सौैजन्य फोटो - सोशल मिडीया  Court Firing News
क्राईम

फक्त २ गुंठे जमिनीचा वाद अन् रक्तरंजित खेळ! मंदार किवळेसोबत शुभम चव्हाण खून प्रकरणात आणखी कोणते तीन आरोपी अडकले?

शुभमच्या खुनाचा बदला घेतला!" पुण्याच्या शिवाजीनगर न्यायालयात जामिनावर सुटलेल्या मंदार किवळेवर गोळीबार अन् कोयत्याने जीवघेणा हल्ला! नऊ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

Sanofar Nayakawadi
  • जामिनावर सुटलेला मंदार किवळेवर गोळीबार अन् कोयत्याने हल्ला

  • शुभम चव्हाण याच्या खुनाचा बदला घेण्यासाठी हा जीवघेणा हल्ला

  • मंदार जखमी असून ससूनमध्ये उपचार सुरू आहेत; पोलिसांनी नऊ जणांविरोधात गुन्हा दाखल

पुण्याच्या शिवाजीनगर न्यायालयाच्या परिसरात मंदार किवळे याच्यावर पाच ते सहा जणांच्या टोळक्याने गोळीबार करून आणि कोयत्याने वार करत जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या हल्ल्यात मंदार किवळे गंभीर जखमी झाला असून, त्याच्यावर ससून रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या हल्ल्यामुळे शिवाजीनगर न्यायालय परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

शुभम चव्हाण खून प्रकरण नेमके काय?

मिळालेल्या माहितीनुसार, शुभम चव्हाण याच्या खुनाचा बदला घेण्यासाठी हल्लेखोरांनी मंदारवर हा प्राणघातक हल्ला केल्याचे प्राथमिक तपासात पुढे आले आहे. जमिनीच्या वादातून २० एप्रिल २०२५ रोजी कात्रज परिसरातील संतोषनगर येथे शुभम चव्हाण याचा खून करण्यात आला होता. या शुभम चव्हाण खून प्रकरणात मंदार मारुती किवळे हा मुख्य आरोपी होता. या प्रकरणी येरवाडा कारागृहात असलेला मंदार किवळे याला चार दिवसांपूर्वीच जामीन मिळाला होता आणि तो कारागृहातून बाहेर आला होता. आज न्यायालयीन कामकाजासाठी तो शिवाजीनगर न्यायालयात आला असता, ही दुर्दैवी घटना घडली. मंदार किवळे हा मूळचा कात्रजचा रहिवासी आहे

शुभम चव्हाण खून प्रकरणात नऊ जणांविरुद्ध गुन्हा

शुभम चव्हाण यांच्या खून प्रकरणी अमर दिलीप साकोरे, मंदार मारुती किवळे, गिरीश सुभाष बाबरे, योगेश बाबुराव डोरे अशा चार मुख्य आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल होता. हे सर्व आरोपी येरवाडा कारागृहात होते. यातील मंदार किवळे हा चार दिवसांपूर्वी जामिनावर सुटला होता. न्यायालयात तारीख असल्याने मंदार किवळे आज शिवाजीनगर न्यायालयात आला होता, तेव्हा त्याच्यावर पूर्ववैमनस्यातून हल्ला करण्यात आला. मंदार किवळे हल्ला प्रकरणात पोलिसांनी एकूण नऊ जणांविरोधात गुन्हा दाखल केला असून, मंदारचा जबाबही घेतला आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

पुण्याच्या शिवाजीनगर न्यायालयात कोणावर हल्ला झाला?

पुण्याच्या शिवाजीनगर न्यायालयाच्या परिसरात जामिनावर नुकताच सुटलेला मंदार मारुती किवळे याच्यावर हल्ला झाला.

मंदार किवळेवर हल्ला का करण्यात आला?

२० एप्रिल २०२५ रोजी कात्रज येथे झालेल्या शुभम चव्हाण याच्या खुनाचा बदला घेण्यासाठी हल्लेखोरांनी मंदारवर जीवघेणा हल्ला केला. मंदार हा शुभम चव्हाण खून प्रकरणातील आरोपी होता.

या प्रकरणात किती जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे?

मंदार किवळे याच्यावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी पोलिसांनी एकूण नऊ जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

भाऊ, Hitman is Back! रोहित शर्माच पुन्हा मुंबई इंडियन्सचा कर्णधार? MI च्या एका फोटोने सोशल मीडियावर धुमाकूळ

Repo Rate Update: 'महागाई रोखण्यासाठी रेपो दर...' ! गोखले संस्थेच्या विद्यार्थी समितीची शिफारस

Sankashti Chaturthi: संकष्टी चतुर्थीच्या दिवशी काय खावे आणि काय टाळावे, जाणून घ्या नियम

Fashion: पश्मीना शाल खरेदी करताय? जाणून घ्या तिचे वैशिष्ट्य, प्रकार आणि ओळखण्याच्या 'या' खास टिप्स

वाळू माफियांची मुजोरी! महसूल अधिकाऱ्याला रॉड अन् दांडक्याने बेदम मारहाण; नेमकं काय घडलं?