उन्हाळ्याच्या वातावरणात बाईक सुरु न होणे ही खूप साहजिक गोष्ट आहे. वाढत्या उन्हात आणि गर्मीमुळे बाईकमधील मशीन खराब होऊन जाते आणि बाईक सुरु करताना चालकाला अडचणी येतात. या वातावरणात जेव्हा मोटारसायकलचे इंजिन ओव्हरहिडिंगने बंद होऊन जाईल आणि बाईक सुरुच होत नसेल तर काय केले पाहिजे याचे काही सोप्पे उपाय आहेत जे तुम्हाला उपयोगी पडतील.
बॅटरी तपासणे
सगळ्यात पहिला चालकाने आपल्या बाईकची बॅटरी तपासून पाहणे गरजेचे आहे. कारण उन्हाळ्याच्या काळात बाईकची बॅटरी ही लवकर खराब होते.
बॅटरी टर्मिनल मधून वैवस्थित साफ करून ठेवून देणे. त्यानंतर बॅटरी टेस्टरमधून नीट तपासून पाहणे जर बॅटरी काही प्रतिक्रिया देत नसेल तर बॅटरी लगेच बदलून टाकणे या गोष्टी महत्वाच्या आहेत.
स्पार्क प्लग आणि एअर फिल्टर
थोड्या थोड्यावेळाने स्पार्क प्लग घाण आणि खराब होऊन जाता. यावेळी त्यांना सारखं सारखं साफ करून त्यांना वैवस्थित वेळेत दुरुस्ती करणे आवश्यक आहे. खराब स्पार्क प्लग हे इंजिन सुरु होण्यासाठी अडथळे आणतात. तसेच एअर फिल्टर इंजिनमधून गरज असताना हवा मिळत नाही त्यामुळे मोटारसायकल किंवा बाईक सुरु करताना अडचण येऊ शकते. म्हणून एअर फिल्टरला वेळेत साफ करा आणि गरज वाटल्यास बदलून घ्या.
हे उपाय करा
वाहन चालवताना इंजिन खूप आधीपासूनच गरम झालेले असते. तसेच या उन्हाळ्याच्या वातावरणात इंजिन मध्ये वाहन चावताना भरपूर अडथळे येतात. त्यामुळे बाईक ही उन्हात पार्क न करता मोकळ्या हवेत किंवा सावलीत पार्क करायला पाहिजे. त्याचबरोबर इंजिन ऑइल आणि कुलेट लेव्हल हे नियमित तपासून घेणे गरजेचे आहे. वायरिंगमध्ये कुठेही लूज झालेले कनेक्शन तुटलेल्या तारा हे तपासून पाहणे. हे सगळं केल्याने तुम्हाला उन्हाळ्यात गाडी चालवताना जास्त अडथळे येणार नाहीत.