फोटो सौजन्य - नवराष्ट्र टीम  
Career

मुंबईत ‘MIECA 2026’चे चौथे पर्व दिमाखात संपन्न; शिक्षण-उद्योगातील २०० मान्यवर व संस्थांचा सन्मान

MIECA 2026: मुंबईत 'एमआयईसीए' २०२६ चे चौथे पर्व संपन्न झाले. शिक्षण व उद्योग क्षेत्रांतील २०० पुरस्कारप्राप्तांचा गौरव करण्यात आला. अरुण फिरोदिया आणि देवांग खाखर यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

श्रेया देशमुख
  • 'या' व्यक्तिमत्त्वांचा जीवनगौरव पुरस्काराने सन्मान

  • ‘एमआयईसीए’ २०२६ चे चौथे पर्व मुंबईत उत्साहात संपन्न

  • शिक्षण आणि उद्योग क्षेत्रांतील २०० मान्यवर व संस्थांचा सन्मान

MIECA 2026: शिक्षण आणि रोजगार यांच्यातील दरी कमी करून भारतातील तरुणांना भविष्यातील रोजगारासाठी सक्षम बनवण्याच्या उद्देशाने टीमलीज एडटेकने मुंबईत ‘मेकिंग इंडिया एम्प्लॉयेबल कॉन्फरन्स अँड अवॉर्ड्स’ (एमआयईसीए) २०२६ च्या चौथ्या पर्वाचे आयोजन केले. या परिषदेला शिक्षण, रोजगार, प्रशासन, कौशल्य विकास आणि सामाजिक परिवर्तन क्षेत्रांतील मान्यवरांसह सुमारे ४०० प्रतिनिधी उपस्थित होते.

इंडिया एज्युकेशन फोरम आणि इंडिया एम्प्लॉयर फोरम यांच्या संयुक्त विद्यमाने, तसेच टीमलीज एडटेक आणि डिजिव्हर्सिटी यांच्या ज्ञान भागीदारीत सादर होणाऱ्या या मंचावर विविध श्रेणींमध्ये देशभरातील एकूण २०० पुरस्कारप्राप्त व्यक्ती व संस्थांचा सन्मान करण्यात आला.

'या' व्यक्तिमत्त्वांचा जीवनगौरव पुरस्काराने सन्मान

यामध्ये ‘कॉर्पोरेट एक्सलन्स अवॉर्ड’, ‘एक्सलन्स इन हायर एज्युकेशन अवॉर्ड’, ‘भारत निर्माण अवॉर्ड’, ‘चेंज मेकर अवॉर्ड – इंडस्ट्री व अकॅडेमिया’, ‘रायझिंग स्टार्स : एआय इनोव्हेटर्स’ तसेच नव्याने सुरू केलेल्या ‘ट्रेलब्लेझर – इंडस्ट्री’ आणि ‘ट्रेलब्लेझर – अकॅडेमिया’ श्रेणींचा समावेश होता. उद्योग क्षेत्रातील अतुलनीय योगदानाबद्दल अरुण फिरोदिया आणि शिक्षण क्षेत्रातील योगदानाबद्दल देवांग व्ही. खाखर यांना जीवनगौरव पुरस्काराने गौरविण्यात आले.

कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे कामाचे स्वरूप बदलत आहे

टीमलीज एडटेकचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी शांतनू रूज म्हणाले, “भारताला रोजगारक्षम बनवण्यासाठी शिक्षण संस्था, नियोक्ते आणि संपूर्ण उद्योग क्षेत्राने एकत्रित प्रयत्न करणे आवश्यक आहे. तंत्रज्ञान आणि कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे कामाचे स्वरूप बदलत आहे. कामाच्या ठिकाणी असलेल्या बदलत्या अपेक्षांशी शिक्षण क्षेत्रानेही जुळवून घेणे महत्त्वाचे आहे. हा बदल घडवणाऱ्यांचा गौरव करणे आणि शिक्षण व उद्योग क्षेत्रांतील सहकार्य अधिक दृढ करणे, हा एमआयईसीएचा उद्देश आहे.”

यंदाच्या पुरस्कार निवड समितीचे अध्यक्षपद पद्मविभूषण डॉ. रघुनाथ अ. माशेलकर यांनी भूषवले. समितीमध्ये रोमा बलवानी, डॉ. सिद्धार्थ पै, प्रा. राजीव प्रकाश आणि डॉ. चेनराज रॉयचंद यांचा समावेश होता. परिषदेत एआयमुळे बदलणाऱ्या मनुष्यबळाच्या गरजा, व्यावहारिक कौशल्ये, प्रत्यक्ष कामाचा अनुभव आणि ‘विकसित भारत २०४७’च्या दिशेने रोजगारक्षम मनुष्यबळ घडवण्याची सामायिक जबाबदारी यावर सखोल चर्चा झाली.

‘एमआयईसीए’ (MIECA) २०२६ चे चौथे पर्व कोठे पार पडले आणि किती पुरस्कार देण्यात आले?

‘एमआयईसीए’ २०२६ चे चौथे पर्व मुंबई येथे आयोजित करण्यात आले होते. या मंचावर विविध श्रेणींमध्ये देशभरातील एकूण २०० पुरस्कारप्राप्त व्यक्ती व संस्थांचा सन्मान करण्यात आला.

यंदाचा जीवनगौरव पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला?

उद्योग क्षेत्रातील अतुलनीय योगदानाबद्दल अरुण फिरोदिया आणि शिक्षण क्षेत्रातील योगदानाबद्दल देवांग व्ही. खाखर यांना जीवनगौरव पुरस्काराने गौरविण्यात आले.

पुरस्कार निवड समितीचे अध्यक्षपद कोणी भूषवले?

यंदाच्या पुरस्कार निवड समितीचे अध्यक्षपद पद्मविभूषण डॉ. रघुनाथ अ. माशेलकर यांनी भूषवले.

'जडेजा जबरदस्त ऑलराउंडर, पण...' चार वेगवान गोलंदाजांच्या प्लॅनवर बहुतुलेंनी सांगितली Team India ची इनसाइड स्टोरी

Health news: आजारांना दूर ठेऊन आरोग्याची काळजी घेण्यासाठी फुफ्फुसांची काळजी घेणे का गरजेचे बनत आहे?

'या' स्मार्टफोनचा लूक बदलला! 5000mAh बॅटरी, 120Hz डिस्प्ले आणि दोन नवे कलर ऑप्शन्स, काय आहे 5G फोनची किंमत?

महागड्या SUV कशाला? कमी बजेटमध्ये दमदार टर्बो इंजिन देणाऱ्या या 5 गाड्या पाहाच

डिलिमिटेशन बिलामुळे मविआमध्ये वादाची ठिणगी? शरद पवारांच्या राष्ट्रवादीविरोधात काँग्रेस अन् ठाकरे गट आक्रमक