गेल्या काही महिन्यांमध्ये यूकेची अर्थव्यवस्था डगमगली आहे. बर्याच तज्ञांचा दावा आहे की लवकरच यूकेमध्ये आर्थिक मंदी येऊ शकते. जगातही मंदीची भीती असताना अनेक बहुराष्ट्रीय कंपन्या आपल्या कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करत आहेत. युकेचे नवीन पंतप्रधान ऋषी सुनक आपल्या देशाची अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी सतत प्रयत्न करत आहेत. वाढती महागाई आणि मंदीच्या गर्तेत सापडलेल्या ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेला परत नवसंजीवनी देण्यासाठी, युनायटेड किंगडमच्या 100 कंपन्यांनी त्यांच्या कर्मचाऱ्यांना आठवड्यातून 4 दिवस काम आणि 3 दिवस सुट्टी देण्याची घोषणा केली आहे. विशेष म्हणजे या कंपन्यांनी पगार न कापता सर्व कर्मचाऱ्यांसाठी आठवड्यातून चार दिवस कायमस्वरूपी काम करण्याचा नियम बनवला आहे. या 100 कंपन्यांमध्ये एकूण 2,600 कर्मचारी काम करतात.
कामकाजाच्या 4 दिवसांमुळे देशात मोठे बदल अपेक्षित असल्याचे या कंपन्यांचे मत आहे. येथील काही बँकाही चार दिवस कामकाजाच्या सूत्रावर काम करणार आहेत. आठवड्यातून चार दिवस काम केल्याने कर्मचार्यांची उत्पादकता सुधारेल, असा विश्वास 4 दिवस कार्यप्रणालीच्या समर्थकांना आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांना अधिक चांगले काम करण्याची प्रेरणा मिळेल. यासोबतच कर्मचारी आपल्या कामात सुधारणा करण्याचा प्रयत्न करतील आणि याचा फायदा कंपन्यांना होईल.
विशेष म्हणजे या 100 कंपन्यांपैकी दोन मोठ्या कंपन्या आहेत. अॅटम बँक आणि एविन ही फर्म अशी या कंपन्यांची नावे आहेत. या दोन कंपन्यांमध्ये एकूण 450 कर्मचारी काम करतात. या आगामी काळात मोठा बदल पाहिला मिळणार आहे. यांची ट्रायल 6 हजार कर्मचाऱ्यवर केली आहे. महत्वाचे म्हणजे कर्मचाऱ्यांवरील कामाचा ताण कमी होईल आणि याचा कंपनीला दीर्घकाळ फायदा होईल.