महागाईच्या अहवालात धक्कादायक खुलासा! भाजीपाला-धान्य पुन्हा महागणार?  ( सौजन्य - सोशल मीडिया )
Business

Government Inflation Report : महागाईच्या अहवालात धक्कादायक खुलासा! भाजीपाला-धान्य पुन्हा महागणार? तुमच्या स्वयंपाकघराचे गणित बिघडणार का?

Government Inflation Report : महागाईच्या स्थितीबाबत समोर आलेल्या सरकारी अहवालातील खुलाशामुळे सर्वसामान्यांच्या चिंतेत भर पडण्याची शक्यता असून, येत्या काळात भाजीपाला आणि धान्याच्या दरात वाढ होऊ शकते.

Ankita Karangutkar
  • महागाईच्या अहवालात धक्कादायक खुलासा!

  • भाजीपाला-धान्य पुन्हा महागणार?

  • तुमच्या स्वयंपाकघराचे गणित बिघडणार का?

Government Inflation Report : येत्या काळात सर्वसामान्यांना मोठा फटक बसणार आहे. सण आणि लग्नसराईमुळे सर्वसामान्य कुटुंबांचं बजेट बिघडणार आहे. केंद्र सरकारच्या ताज्या मासिक आर्थिक अहवालात चिंता व्यक्त करण्यात आली आहे. यामध्ये हवामानातील बदल आणि पुरवठा साखळीतील अडचणींमुळे अन्नपदार्थ व इतर जीवनावश्यक वस्तूंच्या किमती वाढू शकतात. याचा परिणाम लोकांच्या खर्चावर होऊ शकतो.

अहवालानुसार, मध्य-पूर्वेतील सध्याच्या तणावामुळे कच्च्या तेलाच्या किमती आणि सागरी मालवाहतुकीवर परिणाम होऊ शकतो. याचा परिणाम भारताच्या तेल आयातीच्या बिलावरही होऊ शकतो. तेलाच्या किमती कमी झाल्यामुळे आणि रुपया मजबूत झाल्यामुळे महागाई नियंत्रणात ठेवण्यास मदत होऊ शकते.

सण आणि लग्नसराईमुळे महागाईचा दणका

सण आणि लग्नसराईचा हंगाम नोव्हेंबरमध्ये सुरू होतो. या काळात अन्न आणि इतर वस्तूंची मागणी वाढण्याची शक्यता आहे. मागणीतील वाढ आणि पुरवठ्यावरील मर्यादांमुळे किमतींवर दबाव वाढण्याची शक्यता आहे, विशेषतः भाजीपाला आणि धान्य यांसारख्या जीवनावश्यक वस्तूंच्या किमतींवर याचा परिणाम होईल.

मध्यपूर्वेतील तणावाचाही थेट परिणाम

सरकारने आपल्या अहवालात म्हटले आहे की, मध्यपूर्वेतील सुरू असलेल्या संघर्षामुळे कच्च्या तेलाच्या किमती आणि सागरी मालवाहतुकीच्या खर्चात चढ-उतार होऊ शकतो. याशिवाय, जगभरातील बदलत्या व्यापार धोरणांचा भारताच्या परकीय व्यापारावर परिणाम होऊ शकतो.

ऑक्टोबरमध्ये महागाई ६% च्या वर

महागाईचा दबाव आधीच दिसून येत आहे. भारतातील किरकोळ महागाई ऑक्टोबरमध्ये ६.०९% पर्यंत वाढली. नवीन आकडेवारीमध्ये पहिल्यांदाच महागाईने भारतीय रिझर्व्ह बँकेची (RBI) ६% ची कमाल मर्यादा ओलांडली आहे. या वाढीचे मुख्य कारण अन्नपदार्थांच्या वाढत्या किमती असल्याचे सांगितले जात आहे.

Laptop Tricks: लॅपटॉपचा कीबोर्ड खराब झाला तरी नो टेन्शन; कीबोर्डशिवायही करता येईल टायपिंग; जाणून घ्या ट्रिक

Shooting Competition: पुण्यात नेमबाजीचा महाकुंभ! ७५०० नेमबाजांचा सहभाग

Infinix Hot 30i Launched: कमी किंमत, जबरदस्त बॅटरी! फक्त 9 हजारांच्या आतला 'हा' फोन ठरतोय बजेट किंग

Maruti DDiS 1.3 Engine: डीजल कारचा तो काळ संपला! BS6 नियम आणि वाढत्या किमतींमुळे मारुतीचे 'हे' इंजिन का झाले इतिहासजमा?

सरकारी जमिनीवरील घरांना मिळणार कायदेशीर हक्क? राज्य सरकारचा मोठा निर्णय