प्रेमाच्या जाळ्यात ओढून अल्पवयीन मुलीवर वेळोवेळी अत्याचार (File Photo : Crime) 
क्राईम

धक्कादायक ! लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर लैंगिक अत्याचार; 5 वर्षांपासून प्रकार होता सुरु

निखिलने 2018 मध्ये 24 वर्षीय तरुणीला प्रेमजाळ्यात अडकविले. त्यानंतर लग्नाचे आमिष दाखवून त्याने पाच ते सहा वर्षांपासून वारंवार तिच्यासोबत शारीरिक संबंध प्रस्थापित केले. दरम्यान, निखिलचे दुसऱ्या एका तरुणीसोबत लग्न जुळले.

कृपादान आवळे

अमरावती : लग्नाचे आमिष दाखवून एका तरुणीवर लैंगिक अत्याचार करण्यात आल्याची घटना बेनोडा ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आली. याप्रकरणी पीडित तरुणीच्या तक्रारीवरून आरोपी निखिल दीपक सलामे (वय 34, रा. वरूड) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

निखिलने 2018 मध्ये 24 वर्षीय तरुणीला प्रेमजाळ्यात अडकविले. त्यानंतर लग्नाचे आमिष दाखवून त्याने पाच ते सहा वर्षांपासून वारंवार तिच्यासोबत शारीरिक संबंध प्रस्थापित केले. दरम्यान, निखिलचे दुसऱ्या एका तरुणीसोबत लग्न जुळले. याबाबत माहिती मिळाताच पीडित तरुणीने निखिलला लग्नाबाबत विचारणा असता त्याने नकार दिला. त्यामुळे पीडित तरुणीने बेनोडा ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी निखिलविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास सुरू आहे.

पुण्यातील आळंदीत अत्याचाराची घटना

वारकरी सांप्रदायासाठी विशेष ओळख असलेल्या देवाच्या आळंदीतून धक्कादायक बातमी समोर आली आहे. पिंपरी चिंचवडमध्ये वारकरी शिक्षण संस्थेकडून चालवल्या जाणाऱ्या एका खासगी शाळेत दोन अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार केल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. पाहणे म्हणून आलेल्या एका नराधमाने दोन मुलींवर अत्याचार केला. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला बेड्याही ठोकल्या. ही घटना ताजी असतानाच देवाच्या आळंदीतच वारकरी शिक्षण संस्थेच्या शाळेत 13 वर्षीय मुलीचा विनयभंग केल्याचा प्रकार समोर आला आहे.

मनोरुग्ण महिलेवर लैंगिक अत्याचार

पुण्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. सुश्रुषेसाठी ठेवलेल्या कामगाराने मनोरुग्ण महिलेवर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसांनी कामगाराला अटक केली आहे. याबाबत पीडित महिलेने भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानूसार, पोलिसांनी ३४ वर्षीय तरुणाला अटक केली आहे.

फक्त २ गुंठे जमिनीचा वाद अन् रक्तरंजित खेळ! मंदार किवळेसोबत शुभम चव्हाण खून प्रकरणात आणखी कोणते तीन आरोपी अडकले?

भाऊ, Hitman is Back! रोहित शर्माच पुन्हा मुंबई इंडियन्सचा कर्णधार? MI च्या एका फोटोने सोशल मीडियावर धुमाकूळ

Repo Rate Update: 'महागाई रोखण्यासाठी रेपो दर...' ! गोखले संस्थेच्या विद्यार्थी समितीची शिफारस

Sankashti Chaturthi: संकष्टी चतुर्थीच्या दिवशी काय खावे आणि काय टाळावे, जाणून घ्या नियम

Fashion: पश्मीना शाल खरेदी करताय? जाणून घ्या तिचे वैशिष्ट्य, प्रकार आणि ओळखण्याच्या 'या' खास टिप्स