ऑटोमोबाइल

TVS ने महाराष्ट्रात लाँच केले आयक्यूबचे नवीन व्हेरिएंट्स, इलेक्ट्रिक वाहतूक सर्वांना उपलब्ध करून देण्याचे ध्येय

भारतातील लोकप्रिय, संपूर्ण फॅमिलीच्या पसंतीची ईव्ही, TVS आयक्यूब आता ३ बॅटरी पर्यायांसह उपलब्ध – २.२ kwh, ३.४ kwh आणि ५.१ kwh. त्यात टीव्हीएस आयक्यूब एसटीच्या दोन व्हेरिएंट्सचा समावेश.

सायली ससाणे

वाहतुकीचे शाश्वत पर्याय उपलब्ध करून देण्याची बांधिलकी जपण्यासाठी तसेच ग्राहकांना निवडीचे स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी टीव्हीएस मोटर कंपनी या आघाडीच्या जागतिक वाहतूक उत्पादक कंपनीने आज टीव्हीएस आयक्यूबचे नवे व्हेरिएंट लाँच केले. त्यामध्ये २.२ kwh बॅटरी बसवण्यात आली आहे. त्याशिवाय कंपनी ग्राहकांना आजपासून टीव्हीएस आयक्यूब एसटीचे वितरण करण्यासाठी सज्ज आहे. टीव्हीएस आयक्यूब एसटी ३.४ kwh आणि ५.१ kwh या दोन व्हेरिएंट्समध्ये उपलब्ध केली जाणार असून हा या क्षेत्रातील सर्वात मोठा बॅटरी पॅक आहे. यासह टीव्हीएस आयक्यूबद्वारे पाच व्हेरिएंट्स ११ रंगांत उपलब्ध करण्यात आले असून ही पर्यायाने बाजारपेठेतील सर्वात आकर्षक ईव्ही श्रेणी बनली आहे.

टीव्हीएस आयक्यूब तीन मूलभूत तत्वांवर आधारित आहे – ग्राहकांना रेंज, कनेक्टेड तंत्रज्ञान, चार्जिंग सुविधा आणि किंमतीच्या बाबतीत निवडीचे स्वातंत्र्य, वाहन सुरक्षा व खरेदीचा एकंदर अनुभव पूर्णपणे खात्रीशीर, तसेच सोप्या वैशिष्ट्यांच्या मदतीने रायडिंग तसेच एकूण सुलभ वापर. या लाँचमुळे विविध क्षेत्रांतील ग्राहकांना टीव्हीएस आयक्यूबसह ईव्हीचा वापर सुरू करणे शक्य होईल. कारण बडे अरमानों की अच्छी शुरुआत हे ब्रँडचे ब्रीदवाक्य आहे.

नव्या व्हेरिएंटच्या लाँचविषयी टीव्हीएस मोटर कंपनीच्या ईव्ही बिझनेस विभागाचे वरिष्ठ उपाध्यक्ष मनू सक्सेना म्हणाले, ‘टीव्हीएस मोटर कंपनीमध्ये आम्ही या क्षेत्रात नाविन्य आणि शाश्वततेला चालना देण्यासाठी बांधील आहोत. टीव्हीएस आयक्यूब परिवार ३ लाखांपर्यंत विस्तारल्याचे पाहाणे आनंददायी आहे.

ईव्ही ग्राहकांच्या रायडिंगचे निरीक्षण करून त्यातून मिळालेल्या अनुभवाच्या आधारे नवी २.२ kwh, टीव्हीएस आयक्यूबमधील सर्वात वेगवान चार्जिंग व्हेरिएंट आणि टीव्हीएस आयक्यूब एसटीमधील आणखी एक व्हेरिएंट लाँच करताना आम्हाला आनंद होत आहे. टीव्हीएस आयक्यूब सीरीज लवकरच महाराष्टात वितरणासाठी उपलब्ध केली जाणार आहे. टीव्हीएसएम ग्राहकांच्या यशात भागीदार होण्याची परंपरा सुरूच ठेवेल आणि त्यासाठी इलेक्ट्रिक वाहतूक सुविधा अधिक विश्वासार्ह आणि सहज उपलब्ध करण्यावर कंपनीचा भर असेल.’

  • टीव्हीएस आयक्यूब रेंजमध्ये आता पाच व्हेरिएंट्स समाविष्ट असून त्यामुळे घरातील प्रत्येक सदस्यासाठी योग्य पर्याय उपलब्ध झाला आहे. • टीव्हीएस आयक्यूब (२.२ kwh) • टीव्हीएस आयक्यूब (३.४ kwh) • टीव्हीएस आयक्यूब (३.४ kwh) • टीव्हीएस आयक्यूब एसटी (३.४ kwh) • टीव्हीएस आयक्यूब एसटी (५.१ kwh) संपूर्ण टीव्हीएस आयक्यूब इलेक्ट्रिक सीरीज आता भारतातील ४३४ शहरांतील आमच्या दालनांमध्ये उपलब्ध केली जाणार आहे.

वाघोलीत भीषण अपघात; ३ जणांचा मृत्यू, जखमींचाही आकडा समोर

David Beckham : 'बाल विवाह' विरोधात आवाज उठवणाऱ्या आदिवासी तरुणीच्या कामगिरीचे डेविडकडून कौतुक

मराठी दिग्दर्शक सचिन धोत्रेचे सामाजिक पाऊल, 'मिरांडा वॉर्निंग' चित्रपटाचा संपूर्ण नफा दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी

Jhansi Liquor News : पोलिसांनी हातपंप चालवला अन् पाण्याऐवजी दारू वाहू लागली; व्हिडिओ व्हायरल

पहाटेच्या धुक्यात भीषण अपघात, राँग साईडने आलेल्या वाहनाची दुचाकीला धडक; दोन सुरक्षा रक्षकांचा मृत्यू