सौजन्य फोटो - सोशल मिडीया  Pune Court Attack
क्राईम

पुणे कोर्ट हल्ल्यामागील धक्कादायक ट्विस्ट! पहिलं टार्गेट होतं..., पण किवळे बाहेर येताच बदलला प्लॅन.

पहिले टार्गेट अमर साकोरे होते, पण किवळे बाहेर येताच बदलला प्लॅन! पुणे कोर्टाबाहेर गोळीबार व कोयत्याने हल्ल्यात दोन्ही हात छाटले; जबाबपत्रावर पायाचा अंगठा उमटवून ससूनमध्ये उपचार सुरू.

Sanofar Nayakawadi
  • हल्ल्यात किवळेचे दोन्ही हात छाटले गेले असून, जबाबपत्रावर पायाचा अंगठा उमटवून उपचार सुरू

  • पहिले टार्गेट अमर साकोरे होते, मात्र साकोरेला जामीन न मिळता किवळे बाहेर आल्याने कोर्टाबाहेर हल्ला

  • कात्रजमधील दोन गुंठे जागेच्या वादातून झालेल्या शुभम चव्हाणच्या हत्येप्रकरणी नऊ जणांना ताब्यात

पुणे: बुधवारी दुपारी पुण्यातील शिवाजीनगर कोर्टाच्या बाहेर एक रक्तरंजित घटना घडली. दोन दुचाकीवरून आलेल्या सहा जणांनी मंदार किवळे नावाच्या तरुणावर जीवघेणा हल्ला केला. आरोपींनी आधी बंदुकीतून गोळीबार केला. त्यानंतर कोयत्याने मंदार किवळेवर सपासप वार केले. हा हल्ला इतका भयंकर होता की या हल्ल्यात मंदारचे दोन्ही हात छाटले गेल्याची माहिती आहे. शिवाय त्याच्या डोक्यावर आणि पाठीवर देखील गंभीर वार आहेत.

रक्तबंबाळ अवस्थेत रस्त्यावर; पायाचा अंगठा उमटवला

या हल्ल्याची काही व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. ज्यात मंदार किवळे रक्तबंबाळ अवस्थेत रस्त्याच्या कडेला पडलेला दिसत आहे. सध्या त्याच्यावर पुण्यातील ससून रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्याची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आहे. त्याचे दोन्ही हात आणि अंगठ्याला दुखापत झाल्याने पोलीस जबाबपत्रावर त्याच्या पायाचा अंगठा उमटवण्यात आला आहे.

नऊ जण ताब्यात; पहिलं टार्गेट मंदार नव्हता?

या प्रकरणी पोलिसांनी नऊ जणांना ताब्यात घेतलं आहे. यात एका अल्पवयीन मुलाचा देखील समावेश आहे. सर्वांची कसून चौकशी सुरू आहे. या चौकशीतून मंदार किवळेबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार हल्लेखोरांचं पहिलं टार्गेट हा मंदार किवळे नव्हता तर त्याचा दुसरा साथीदार होता, जो शुभम चव्हाण प्रकरणात किवळेसोबत होता, अशी माहिती समोर आली आहे.

संपूर्ण प्रकरण काय? प्लॅन अचानक कसा बदलला?

या प्रकरणाला सुरुवात झाली ती एप्रिल २०२५ मध्ये. शुभम आणि अक्षय चव्हाण यांच्या कुटुंबीयांची संतोषनगर कात्रज भागात दोन गुंठे जागा आहे. ती जागा चुलते अमोल चव्हाण यांनी २०२१ मध्ये विकत घेतल्याचं सांगितलं जातं. त्याच जागेवर ७ एप्रिल २०२५ रोजी कोणीतरी योगेश दत्तात्रय निंबाळकर नावाच्या मालकी हक्काचा बोर्ड लावला. ११ एप्रिल रोजी चव्हाण कुटुंबीयांनी तो बोर्ड काढून टाकला. १२ एप्रिल रोजी परत अमोल चव्हाण यांना समजले की त्यांच्या जागेत परत कोणीतरी पत्र्याचे शेड मारत आहे. ते कल्याण ठाणे येथे होते. त्यांनी पोलीस मदतीसाठी ११२ ला कॉल करून त्यांचा भाऊ सुभाष यांना माहिती दिली. त्यांनी ते पत्र्याचे शेड काढून टाकले.

याच जागेच्या वादातून अमर साकोरे आणि त्याच्या साथीदारांनी चव्हाण यांच्या घरी येऊन शिवीगाळ केली. अमोल व शुभम कुठे आहेत, आमच्या जागेत येऊन आम्हाला नडतो, तुला जीवंत ठेवणार नाही, अशी धमकी दिली. तेव्हा शुभम घरी नव्हता. पहाटे पावणेचार वाजण्याच्या सुमारास शुभमचा साकोरे आणि किवळे यांच्यासोबत जागेच्या कारणातून वाद झाला. त्यावेळी आरोपींनी शुभमला लाकडी बांबू आणि स्टंपने मारहाण केली. त्यातच शुभमचा मृत्यू झाला. याप्रकरणी पोलिसांनी किवळेसह शुभमच्या हत्याकांडातील मुख्य सूत्रधार अमर साकोरेला अटक केली. दोघंही तुरुंगात होते.

पहिले टार्गेट अमर साकोरे होते, अचानक प्लॅन बदलला

शुभम चव्हाणच्या खुनाचा बदला घेण्यासाठी शुभमचा भाऊ अक्षय आणि साथीदार आरोपींची कारागृहातून बाहेर येण्याची वाट पाहात होते. त्यांना अगोदर साकोरेचा काटा काढायचा होता. त्यासाठी आरोपींनी वर्षभरापासून प्लॅनिंग केलं होतं. मात्र त्याला अद्याप जामीन मिळाला नाही. अशातच काही दिवसांपूर्वी किवळेला या प्रकरणात जामीन मिळाला. भावाच्या हत्येत सामील असलेला किवळे बाहेर आल्याची माहिती मिळताच अक्षय चव्हाण आणि त्याच्या साथीदारांनी आपलं टार्गेट बदललं. मंदार किवळेवर पाळत ठेवायला सुरुवात केली.

दरम्यान, बुधवारी २५ नोव्हेंबरला मंदार किवळे शिवाजीनगर येथील कोर्टात तारखेला येणार असल्याची माहिती हल्लेखोरांना मिळाली. त्यामुळे त्यांनी कोर्टाच्या बाहेरच किवळेला संपवण्याचा प्लॅन केला. त्यानुसार त्यांनी जीवघेणा हल्ला देखील केला. मात्र या हल्ल्यातून मंदार थोडक्यात बचावला आहे. त्याच्यावर ससून रुग्णालयात उपचार सुरू आहेत; मात्र त्याची प्रकृती अजूनही चिंताजनक असल्याचं सांगितलं जात आहे.

Climate Change : मुसळधार पाऊस पडूनही नद्या आणि तलाव का पडत आहेत कोरडे ? जगभरातील नद्यांचा प्रवाह 5.7 टक्क्यांनी घटला

पुण्यातील वाढत्या गुन्हेगारीनंतर पालकमंत्री सुनेत्रा पवार अॅक्शन मोडमध्ये! आढावा बैठक घेत दिले 'हे' निर्देश, म्हणाल्या, "हे खपवून..."

IND vs NZ: एका खेळीत विक्रमांची रांगच पार! केन विल्यमसनला पछाडलं, कोहलीलाही टाकलं मागे; Tom Lathamची WTC मध्ये ऐतिहासिक कामगिरी

Delimitation and Women Reservation Bill: मोदी सरकारचा मोठा डाव यशस्वी; ठाकरे-पवारांनंतर काँग्रेसचे खासदारही भाजपच्या गळाला?

मला व्यसनमुक्ती केंद्रात का पाठवले? म्हणत पतीचा संताप; पत्नीवर स्वयंपाकघरातील चाकूने वार