ऑटोमोबाइल

होंडा कंपनीने लाँच केली अपडेटेड CB300R बाईक, फिचर्स जाणून घ्या

नवीन होंडा CB300R स्पोर्ट्स रोडस्टरच्या बुकिंगला सुरुवात झाली आहे.

साधना

होंडा (Honda) कंपनीने भारतात आपली अपडेटेड CB300R बाईक लॉन्च केली आहे. या बाईकमध्ये OBD2 नुसार इंजिन देण्यात आले आहे. नवीन होंडा CB300R स्पोर्ट्स रोडस्टरच्या बुकिंगला सुरुवात झाली आहे. या बाईकची किंमत 2.40 लाख (एक्स शोरूम) रुपयांपासून सुरु होते. या बाईकबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात. (New Bike)

कंपनीने लॉन्च केलेल्या अपडेटेड होंडा CB300R मध्ये पॉवर जनरेशनसाठी स्ट्रोक, सिंगल सिलेंडर, लिक्विड कूल्ड टेक्नॉलॉजीवर आधारित 28 सीसीचे इंजिन मिळते. आधीच्या तुलनेत यामध्ये OBD2 चे इंजिन मिळते. यामधील इंजिन 30.7 बीएचपी ताकद आणि 27.5 एनएम टॉर्क जनरेट करते. बाईकचे वजन हे 146 किलोग्रॅम इतके आहे. अपडेटेड मॉडेल हे या सेगमेंटमधील सगळ्यात हलके मॉडेल आहे.

अपडेटेड होंडा CB300R रोडस्टरच्या डिझाइनमध्ये बदल करण्यात आलेला नाही. याच्या लूकबद्दल बोलायचे झाल्यास गोलाकार एलईडी हेडलाइट,  मोठी पेट्रोलची टाकी, स्प्लिट सीट्स देण्यात आले आहे. तसेच डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर आणि एलईडी लायटिंग आणि अन्य फीचर्स या अपडेटेड बाईकमध्ये देण्यात आले आहेत. तसेच नवीन बाईकमध्ये इमर्जन्सी स्टॉप सिग्नल आणि लाइट स्विचसारखे फीचर्सदेखील देण्यात आले आहेत. होंडा CB300R हे अपडेटेड मॉडेल तुम्हाला दोन रंगांमध्ये खरेदी करता येणार आहे. या मॉडेलमध्ये ब्रेकिंगसाठी समोरील बाजूस 296 मिमीचे डिस्क ब्रेक आणि मागील बाजूस 220 मिमीचे डिस्क ब्रेक देण्यात आले आहेत. तसेच यात ड्युएल चॅनेल ABS फिचर देखील देण्यात आले आहे.

वाघोलीत भीषण अपघात; ३ जणांचा मृत्यू, जखमींचाही आकडा समोर

David Beckham : 'बाल विवाह' विरोधात आवाज उठवणाऱ्या आदिवासी तरुणीच्या कामगिरीचे डेविडकडून कौतुक

मराठी दिग्दर्शक सचिन धोत्रेचे सामाजिक पाऊल, 'मिरांडा वॉर्निंग' चित्रपटाचा संपूर्ण नफा दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी

Jhansi Liquor News : पोलिसांनी हातपंप चालवला अन् पाण्याऐवजी दारू वाहू लागली; व्हिडिओ व्हायरल

पहाटेच्या धुक्यात भीषण अपघात, राँग साईडने आलेल्या वाहनाची दुचाकीला धडक; दोन सुरक्षा रक्षकांचा मृत्यू