अर्थसंकल्प २०२२

अर्थसंकल्पातल्या या घोषणांमुळे सर्वसामान्यांना काहीसा दिलासा, जाणून घ्या तुमच्या फायद्याच्या तरतूदी

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Nirmala Sitharaman) यांनी बजेट (Budget 2022) सादर करताना अनेक महत्त्वपूर्ण घोषणा केल्या आहेत, या बजेटमधून सामान्यांना थोडासा दिलासा मिळाला आहे.अर्थसंकल्पातील कोणत्या गोष्टींमुळे तुमचा फायदा होऊ शकतो, ते समजून घ्या.

साधना

नवी दिल्ली :  आज केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी अर्थसंकल्प सादर केला आहे. (Finance Minister Nirmala Sitharaman)  मोदी सरकारचा हा चौथा अर्थसंकल्प आहे. तसेच कोरोना काळातील दुसरा अर्थसंकल्प आहे. या अर्थसंकल्पामध्ये सर्वसामान्यांसाठी काय चांगल्या घोषणा (Good Decisions Made InBudget For Indians) करण्यात आल्या आहेत. ते आपण जाणून घेणार आहोत.

नोकरी

अर्थसंकल्पामध्ये ६० लाख नव्या नोकरीच्या संधी निर्माण करण्याची घोषणा करण्यात आली आहे. ३० लाख अतिरिक्त नोकऱ्या निर्माण होणार आहेत. कोरोना काळात अनेकांनी नोकऱ्या गमावल्या आहेत. त्यामुळे सरकारकडून नोकरीच्या संधी निर्माण केले जाणे हे सर्वसामान्यांसाठी आवश्यक आहे.

राज्यांच्या पदरी काय ?

राज्यांच्या अर्थव्यवस्थेसाठी १ लाख कोटींच्या पॅकेजची घोषणा करण्यात आली असून गती शक्ती योजना, ग्रामीण विकासासाठी निधीची तरतूद करण्यात आली आहे. नदी जोड प्रकल्प राबवला जाणार आहे. या प्रकल्पाचा राज्यांना निश्चितच फायदा होईल. देशात नदीजोड प्रकल्पाच्या माध्यमातून ३.८ कोटी घरांमध्ये नळाचं पाणी पोचवण्यासाठी ६० हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. देशातील पाच नदीजोड प्रकल्पाची महत्त्वाची घोषणा करण्यात आली आहे. या पाच नद्यामध्ये महाराष्ट्रातील तीन नद्यांचा समावेश आहे, दमणगंगा, कृष्णा आणि गोदावरी या तीन नद्यांचा नदीजोड प्रकल्पात समावेश करण्यात आला आहे.

बळीराजाची दखल

मोदी सरकारने अर्थसंकल्पात शेतकऱ्यांना मोठी भेट दिली आहे. २०२३ हे वर्ष भरड धान्याचे वर्ष म्हणून सरकारने घोषित केले आहे. भरड धान्य उत्पादनांच्या राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय ब्रँडिंगवर सरकार भर देणार आहे. त्याचवेळी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी ४४६०५ कोटी रुपयांचा केन-बेतवा लिंक प्रकल्प सुरू करण्याची घोषणा केली आहे. शेतकऱ्यांना डिजिटल आणि हायटेक सेवा देण्यासाठी पीपीपी मॉडेल सुरू करण्याची घोषणा अर्थमंत्र्यांनी केली.यावर्षी सरकारकडून मोठ्या प्रमाणात धान्याची खरेदी झाली असून थेट रक्कम थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केली जाणार आहे. यातील काही रक्कम आधीच जमा करण्यात आली असल्याचं निर्मला सीतारामन यांनी सांगितलं आहे.

घरासाठी तरतूद

येत्या २ वर्षात देशात पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत ८० लाख घर तयार केली जाणार आहेत. शहरी आणि ग्रामीण भागात पंतप्रधान आवास योजनेसाठी ४८ हजार कोटींची नव्याने तरतूद करण्यात आली आहे. मध्यमवर्गीय आणि गरिबांना परवडणारी घरं मिळावीत यासाठी खासगी बिल्डर्सशी चर्चा करणार असून मध्यस्थांमुळे वाढणारा खर्च कमी करण्याचा प्रयत्न असेल अशी माहिती अर्थमंत्र्यांनी दिली.

स्वस्त आणि मस्त - कपडे, चामड्याचा वस्तू, इलेक्ट्रॉनिक्स वस्तू, मोबाईल फोन, चार्जर, हिऱ्याच्या वस्तू, दागिने,शेतीची अवजारे,कॅमेरा लेन्सेस , इंधन, इम्पोर्टेड केमिकल या सगळ्या गोष्टी स्वस्त होणार आहेत.

वाघोलीत भीषण अपघात; ३ जणांचा मृत्यू, जखमींचाही आकडा समोर

David Beckham : 'बाल विवाह' विरोधात आवाज उठवणाऱ्या आदिवासी तरुणीच्या कामगिरीचे डेविडकडून कौतुक

मराठी दिग्दर्शक सचिन धोत्रेचे सामाजिक पाऊल, 'मिरांडा वॉर्निंग' चित्रपटाचा संपूर्ण नफा दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी

Jhansi Liquor News : पोलिसांनी हातपंप चालवला अन् पाण्याऐवजी दारू वाहू लागली; व्हिडिओ व्हायरल

पहाटेच्या धुक्यात भीषण अपघात, राँग साईडने आलेल्या वाहनाची दुचाकीला धडक; दोन सुरक्षा रक्षकांचा मृत्यू