce निर्यात 27 अब्ज डॉलर्सवर; 2030 पर्यंत 80 अब्ज डॉलर्सचे लक्ष्य

ॲमेझॉन ब्रिटनमध्ये 'ॲमेझॉन ऑटोझ' प्लॅटफॉर्म सुरू करत आहे. त्यासाठी कंपनीने ह्युंदाईला आपला पहिला अधिकृत कार ब्रॅंड पार्टनर म्हणून घोषित केले आहे. या सेवेच्या सुरुवातीच्या टप्प्यात ग्राहकांना ह्युंदाईच्या विविध श्रेणीतील कार्स खरेदीसाठी उपलब्ध होणार असून, त्यामुळे ऑनलाइन वाहन खरेदी क्षेत्रात मोठी स्पर्धा निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

'ॲमेझॉन ऑटोझ'च्या लॉन्चवेळी या प्लॅटफॉर्मवर ह्युंदाईच्या इलेक्ट्रिक (EV), हायब्रिड आणि पेट्रोल कार्सचा समावेश असेल. यामध्ये IONIQ 3, IONIQ 5, KONA, i20 या गाड्यांचा समावेश असणार आहे. नवीन कार्ससोबतच ग्राहकांना जुन्या आणि प्रमाणित कार्स खरेदी करण्याचीही संधी मिळणार आहे. यासाठी ॲमेझॉनने ब्रिटनमधील प्रसिद्ध डीलर ग्रुप 'व्हर्टू मोटर्स'सोवबात भागीदारी केली आहे.

महागड्या SUV कशाला? कमी बजेटमध्ये दमदार टर्बो इंजिन देणाऱ्या या 5 गाड्या पाहाच

ॲमेझॉन कंपनीने आपल्या 'ॲमेझॉन ऑटोझ' या सेवेचा अमेरिकेत मोठ्या प्रमाणात विस्तार केला आहे. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, अमेरिकेत सुरू झालेली ही सेवा अल्पावधीतच १५० हून अधिक शहरांपर्यंत पोहोचली असून, या प्लॅटफॉर्मवर तब्बल ३५ नामवंत कार ब्रँड्सच्या गाड्या करून देण्यात आल्या आहेत.

अमेरिकेतील यशस्वी प्रयोगानंतर आता ब्रिटनमध्ये या सेवेची सुरुवात करणे, हे ॲमेझॉनच्या ऑटोमोबाईल व्यवसायाला आंतरराष्ट्रीय स्तरावर विस्तारण्याचे पहिले आणि महत्त्वाचे पाऊल ठरणार आहे. ब्रिटनमधील ग्राहकांनाही अमेरिकेप्रमाणेच घरबसल्या पारदर्शक पद्धतीने कार निवडण्याची आणि बुक करण्याची सुविधा यामुळे मिळणार आहे. लवकरच त्याचा सर्वत्र विस्तार केला जाऊ शकतो.

ॲमेझॉनने कोणत्या देशात 'ॲमेझॉन ऑटोझ' सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे?

ॲमेझॉनने ब्रिटनमध्ये (UK) 'ॲमेझॉन ऑटोझ' ही कार खरेदी-विक्रीशी संबंधित सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.

ॲमेझॉन ऑटोझ सेवेचा ग्राहकांना काय फायदा होणार आहे?

ॲमेझॉन ऑटोझच्या माध्यमातून ग्राहकांना ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर कार खरेदी करण्याचा पर्याय उपलब्ध होणार आहे.

Pratap Sarnaik: एसटी बसस्थानकांतील अस्वच्छतेवर मंत्र्यांचा संताप; ठाण्यातील तीन बसस्थानकांमध्ये प्रताप सरनाईक यांची पाहणी

मुंबईत ‘MIECA 2026’चे चौथे पर्व दिमाखात संपन्न; शिक्षण-उद्योगातील २०० मान्यवर व संस्थांचा सन्मान

'जडेजा जबरदस्त ऑलराउंडर, पण...' चार वेगवान गोलंदाजांच्या प्लॅनवर बहुतुलेंनी सांगितली Team India ची इनसाइड स्टोरी

Health news: आजारांना दूर ठेऊन आरोग्याची काळजी घेण्यासाठी फुफ्फुसांची काळजी घेणे का गरजेचे बनत आहे?

'या' स्मार्टफोनचा लूक बदलला! 5000mAh बॅटरी, 120Hz डिस्प्ले आणि दोन नवे कलर ऑप्शन्स, काय आहे 5G फोनची किंमत?