सौजन्य फोटो - AI Gemini  Mahindra Thar Drag Cop
क्राईम

काळ्या काचा अन् फॅन्सी नंबर प्लेटच्या थारने वाहतूक पोलिसाच्या अंगावर घातली गाडी; बोनेटवरून ५० फूट...

काळ्या काचा आणि फॅन्सी नंबर प्लेटच्या थारने वाहतूक पोलिसाच्या अंगावर घातली गाडी अन् बोनेटवरून ५० फूट फरफटत नेलं! बारामतीतील सम्यक चौकात खळबळ; फरार चालकाचा शोध सुरू. Baramati Mahindra Thar Drag Cop, Samyak Chowk Baramati Incident, Traffic Police Injured Baramati, Dhiraj Shedge Baramati Police, MH 53 A 4400 Thar News, बारामती बातमी, वाहतूक पोलीस हल्ला

Sanofar Nayakawadi
  • थार चालकाने वाहतूक पोलिसाच्या अंगावर गाडी घालून ५० फूट फरफटत नेले

  • ई-चलनसाठी फोटो काढताच चालकाने गाडी अंगावर घातल्याने जखमी

  • बारामती शहर पोलिसांनी तपासात धीरज शेडगे गाडी चालवत असल्याचे निष्पन्न करत त्याचा शोध सुरू.

पुणे: काळ्या काचा आणि फॅन्सी नंबर प्लेट असलेली एक महिंद्रा थार रस्त्यावर रूबाबात धावताना दिसली. हे पाहून वाहतूक पोलिसांनी वाहनाचा फोटो काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, चालकाने धक्कादायक कृत्य करत क्रूरतेच्या सीमा ओलांडल्या. महिंद्रा थार जीपचालकाने कारवाईसाठी थांबवणाऱ्या वाहतूक पोलिसाच्या थेट अंगावर वाहन घातलं. यानंतर त्यांना बोनेटवरून सुमारे ५० फूट फरफटत नेल्याची अत्यंत धक्कादायक घटना बारामतीतील सम्यक चौकात घडली आहे. या घटनेत वाहतूक शाखेचे पोलीस अंमलदार दत्तात्रेय भोसले जखमी झाले आहेत, तर चालक वाहनासह पसार झाला आहे.

नेमका कसा घडला थरार?

बुधवारी (ता. २५) सायंकाळी पाचच्या सुमारास दत्तात्रेय भोसले सम्यक चौकात कर्तव्य बजावत होते. यावेळी तिथे एक थार आली. काळ्या काचा आणि फॅन्सी नंबर प्लेट असलेल्या महिंद्रा थारला (MH 53 A 4400) त्यांनी थांबण्याचा इशारा केला. भोसले ई-चलन मशीनद्वारे वाहनाचा फोटो काढत असताना चालकाने अचानक वेग वाढवून जीप थेट त्यांच्या अंगावर घातली. धडकेत ते बोनेटवर फेकले गेले. मात्र हे पाहूनही न थांबता चालकाने त्यांना ४० ते ५० फूट फरफटत नेलं. काही अंतरावर तोल जाऊन भोसले रस्त्यावर कोसळले आणि त्यांच्या डाव्या हाताला आणि पायाला दुखापत झाली.

चालक पसार; धीरज शेडगेचा शोध सुरू

या घटनेनंतर चालक थारसह घटनास्थळावरून पसार झाला. जखमी दत्तात्रेय भोसले यांच्या फिर्यादीवरून बारामती शहर पोलिसांनी तपास सुरू केला. वाहनमालकाशी संपर्क साधल्यानंतर घटनेवेळी त्यांचा मुलगा धीरज शेडगे गाडी चालवत असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी धीरज शेडगेविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली असून, त्याचा शोध घेतला जात आहे. कर्तव्यावर असलेल्या वाहतूक पोलिसासोबत घडलेल्या या धक्कादायक घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

बारामतीत वाहतूक पोलिसाच्या अंगावर गाडी घालण्याची घटना कोठे घडली?

ही घटना बारामतीतील सम्यक चौकात बुधवारी सायंकाळी पाचच्या सुमारास घडली.

या घटनेत कोणता पोलीस कर्मचारी जखमी झाला?

वाहतूक शाखेचे पोलीस अंमलदार दत्तात्रेय भोसले हे या घटनेत जखमी झाले असून, त्यांच्या डाव्या हाताला आणि पायाला दुखापत झाली आहे.

पोलिसांनी या प्रकरणात कोणाचा शोध सुरू केला आहे?

वाहनमालकाच्या संपर्कातून घटनेवेळी त्यांचा मुलगा धीरज शेडगे थार चालवत असल्याचे समोर आले असून, पोलिसांनी त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करून त्याचा शोध सुरू केला आहे.

Revanath Maharaj: नवनाथांपैकी सातवे सिद्ध गुरू रेवणनाथ; जाणून घ्या जन्मकथा, गुरुभेट आणि संजीवन समाधीचे महत्त्व

Mandar Kiwale Assisination Case:दिसला की तोडला! सख्ख्या भावानेच रचला कट! मंदार किवळेच्या हल्ल्यामागचे खरे कारण समोर

Soup Recipe: लहान मुलं भाज्या खाण्यास नकार देतात? मग थंडीच्या दिवसांमध्ये झटपट बनवा हेल्दी टेस्टी व्हेजिटेबल स्टॉक मंचाव सूप

Constitution Day : 26 नोव्हेंबर 1949 ला नेमकं काय घडलं होतं? जाणून घ्या संविधान दिनाचा संपूर्ण रंजक इतिहास

24 तासांच्या आऊटेजनंतर Microsoft लागू केला 'Code Red', इंजीनियरिंग सिस्टिम आणि क्राइसिस रिस्पॉन्समध्ये होणार बदल...