wagholi crime news 
क्राईम

मला व्यसनमुक्ती केंद्रात का पाठवले? म्हणत पतीचा संताप; पत्नीवर स्वयंपाकघरातील चाकूने वार

व्यसनमुक्ती केंद्रातून परतल्यानंतर राग मनात धरून पतीने पत्नीशी वाद घालत तिच्यावर स्वयंपाकघरातील चाकूने वार केल्याची धक्कादायक घटना वाघोली परिसरात घडली आहे.

Dnyaneshwar more

पुणे : पतीचे दारूचे व्यसन सुटावे आणि त्याचे संसाराकडे लक्ष लागावे, या उद्देशाने पत्नीने नातेवाईकांच्या मदतीने त्याला व्यसनमुक्ती केंद्रात दाखल केले. मात्र, व्यसनमुक्ती केंद्रातून परतल्यानंतर याच गोष्टीचा राग मनात धरून पतीने पत्नीशी वाद घालत तिच्यावर स्वयंपाकघरातील चाकूने वार केल्याची धक्कादायक घटना वाघोली परिसरात घडली आहे. या हल्ल्यात पत्नीच्या बोटांना दुखापत झाली असून, याप्रकरणी पतीविरुद्ध पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

राजेश पोपट वडघुले (वय ३८, रा. वास्तू गोल्ड सोसायटी, बायएफ रस्ता, वाघोली) असे गुन्हा दाखल झालेल्या पतीचे नाव आहे. याबाबत त्याची पत्नी सोनाली (वय ३३) यांनी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राजेश याला दारूचे व्यसन आहे. त्याचे व्यसन सुटावे आणि त्याला व्यसनमुक्त जीवन जगता यावे, यासाठी पत्नी सोनाली यांनी नातेवाईकांच्या मदतीने त्याला व्यसनमुक्ती केंद्रात दाखल केले होते. काही काळ व्यसनमुक्ती केंद्रात राहिल्यानंतर तो पुन्हा घरी परतला होता.

दरम्यान, २५ नोव्हेंबर रोजी रात्री साडेदहाच्या सुमारास राजेश याने पत्नी सोनाली यांच्याशी वाद घालण्यास सुरुवात केली. मला व्यसनमुक्ती केंद्रात का पाठवले, असा जाब विचारत त्याने पत्नीशी भांडण केले. या वादाचे रूपांतर पुढे हिंसक घटनेत झाले. संतापलेल्या राजेश याने स्वयंपाकघरातील चाकू उचलून पत्नीच्या बोटांवर वार केले. अचानक झालेल्या या हल्ल्यात सोनाली यांच्या बोटांना दुखापत झाली.

या घटनेनंतर पीडित पत्नीने पोलिसांकडे धाव घेत तक्रार दाखल केली. तक्रारीच्या आधारे पोलिसांनी पती राजेश वडघुले याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस हवालदार ठोंबरे करीत आहेत. व्यसनाधीन व्यक्तीच्या उपचारासाठी कुटुंबीयांनी केलेल्या प्रयत्नांनंतरही अशा प्रकारे हिंसक प्रतिक्रिया उमटल्याने वाघोली परिसरात या घटनेची चर्चा सुरू आहे.

वाघोलीत पतीने पत्नीवर चाकूने हल्ला का केला?

आरोपी राजेश वडघुले याला दारूचे व्यसन होते. त्याचे व्यसन सुटावे म्हणून पत्नीने नातेवाईकांच्या मदतीने त्याला व्यसनमुक्ती केंद्रात पाठवले होते. याचाच राग मनात धरून त्याने पत्नीशी वाद घालत हल्ला केला.

ही घटना नेमकी कधी आणि कुठे घडली?

२५ नोव्हेंबर रोजी रात्री साडेदहाच्या सुमारास वाघोली येथील वास्तू गोल्ड सोसायटी परिसरात ही घटना घडली.

या हल्ल्यात पत्नीला कोणती दुखापत झाली आणि पोलिसांनी काय कारवाई केली?

पतीने स्वयंपाकघरातील चाकूने पत्नीच्या बोटांवर वार केल्याने ती जखमी झाली. याप्रकरणी पत्नी सोनाली यांनी तक्रार दिल्यानंतर पती राजेश वडघुले याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस हवालदार ठोंबरे करीत आहेत.

Defence Stocks : डिफेंस शेअर्समध्ये तुफानी तेजी! BEML तब्बल 17% उसळला; BDL आणि HAL मध्येही जोरदार खरेदी, काय आहे कारण?

अकोल्यात मजुरांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर; उंच इमारतीवर सुरक्षा साधनांविना मजुरांचे काम

'सिलेक्टर्स, प्लीज आता...'; Vaibhav Suryavanshi बाबत श्रीकांत यांचा निवड समितीला 'हा' इशारा?

Mrudgandha Awards 2026 : ‘मृद्गंध पुरस्कार २०२६’ सोहळा दिमाखात संपन्न; पं. सुरेश तळवलकरांसह दिग्गज कलाकारांचा गौरव

Nagpur News : पॅरामेडिकल शिक्षण घेतले, रोजगाराची हमी कधी ? प्रादेशिक पॅरामेडिकल संस्था अनेक वर्षांपासून रखडली