Credit Card 30 Percent Rule : बँका आपल्या ग्राहकांना विविध प्रकारचे क्रेडिट कार्ड देतात. यामुळे त्याचा वापर करुन लोकं आपल्या पसंती आणि फायद्यांचं कार्ड मिळवतात आणि वापरतात. पण हे क्रेडिट कार्ड वापरताना काही महत्त्वाच्या आणि विशिष्ट नियमांचं पालन करणं गरजेचं असतं. जर तुम्ही त्याची काळजी घेतली नाही तर तुमचं नुकसान होऊ शकतं ज्याचा थेट परिणाम तुमच्या सिबिल स्कोअरवरही होऊ शकतो. नेमका काय आहे हा नियम ? आणि ३० टक्क्यांचा क्रेडिट लिमिट नेमकं काय सांगतो?
३० टक्के क्रेडिट लिमिटच्या नियम फार महत्त्वाचा आहे. ज्याला क्रेडिट युटिलायझेशन रेशो असेही म्हटले जाते.
क्रेडिट कार्डची क्रेडिट लिमिट म्हणजे त्या कार्डवर ठेवता येणारी कमाल शिल्लक रक्कम. उदाहरणार्थ, जर एखाद्या क्रेडिट कार्डची एकूण क्रेडिट लिमिट ₹१०० असेल, तर त्या कार्डवर ठेवता येणारी कमाल शिल्लक रक्कम ₹१०० आहे. आता आपण ३०% क्रेडिट लिमिटच्या नियमाबद्दल जाणून घेऊया. ३०% क्रेडिट लिमिटच्या नियमाचा अर्थ असा आहे की, तुम्ही तुमच्या क्रेडिट कार्डच्या एकूण क्रेडिट लिमिटपैकी फक्त ३०% रक्कमच खर्च केली पाहिजे. याला क्रेडिट युटिलायझेशन रेशो असेही म्हणतात.
आता आपण हे एका उदाहरणाने समजून घेऊया. समजा तुमच्या क्रेडिट कार्डची एकूण क्रेडिट लिमिट ₹१,००,००० आहे. या नियमानुसार, तुम्हाला या लिमिटच्या फक्त ३०% म्हणजेच ₹३०,००० खर्च करणे आवश्यक आहे. तज्ञांच्या मते, या नियमाचे पालन केल्याने तुमचा सिबिल स्कोअर सुधारतो. यामुळे तुम्हाला कर्ज मिळवणे सोपे होऊ शकते.
पण, तुम्ही ३०% पेक्षा जास्त खर्च करू शकत नाही असा कोणताही निश्चित नियम नाही. गरजेनुसार तुम्ही या प्रमाणापेक्षा जास्त खर्च करू शकता, परंतु कधीकधी, थकबाकी वेळेवर न फेडल्यास आणि अतिरिक्त शुल्क लागल्यास तुम्हाला आर्थिक नुकसानीचा धोका निर्माण होऊ शकतो.
याचा तुमच्या सिबिल स्कोअरवरही परिणाम होतो, ज्यामुळे तो कमी होण्याची शक्यता वाढते. खराब सिबिल स्कोअरमुळे तुमची क्रेडिट मर्यादा वाढवणे कठीण होऊ शकते आणि कर्ज मिळवण्यातही अडचणी येऊ शकतात.