फोटो सौजन्य - सोशल मीडिया  
Career

Indian Army Result 2026: इंडियन आर्मीची फायनल मेरिट लिस्ट जाहीर; निकाल तपासा 'या' सोप्या स्टेप्सद्वारे..

Indian Army Result 2026: सैन्यात सामील होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या तरुणांसाठी इंडियन आर्मीकडून मोठी बातमी आहे. इंडियन आर्मीने विविध भरती प्रवर्गांसाठी अंतिम गुणवत्ता यादी २०२६ जाहीर केली आहे.

श्रेया देशमुख

Indian Army Result 2026: सैन्यात सामील होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या तरुणांसाठी इंडियन आर्मीकडून मोठी बातमी आहे. इंडियन आर्मीने विविध भरती प्रवर्गांसाठी अंतिम गुणवत्ता यादी २०२६ जाहीर केली आहे. या निकालामध्ये अग्निवीरसह ज्युनियर कमिशंड ऑफिसर रिजनल टीचर, हवालदार एज्युकेशन आणि शिपाई फार्मा यांसारख्या प्रवर्गांतील शॉर्टलिस्ट झालेल्या उमेदवारांची माहिती समाविष्ट आहे. भरती निवड प्रक्रियेत सहभागी झालेले उमेदवार कोणत्याही लॉगिन क्रेडेंशियलशिवाय थेट joinindianarmy.nic.in या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन झोननुसार PDF स्वरूपात आपला निकाल पाहू शकतात.

निकाल कसा तपासावा?

1. निकाल तपासण्यासाठी सर्वप्रथम इंडियन आर्मीच्या joinindianarmy.nic.in या अधिकृत संकेतस्थळावर जा.

2. त्यानंतर होम पेजवर संबंधित रिझल्ट किंवा फायनल रिझल्ट सेक्शन उघडा.

3. आता आपला भरती प्रवर्ग, जसे की अग्निवीर किंवा हवालदार निवडा.

4. त्यानंतर आपले ZRO किंवा ARO सिलेक्ट करा.

5. आता संबंधित मेरिट लिस्ट PDF च्या लिंकवर क्लिक करा.

6. त्यानंतर PDF उघडल्यावर Ctrl + F दाबून आपला रोल नंबर शोधा.

7. शेवटी निकाल तपासून PDF डाउनलोड करून सुरक्षित ठेवा.

फायनल मेरिटमध्ये मिळेल ही माहिती

उमेदवारांना इंडियन आर्मी अग्निवीर फायनल मेरिट लिस्ट २०२६ PDF मध्ये दिलेली माहिती काळजीपूर्वक तपासण्याचा सल्ला देण्यात आला आहे. संबंधित रिक्रूटिंग ऑफिसने जाहीर केलेल्या फॉर्मेटनुसार रिझल्ट PDF मध्ये विविध प्रकारची माहिती असेल. यामध्ये भरती करणाऱ्या संस्थेचे नाव, परीक्षेचे नाव, रिक्रूटमेंट वर्ष, संबंधित ZRO किंवा ARO चे नाव, पद किंवा भरती प्रवर्गाचे नाव, शॉर्टलिस्ट झालेल्या उमेदवारांचे रोल नंबर आणि लागू असल्यास पुढील एनरोलमेंट फॉर्मेलिटीबाबत सूचनाही दिल्या जातील.

मेरिट लिस्टमध्ये नाव आल्यानंतर पुढे काय होईल?

ज्या उमेदवारांचे नाव आणि रोल नंबर अंतिम टप्प्यातील यादीत आले आहेत, त्यांना संबंधित ZRO किंवा ARO च्या सूचनांचे पालन करून एनरोलमेंट, जॉइनिंग, रिपोर्टिंग तारखा आणि ट्रेनिंग सेंटरशी संबंधित प्रक्रियेसाठी अधिकृत पोर्टल तसेच आपला नोंदणीकृत मोबाईल क्रमांक किंवा ईमेल नियमितपणे तपासावा लागेल. एनरोलमेंटच्या वेळी पदानुसार लागू असलेली कागदपत्रे, जसे की १०वी-१२वीची मार्कशीट, ग्रॅज्युएशन मार्कशीट, ओळखपत्र (उदा. आधार कार्ड) किंवा इतर वैध कागदपत्रे जसे की कँरेक्टर सर्टिफिकेट, रहिवासी व जात प्रमाणपत्र आणि ॲडमिट कार्ड यांसारखी माहिती तयार ठेवावी लागेल.

इंडियन आर्मी फायनल मेरिट लिस्ट २०२६ कोठे पाहता येईल?

उमेदवार कोणत्याही लॉगिन क्रेडेंशियलशिवाय थेट joinindianarmy.nic.in या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन आपल्या झोननुसार PDF स्वरूपात निकाल पाहू शकतात.

या अंतिम गुणवत्ता यादीमध्ये कोणत्या पदांचा समावेश आहे?

या निकालामध्ये अग्निवीर तसेच ज्युनियर कमिशंड ऑफिसर (JCO) रिजनल टीचर, हवालदार एज्युकेशन आणि शिपाई फार्मा यांसारख्या विविध भरती प्रवर्गांतील शॉर्टलिस्ट उमेदवारांची माहिती समाविष्ट आहे.

मेरिट लिस्टमध्ये नाव आल्यानंतर उमेदवारांनी काय करावे?

ज्या उमेदवारांचा रोल नंबर यादीत आहे, त्यांनी एनरोलमेंट, जॉइनिंग, रिपोर्टिंग तारखा आणि ट्रेनिंग सेंटरच्या सूचनांसाठी अधिकृत पोर्टल तसेच नोंदणीकृत मोबाईल नंबर व ईमेल नियमित तपासावा आणि आवश्यक मूळ कागदपत्रे तयार ठेवावीत.

PM VIKAS Scheme: शिका मोफत, कमवा दरमहा! एकाच सरकारी योजनेतून मिळणार 5 योजनांचे फायदे

ठाकरे गटाचा डिलिमिटेशनला विरोध का? उद्धव ठाकरेंनी मांडलं लोकसभेच्या जागांचं गणित, म्हणाले, "UPपेक्षा महाराष्ट्र..."

दाढीच्या बहाण्याने कात्री घेतली अन् मेहुण्याचा जीव घेतला; आरोपीला न्यायालयाने सुनावली 'ही' मोठी शिक्षा

Youth Artistic Gymnastics : जिम्नॅस्टिक्स स्पर्धेत शुभदा भाबरेची सुवर्णभरारी; महाराष्ट्राला सांघिक विजेतेपद, पश्चिम बंगालचेही वर्चस्व

मध्यरात्री दीड वाजता रक्ताचा सडा! आईला त्रास देणाऱ्या सख्ख्या भावावर कुऱ्हाडीचे वार अन्...