अर्थसंकल्प २०२२

नागरिकांच्या आरोग्याचं काय?

मोठ्या प्रमाणात मानसिक आरोग्यावर होत असलेला परिणाम पाहता केंद्रीय अर्थसंकल्पात मानसिक आरोग्यावर लक्ष ठेवण्यासाठी देशात २३ मानसिक समस्या समुपदेशन केंद्र उभारण्यात येणार असल्याचे अर्थमंत्री निर्मला सीतारमण म्हणाल्या.

Pravina Shirpurkar

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्पात आरोग्यबाबतच्या महत्वाच्या घोषणा केली आहे. आता देशातील सर्व आरोग्य सुविधा एकाच व्यासपीठावर उपलब्ध होणार आहे. अर्थमंत्र्यांनी नवीन पोर्टलची घोषणा केली. अर्थमंत्री सीतारामन यांनी सांगितले की, “नॅशनल डिजिटल हेल्थ इकोसिस्टमसाठी (National Health Digital Eco System)हे असं खुलं व्यासपीठ आहे. यामध्ये आरोग्य पुरवठादार आणि आरोग्य सुविधांसाठी डिजिटल नोंदणीचा समावेश असेल. यासह, प्लॅटफॉर्मला एक अद्वितीय हेल्थ आयडी आणि आरोग्य सुविधांचा सार्वत्रिक प्रवेश मिळेल.

जगात सुरु असलेल्या कोरोना महामारीने लोकांचे मानसिक आरोग्याच्या समस्या मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. त्यामुळे या अर्थसंकल्पामध्ये केंद्र सरकारने मानसिक आरोग्यासाठी मोठ्या प्रमाणात तरतूद केली आहे. मोठ्या प्रमाणात मानसिक आरोग्यावर होत असलेला परिणाम पाहता केंद्रीय अर्थसंकल्पात मानसिक आरोग्यावर लक्ष ठेवण्यासाठी देशात २३ मानसिक समस्या समुपदेशन केंद्र उभारण्यात येणार असल्याचे अर्थमंत्री निर्मला सीतारमण म्हणाल्या. समाजातील विविध घटकांना यंदाच्या अर्थसंकल्पाकडून मोठ्या अपेक्षा होत्या. त्यातच मागील दोन वर्षापासून संपूर्ण जगासह देशात कोरोनाचं संकट घोंघावत आहे. अशावेळी यंदाच्या केंद्रीय अर्थसंकल्पात आरोग्य विभागासाठी भरीव तरतूद करण्याची मागणी या क्षेत्रातील तज्ज्ञांकडून करण्यात आली होती. तर, राज्यातील कोरोना परिस्थिती पाहता राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनीही केंद्राकडे महत्वाच्या मागण्या केल्या होत्या.

2021-22 मध्ये आरोग्यासाठी अर्थसंकल्पीय तरतूद 2,34,846 कोटी रुपये होती. मागील अर्थसंकल्पीय भाषणात अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितले होते की आरोग्य बजेट तीन विशिष्ट क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करेल. या तीन क्षेत्रांचे त्यांनी इंग्रजीत वर्णन ‘Preventive, Curative and Well Being’ असे केले. म्हणजेच रोग कसा टाळता येईल, कोणी आजारी पडल्यास त्यावर उपचार कसे करावे आणि लोकांना निरोगी ठेवण्यासाठी काय उपाययोजना करता येतील. हे तीन मंत्र निर्मला सीतारामन यांनी आरोग्य बजेटसाठी दिले होते.

वाघोलीत भीषण अपघात; ३ जणांचा मृत्यू, जखमींचाही आकडा समोर

David Beckham : 'बाल विवाह' विरोधात आवाज उठवणाऱ्या आदिवासी तरुणीच्या कामगिरीचे डेविडकडून कौतुक

मराठी दिग्दर्शक सचिन धोत्रेचे सामाजिक पाऊल, 'मिरांडा वॉर्निंग' चित्रपटाचा संपूर्ण नफा दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी

Jhansi Liquor News : पोलिसांनी हातपंप चालवला अन् पाण्याऐवजी दारू वाहू लागली; व्हिडिओ व्हायरल

पहाटेच्या धुक्यात भीषण अपघात, राँग साईडने आलेल्या वाहनाची दुचाकीला धडक; दोन सुरक्षा रक्षकांचा मृत्यू