दुकानातील 'चेंजिंग रूम'मध्ये छुप्या कॅमेरातून शुटिंग; दुकान मालक अटकेत 
क्राईम

दुकानातील 'चेंजिंग रूम'मध्ये छुप्या कॅमेरातून शुटिंग; दुकान मालक अटकेत

स्टोअर रूममध्ये सीसीटीव्ही कॅमेरा असल्याची जाणीव असूनही आरोपीने महिलेला कपडे बदलताना जाणीवपूर्वक चित्रीकरण केले.

कृपादान आवळे

पिंपरी : कामशेत येथील एका दुकानात महिलेला कपडे बदलण्यासाठी पाठवून तिचे गुप्त चित्रीकरण केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी कामशेत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपीला अटक करण्यात आली आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, १६ मार्च रोजी दुपारी सुमारे २.३० ते ३.०० वाजण्याच्या दरम्यान कामशेत येथील मुकेश फॅन्सी कॉर्नर या दुकानात हा प्रकार घडला. दुकानाचे मालक मुकेश मुथा (रा. कामशेत, ता. मावळ, जि. पुणे) यांनी पीडित महिलेला दुकानाच्या स्टोअर रूममध्ये कपडे बदलण्यासाठी पाठवले. स्टोअर रूममध्ये सीसीटीव्ही कॅमेरा असल्याची जाणीव असूनही आरोपीने महिलेला कपडे बदलताना जाणीवपूर्वक चित्रीकरण केले. यामुळे पीडितेच्या मनास लज्जा उत्पन्न होईल, असे कृत्य करत तिचा विनयभंग करण्यात आला. तसेच पीडितेला दमदाटी केल्याचाही आरोप आहे.

या प्रकरणी विविध कलमांखाली कामशेत पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पीडितेच्या फिर्यादीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर प्रकरणाचा तपास पोलीस हवालदार लोसरवर करत असून, प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक आकाश पवार यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई सुरू आहे. दरम्यान, आरोपी मुकेश मुथा याला अटक करून आज वडगाव मावळ येथील न्यायालयात हजर करण्यात आले आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.

नाशिकमध्ये लैंगिक शोषणाचे प्रकरण

नाशिकच्या एका नामांकित बहुराष्ट्रीय आयटी (IT) कंपनीत लैंगिक शोषण आणि धर्मांतर प्रकरणाचा पर्दाफाश झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणाच्या सखोल तपासात धक्कादायक गोष्टी आढळून आल्या आहेत. या कंपनीमध्ये तरुणींचे पद्धतीशपणे ब्रेनवॉश करून त्यांचे धर्मांतर करण्याचे मोठे षडयंत्र या कंपनीत सुरू असल्याचे आढळून आले आहे.

पुण्याच्या क्रिकेट मैदानात MES क्लबचा दबदबा! अभिषेक ठाकुर करंडक स्पर्धेत विजयांची हॅट्ट्रिक

Jio Recharge Plan: प्लॅन एक, फायदे अनेक! एकाच रिचार्जमध्ये मिळणार डेटा, कॉलिंग अन् ओटीटी... इतकी आहे किंमत

Breakup & Moving On: ब्रेकअपनंतर स्वतःला कसे सावराल? नात्यातून बाहेर पडण्यासाठी फॉलो करा 'या' खास टिप्स!

Milk Price Hike : सर्वसामान्यांच्या खिशाला पुन्हा कात्री! शेतकऱ्यांच्या मागणीमुळे ग्राहकांचं वाढलं टेन्शन; दूध आणखी महागणार?

Sheikh Hasina : शेख हसीना १६ डिसेंबरला बांगलादेशात परतणार? दिल्लीतून ढाक्याला जाण्यासाठी केली सरकारी विमानाची मागणी