EV   (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)
ऑटोमोबाइल

EV प्रेमींसाठी आनंदाची बातमी! जानेवारीत Hyundai आणि Tata च्या नव्या Car'sची प्रतीक्षा संपणार

January 2027 Car Launches: नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच भारतीय वाहन बाजारात तीन नव्या कार दाखल होण्याची शक्यता आहे. जानेवारी 2027 मध्ये Hyundai Ioniq P, Mahindra Vision S आणि Tata Safari EV या गाड्या सादर होऊ शकतात. Hyundai Ioniq P ही चार मीटरपेक्षा कमी लांबीची छोटी इलेक्ट्रिक कार असेल.

Riddhi Vanne
  • जानेवारीत 3 नव्या कार्सची एन्ट्री!

  • Hyundai ची छोटी इलेक्ट्रिक कार येणार!

  • Tata Safari EV मध्ये 7 आसनांची सोय!

Upcoming Cars 2027: नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच भारतीय गाड्यांच्या बाजारात नव्या मॉडेल्सची रेलचेल बघायला मिळण्याची शक्यता आहे. यंदाच्या वर्षाप्रमाणेच 2027 मध्येही देशी आणि परदेशी गाड्यांच्या कंपन्या वेगवेगळ्या प्रकारात नवे पर्याय आणायच्या तयारीत आहेत. त्यातल्या तीन लक्षवेधी गाड्या जानेवारी 2027 मध्ये बाजारात येऊ शकतात, ज्यात इलेक्ट्रिक गाड्यांसोबतच नव्या प्लॅटफॉर्मवरची SUV पण आहे.

• 1. Hyundai Ioniq P - पहिली छोटी इलेक्ट्रिक गाडी

भारतातल्या इलेक्ट्रिक कार विभागात ह्युंदाई मोटर्स आपली पहिली पूर्णपणे इलेक्ट्रिक गाडी आणायची तयारी करत आहे.

1. लॉन्च कधी? : 16 जानेवारी 2027 रोजी 'आयोनिक पी' चं अनावरण होण्याची माहिती समोर आली आहे.

2. प्लॅटफॉर्म : ही गाडी ई-जीएमपी (के) रचनेवर आधारित असून तिची लांबी चार मीटरपेक्षा कमी असेल.

3. कोड नेम : आतमध्ये 'एचई1आय' या नावाने ओळखल्या जाणाऱ्या या एंट्री-लेव्हल इलेक्ट्रिक गाडीचं अधिकृत नाव आयोनिक पी राहू शकतं.

4. लूक कसा? : या गाडीची बाह्य रचना एक्सटर आणि इन्स्टर मॉडेल्सप्रमाणे उंच आणि चौकोनी आकाराची असेल, ज्यामुळे आतमध्ये प्रवाशांना भरपूर जागा मिळू शकेल. शहरातल्या रोजच्या प्रवासासाठी छोटा आकार आणि आधुनिक इलेक्ट्रिक तंत्रज्ञान यांचा मेळ यातून साधायचा प्रयत्न केला जातो.

• 2. Mahindra Vision S - नव्या प्लॅटफॉर्मवरची पहिली SUV

महिंद्रा अँड महिंद्राने तयार केलेल्या 'एनयू-आय क्यू' प्लॅटफॉर्मवर आधारित पहिली SUV 'व्हिजन एस' च्या रूपात समोर येण्याची शक्यता आहे.

1. चाचणी : गेल्या वर्षभराहून जास्त काळ या गाडीच्या वेगवेगळ्या रस्त्यांवर चाचण्या सुरू आहेत.

2. लॉन्च कधी? : तिची उत्पादन आवृत्ती जानेवारी 2027 मध्ये सादर केली जाऊ शकते.

3. फीचर्स : या मॉडेलमध्ये पॅनोरामिक सनरूफ, लेव्हल 2 एडीएएस सुरक्षा प्रणाली, लेदरेट सीट्स, मोठी टचस्क्रीन आणि 360 अंशांचा कॅमेरा यासारख्या सुविधा मिळू शकतात.

4. इंजिन : या SUV मध्ये 1.2 लिटर टर्बो-पेट्रोल आणि 1.5 लिटर टर्बो-डिझेल इंजिन दिलं जाण्याची अपेक्षा आहे. रफ-अँड-टफ लूक आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या जोरावर ही गाडी लोकांचं लक्ष वेधू शकते.

• 3. Tata Safari EV - पहिली सात आसनी इलेक्ट्रिक SUV

भारतीय इलेक्ट्रिक गाड्यांच्या बाजारात पुढे असलेली टाटा मोटर्स आपली फ्लॅगशिप SUV 'सफारी ईव्ही' जानेवारी 2027 मध्ये बाजारात आणायच्या तयारीत आहे.

1. उशीर का? : कंपनीने आधी सणासुदीच्या काळात ही गाडी आणायचा विचार केला होता, मात्र तो निर्णय पुढे ढकलून आता पुढच्या वर्षाच्या सुरुवातीला लॉन्चिंगची शक्यता वर्तवली जात आहे.

2. खासियत : टाटाची ही पहिली सात आसनी इलेक्ट्रिक SUV ठरणार आहे.

3. लूक : सफारी EV चा बाहेरचा लूक सध्याच्या पेट्रोल-डिझेल वाली सफारीसारखाच राहण्याची चिन्हं आहेत. मात्र इलेक्ट्रिक आवृत्तीनुसार पुढच्या भागात बंद ग्रिल, एरोडायनामिक चाकं आणि सुधारित एलईडी टेल-लॅम्प्स असे बदल बघायला मिळू शकतात. मोठ्या कुटुंबांसाठी इलेक्ट्रिक पर्याय शोधणाऱ्या लोकांसाठी हा एक महत्त्वाचा पर्याय ठरू शकतो.

तुमच्याही वाहनावर ऑनलाईन पावती आहे? तर काळजी नको ! आता दंडावर मिळणार मोठी सवलत

Mumbai Indians: ‘मी तयार नव्हतो सुरूवातीला पण MI ला योग्य दिशेची गरज’, कर्णधारपद स्वीकारताच रोहितने केला खुलासा

Bahirji Marathi Movie: ‘जिकर हाय तर फिक्कर नाय!’ बहिर्जी नाईक यांच्या शौर्याची गाथा मोठ्या पडद्यावर उलगडणार; मोशन पोस्टरने वेधले लक्ष

Tech news: अ‍ॅपलविरोधात OpenAI चा प्रतिदावा; व्यापार गुपितांच्या वादामुळे दोन्ही कंपन्यांमध्ये संघर्ष तीव्र

CBSE 12 Exam 2027: विद्यार्थ्यांची सायन्सकडेच धाव! इंग्रजीनंतर 'हा' ठरला दुसरा सर्वात पसंतीचा विषय