लोणावळामध्ये घरफोडी करुन लाखोंचा ऐवज चोरीला गेला असल्याची घटना (फोटो सौजन्य - iStock)  
क्राईम

Pune Crime News: चोरटे बंगल्यात शिरले अन् थेट 'ही' गोष्ट चोरून घेऊन गेले; कोथरूडमधली घटना

Kothrud Crime News: शुक्रवारी मध्यरात्री चोरटे सीमाभिंतीवरुन उडी मारुन बंगल्यात शिरले. चोरट्यांनी बंगल्यातील चंदनाचे झाड कटरचा वापर करुन चोरुन नेले.

तेजस भागवत

पुणे: कोथरूड भागातील एका बंगल्यात शिरलेल्या चोरट्यांनी चंदनाचे झाड कापून नेल्याची घटना घडली. याबाबत एका ज्येष्ठ नागरिकाने कोथरूड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोथरूड भागातील सोलारिस क्लबजवळ श्रीनिकेतन सोसायटीत तक्रारदारांचा बंगला आहे.

शुक्रवारी मध्यरात्री चोरटे सीमाभिंतीवरुन उडी मारुन बंगल्यात शिरले. चोरट्यांनी बंगल्यातील चंदनाचे झाड कटरचा वापर करुन चोरुन नेले. बंगल्याच्या आवारातून चंदनाचे झाड कापून नेल्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर तक्रारदाराने पोलिसांकडे तक्रार दिली. पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली असून, सीसीटीव्ही चित्रीकरण ताब्यात घेतले आहे. सहायक पोलीस निरीक्षक बालाजी सानप तपास करत आहेत.

पुण्यात चोरट्यांचा धुमाकूळ, तीन फ्लॅट फोडले

हडपसर परिसरातील रामटेकडी, मांजरी बुद्रुक आणि फुरसुंगी येथील बंद फ्लॅट फोडून चोरट्यांनी सोलापूर रोड भागात चांगलाच धुमाकूळ घातला आहे. चोरट्यांनी सोन्याचे व चांदीचे दागिने आणि रोख रक्कम असा सुमारे सव्वा तीन लाख रुपयांच्या किमती मुद्देमालाची चोरी केली आहे. याप्रकरणी संबंधित पोलिसांत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन तपास सुरू केला आहे. मात्र, चोरट्यांचा थांगपत्ता लागलेला नाही. सोलापूर रस्ता परिसरात सतत या घटना घडत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

वानवडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत रामटेकडी येथील प्रथमा बिल्डिंगमध्ये २९ मेच्या मध्यरात्री सव्वाबारा ते अडीचच्या सुमारास घरफोडी झाली. याप्रकरणी ३९ वर्षीय व्यक्तीने तक्रार दिली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, दोन अनोळखी व्यक्तींनी तक्रारदार आणि त्यांच्या शेजाऱ्यांच्या बंद फ्लॅटचे कुलूप चोरट्यांनी उचकटून आत प्रवेश केला. तसेच, ५४ हजार रुपयांचे रोख रक्कम व चांदीचे दागिने चोरून नेले.

झेरॉक्स दुकानातून सहा लाखांचे प्रिंटींग हेड चोरीला

जुन्या जिल्हा परिषदेच्या इमारतीशेजारी गॅलक्सी झेरॉक्सच्या दुकानात २८ मे रोजी पहाटे साडेतीन ते सव्वाचार या वेळेत चोरी झाली. याप्रकरणी ४७ वर्षीय व्यक्तीने समर्थ पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, चोरीची घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. एक अनोळखी व्यक्ती रिक्षामधून तक्रारदाराच्या दुकानाजवळ आली. त्यानंतर त्या व्यक्तीने शटरला लावलेली कुलुपे तोडली आणि दुकानातून चार महागडे प्रिंटींग हेड्स चोरून नेले.

पुण्यात भरदिवसा गोळीबार; शिवाजीनगर कोर्टाबाहेर घडला थरार, एकाचा मृत्यू

Astro Tips: गोड खाल्ल्यानंतर लगेच घराबाहेर का पडू नये? जाणून घ्या धार्मिक आणि ज्योतिषशास्त्रीय कारण

Student Death: OYO हॉटेलच्या खोलीत विद्यापीठाच्या विद्यार्थिनीचा संशयास्पद मृतदेह! नाका-तोंडातून येत होता फेस अन्...

India Launches Blenrep : रक्त कर्करोग उपचारात मोठी प्रगती! GSK कडून 'Blenrep' लाँच; मल्टिपल मायलोमा रुग्णांना मिळणार नवा पर्याय

Yavatmal News: यवतमाळ जिल्ह्यात रोजगाराचा प्रश्न गंभीर! १२,१०८ सूक्ष्म व लघु उद्योगांतून केवळ ७१ हजार जणांना रोजगार