MSRTC (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)  
Career

MSRTC: एसटी महामंडळाचा विद्यार्थ्यांसाठी नवा प्लॅन! आता शाळा-महाविद्यालयांच्या बस धावणार विनावाहक

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या छत्रपती संभाजीनगर विभागाने 27 नोव्हेंबरपासून शालेय एसटी बस फेऱ्या विनावाहक चालवण्याचा निर्णय घेतला आहे. या फेऱ्यांमध्ये चालक कम वाहकाला ETI मशीन देऊन वाहन चालवण्यासोबतच तिकीट विक्रीची जबाबदारीही दिली जाणार आहे.

Riddhi Vanne
  1. 27 नोव्हेंबरपासून शालेय एसटी फेऱ्या विनावाहक धावणार.

  2. चालक कम वाहकाकडे ETI मशीन आणि तिकीट विक्रीची जबाबदारी.

  3. एसटी कर्मचारी संघटनेचा निर्णयाला विरोध; विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न उपस्थित.

MSRTC Conductorless Student Bus Service from 27th November : विद्यार्थी सुरक्षितपणे शाळेत पोहोचावेत म्हणून स्कूल बसमध्ये एक मदतनीस असणं आता बंधनकारक केलं. पण दुसरीकडे पासवर एसटीने प्रवास करणाऱ्या मुलांसाठी मात्र बस वाहकाशिवाय चालवायचा निर्णय एसटी विभागाने घेतला आहे. या निर्णयाने एसटीचे चालक आणि कर्मचारी चांगलेच नाराज झाले. चालक-वाहकांवर असा नियम लादू नये, अशी मागणी आता संघटनांकडून केली जात आहे.

• आदेशात नेमकं काय म्हटलं?

छत्रपती संभाजीनगर विभागाच्या नियंत्रकांनी 23 नोव्हेंबरला विनावाहक शालेय वाहतूक करण्याबाबतचे आदेश काढले. त्यात चालक कम वाहकाला ETI मशीन देऊन त्यानेच विद्यार्थी वाहतूक करावी, असं सांगितलं. व्यवस्थापकीय संचालकांच्या 3 नोव्हेंबर आणि 17 नोव्हेंबरच्या व्हिडिओ बैठकीत दिलेल्या सूचनांनुसार हा निर्णय घेतल्याचं आदेशात म्हटलंय.27 नोव्हेंबरपासूनच्या शालेय फेऱ्या वाहकाशिवायच चालवाव्यात, असंही त्यात स्पष्ट केलं. या फेऱ्यांसाठी चालक कम वाहकाची नेमणूक करावी, असंही आदेशात लिहिलंय. शिवाय, या फेऱ्या चालवताना प्रती किमी मिळणाऱ्या उत्पन्नात घट होणार नाही याची काळजी घेऊन त्याचा अहवाल कार्यालयात द्यावा, अशी सूचनाही करण्यात आली.

• बाबासाहेब सोळुंके यांचा विरोध

या निर्णयाला एसटी कामगार संघटनेचे विभागीय अध्यक्ष बाबासाहेब सोळुंके यांनी थेट विरोध दर्शवलाय. यामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह येईल, प्रवासी सेवेचा दर्जा घसरेल आणि कर्मचाऱ्यांवरचा ताण वाढेल, असं त्यांचं म्हणणं आहे. त्यामुळे 23 नोव्हेंबरचा आदेश तात्काळ मागे घ्यावा, अशी मागणी संघटनेने केली.

• मुलांची सुरक्षा धोक्यात येणार?

शाळेच्या फेऱ्यांमध्ये लहान मुलांची खूप गर्दी असते. वाहक नसेल तर चढताना-उतरताना मुलांकडे लक्ष कोण देणार? एकाच माणसाला गाडी पण चालवायची आणि तिकीट पण द्यायचं, म्हटल्यावर अपघाताचा धोका वाढणारच. शिवाय मुलांमध्ये कधी भांडण झालं तर ते सांभाळणार कोण, असा सवालही उपस्थित होतो.

• कारवाईची भीती कर्मचाऱ्यांना

एसटी महामंडळाच्या शिस्त आणि अपील नियमांनुसार तिकीट आणि ETI मशीनबाबतचे नियम खूप कडक आहेत. गर्दीत प्रवासी घेतले, तिकीट द्यायला उशीर झाला किंवा कोणी विनातिकीट सापडला, तर चालक-वाहकावर थेट निलंबनासारखी कारवाई होऊ शकते. याची भीती संघटनेने व्यक्त केली.

• एकाच माणसाकडून दोन कामं कशी होणार?

एकीकडे प्रती किमी उत्पन्न (EPKM) कमी होऊ देऊ नका, अशी अट आहे. दुसरीकडे गर्दीच्या फेरीत एकाच कर्मचाऱ्याने गाडी चालवायची आणि तिकीट पण विकायचं, हे कसं शक्य होणार? यामुळे कर्मचाऱ्यांवर प्रचंड मानसिक ताण येईल आणि कामाचं वातावरण बिघडेल, अशी भीती व्यक्त केली जातेय.आता प्रशासन हा आदेश मागे घेतंय की चालकांवरच हा भार टाकतंय, याकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिलं.

भारतात सुरू होणार Apple चे सातवे अधिकृत रिटेल स्टोअर, कंपनीने केली या शहराची निवड

इन्स्टाग्रामवर मैत्री, गणपती दर्शनाच्या बहाण्याने तरुणीला बोलावले अन्...; पुण्यातील धक्कादायक प्रकार

Alpana art: अल्पना आर्टचा वाढतोय ट्रेंड! जाणून घ्या बंगालच्या या पारंपरिक कलेचे महत्त्व आणि खास वैशिष्ट्ये

अमरावती विमानतळावरून रात्रीच्या विमानसेवेचा मार्ग अखेर मोकळा; आता केवळ अंतिम मंजुरीची प्रतीक्षा

Israel : इस्रायलमध्ये सत्तांतराची नांदी! आयझेनकोट आणि गोलान यांच्यात युती; अरब पक्ष 'रा'आम'ही सरकारमध्ये सामील होणार?