कारमधून 'ते' दोघे आले, अल्पवयीन मुलीला कारमध्ये बसवलं अन् नंतर...; अपहरणाचा थरारक प्रकार समोर संग्रहित फोटो
क्राईम

कारमधून 'ते' दोघे आले, अल्पवयीन मुलीला कारमध्ये बसवलं अन् नंतर...; अपहरणाचा थरारक प्रकार समोर

पोलिसांनी असा दबाव टाकल्याचा आरोप होत आहे. यामुळे गुन्हा दाखल करण्यास दीड दिवसाचा विलंब झाला. अपहरणासाठी वापरलेली कारही पोलिसांनी सोडून दिली, तसेच संशयितांना चौकशी करून सोडल्याचा दावाही पीडितेच्या कुटुंबीयांनी केला आहे.

Krupadan Awale
  • नागपूरमधील जुनी कामठी पोलीस ठाण्याच्या हद्दीत अपहरणाची घटना समोर.

  • १४ वर्षीय मुलीला दोन तरुणांनी फूस लावून कारमध्ये बसवल्याचा आरोप.

  • मुलीला ड्रॅगन पॅलेसच्या दिशेने नेण्यात आले.

नागपूर : जुनी कामठी पोलिस ठाण्याच्या हद्दीत 14 वर्षीय मुलीचे कारमधून अपहरण झाल्याची घटना समोर आली आहे. दोन तरुणांनी फूस लावून मुलीला कारमध्ये बसवले आणि ड्रॅगन पॅलेसच्या दिशेने नेले. मुलीच्या कुटुंबीयांनी कारचा पाठलाग केला; मात्र चालकाने त्यांच्या रिक्षाला कट मारून कार पळवली. काही वेळानंतर मुलगी स्वतःहून घरी परतली. या घटनेनंतर कुटुंबीयांनी पोलिसांकडे तक्रार केली.

पोलिसांनी असा दबाव टाकल्याचा आरोप होत आहे. यामुळे गुन्हा दाखल करण्यास दीड दिवसाचा विलंब झाला. अपहरणासाठी वापरलेली कारही पोलिसांनी सोडून दिली, तसेच संशयितांना चौकशी करून सोडल्याचा दावाही पीडितेच्या कुटुंबीयांनी केला आहे. विजय विक्रम लक्षणे (२१, रा. मच्छीपूल, कामठी) आणि करण संजू गटलेवार (२१, रा. येरखेडा) अशी संशयितांची नावे आहेत. या घटनेची माहिती पोलिसांना दिल्यानंतर रात्री सीसीटीव्ही फुटेजची तपासणी शक्य नसल्याचे सांगून कुटुंबीयांना शुक्रवारी सकाळी पोलिस ठाण्यात बोलावण्यात आले. मात्र, दिवसभर चौकशी सुरूच राहिली.

दरम्यान, शनिवारी पहाटे त्यांना गुन्ह्याची प्रत देण्यात आली. गुन्हा दाखल करण्यास दीड दिवस लागल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. पीडितेच्या आजोबांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणात सुरुवातीपासूनच एका महिलेचा दबाव असल्याचा संशय आहे. संबंधित कार त्या महिलेची असून विजय तिच्याकडे चालक म्हणून काम करतो. अपहरणासाठी वापरलेली कार पोलिसांनी तातडीने सोडून दिली. दोन्ही संशयितांना पोलिस ठाण्यात चौकशीसाठी बोलावून नंतर सोडण्यात आल्याचा दावाही त्यांनी केला.

पीडित मुलगी आठवीत घेते शिक्षण

मिळालेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी आठव्या वर्गात शिकते. तिचे वडील रिक्षाचालक आहेत. गुरुवारी रात्री साडेअकराच्या सुमारास मुलीचे वडील कामानिमित्त मोटर स्टँड चौकात गेले होते. त्याचवेळी त्यांच्या साळ्याचा फोन आला. मुलगी एका कारमध्ये बसून जात असल्याचे त्यांनी सांगितले. माहिती मिळताच वडील रिक्षाने घटनास्थळी पोहोचले आणि कारचा पाठलाग सुरू केला. मात्र, खलासी लाइन परिसरात कारचालकाने रिक्षाला कट मारून पळ काढला. काही वेळानंतर मुलगी घरी परतली. विचारपूस केली असता विजय आणि त्याच्या साथीदाराने तिला कारमधून ड्रॅगन पॅलेसच्या दिशेने नेल्याचे आणि परत आणून सोडल्याचे तिने सांगितले.

FAQ (वारंवार विचारले जाणारे प्रश्न)

प्रश्न 1 : नागपूरमध्ये अपहरणाची घटना कुठे घडली?

उत्तर : नागपूरमधील जुनी कामठी पोलीस ठाण्याच्या हद्दीत १४ वर्षीय मुलीच्या अपहरणाची घटना घडल्याचे समोर आले आहे.

प्रश्न 2 : अपहरण झालेल्या मुलीचे वय किती आहे?

उत्तर : संबंधित मुलगी १४ वर्षांची आहे.

प्रश्न 3 : मुलीला कारमध्ये कोणी बसवले?

उत्तर : विजय विक्रम लक्षणे (२१) आणि करण संजू गटलेवार (२१) या दोन तरुणांनी फूस लावून मुलीला कारमध्ये बसवल्याचा आरोप आहे.

पायात अशक्तपणा, मुंग्या, बधिरपणा जाणवतो? मणक्याच्या आजारांची लागण झाल्यानंतर दिसून येतात 'ही' गंभीर लक्षणे

Todays Gold-Silver Price: मुंबई, पुणे, नाशिकसह प्रमुख शहरांत सोन्याचे दर काय? एका क्लिकवर जाणून घ्या 22 आणि 24 कॅरेटचा भाव

Numberlogy: मूलांक ४ असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस कसा राहील जाणून घ्या

तुकाराम मुंढेंचा FDA च्या सहाय्यक आयुक्तालाच दणका; निष्काळजीपणामुळे थेट निलंबितच केलं

Delimitation Bill : फेररचनेनंतर लोकसभेतील सदस्यसंख्या 273 ने वाढणार; एकूण संख्या 543 वरून 816 वर जाणार