ऑटोमोबाइल

या 5 बाइक्समध्ये मिळणार भरपूर मायलेज, किंमत 80 हजारांपेक्षा कमी

80 हजार रुपयांपर्यंतच्या बजेटमध्ये उपलब्ध असलेल्या पाच चांगल्या मायलेज देणाऱ्या बाईक्स

सायली ससाणे

रोजच्या जीवन प्रवासासाठी, लोकांना अनेकदा भरपूर मायलेज देणारी बाईक उपलबध पडले. देशात पेट्रोलच्या दराने 100 रुपयांचा टप्पा ओलांडला आहे, त्यामुळे मायलेज चांगले नसेल तर पेट्रोलच्या किमतीत लक्षणीय वाढ होत आहे. आज आम्ही तुम्हाला 80 हजार रुपयांपर्यंतच्या बजेटमध्ये उपलब्ध असलेल्या पाच चांगल्या बाईक मॉडेल्सबद्दल सांगणार आहोत ज्या तुम्हाला अधिक मायलेज देतील आणि जास्त उपयोगी ठरतील.

Honda Livo Drum Price - Honda च्या अधिकृत साइटनुसार, Honda या बाईकची ड्रम वेरिएंटची किंमत 78,500 रुपये (एक्स-शोरूम) आहे. आणि या बाईकची डिस्क व्हेरिएंटची किंमत 82,500 रुपये (एक्स-शोरूम) आहे. Honda ही फक्त एक लिटरमध्ये 74 किलोमीटरपर्यंत धावू शकते.

Bajaj Platina 100 Price - बजाज ऑटोच्या या लोकप्रिय बाइकची किंमत 67,808 रुपये (एक्स-शोरूम) पासून सुरू आहे. या बाईकच्या मायलेजबद्दल बोलायचे झाले तर ही बाईक एक लिटर पेट्रोलमध्ये 70 किलोमीटरपर्यंत धावू शकते.

Hero Splendor Plus Price - Hero MotoCorp च्या या लोकप्रिय बाईकसाठी तुम्हाला रुपये 75,141 (एक्स-शोरूम) तसेच 77986 रुपये (एक्स-शोरूम) खर्च करावे लागतील. हिरो कंपनीची ही बाईक 80 किलोमीटरपर्यंत मायलेज देते. जर तुम्हाला खूप उपयोगी काम असेल तर ही बाईक तुमच्यासाठी योग्य आहे.

TVS स्पोर्ट किंमत - TVS मोटरच्या ही खूप कमी किमतीतील बाईक असून, या बाईकचे दोन मॉडेल आहेत. एका मॉडेलची किंमत 59,881 रुपये (एक्स-शोरूम) आणि दुसऱ्या मॉडेलची किंमत 71,223 रुपये (एक्स-शोरूम) आहे. ही बाईक एक लिटर इंधनात 75 किलोमीटरपर्यंतचे अंतर कापू शकते. ही बाईक कमी किमतीत जास्त देते हे या बाईकचे वैशिष्ट्य आहे.

आणि शेवटीची जास्त मायलेज देणारी बाईक ही Honda Shine 100 आहे. Honda Shine 100 ही बाईक एका लिटरमध्ये 65 किलोमीटरपर्यंत धावते. तसेच या बाईकची किंमत 64,900 रुपयांपासून (एक्स-शोरूम) सुरू होत आहे.

वाघोलीत भीषण अपघात; ३ जणांचा मृत्यू, जखमींचाही आकडा समोर

David Beckham : 'बाल विवाह' विरोधात आवाज उठवणाऱ्या आदिवासी तरुणीच्या कामगिरीचे डेविडकडून कौतुक

मराठी दिग्दर्शक सचिन धोत्रेचे सामाजिक पाऊल, 'मिरांडा वॉर्निंग' चित्रपटाचा संपूर्ण नफा दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी

Jhansi Liquor News : पोलिसांनी हातपंप चालवला अन् पाण्याऐवजी दारू वाहू लागली; व्हिडिओ व्हायरल

पहाटेच्या धुक्यात भीषण अपघात, राँग साईडने आलेल्या वाहनाची दुचाकीला धडक; दोन सुरक्षा रक्षकांचा मृत्यू