Amruta Khanvilkar Launches Amulya: (फोटो सौजन्य-सोशलमीडिया) Amruta Khanvilkar Launches Amulya: (फोटो सौजन्य-सोशलमीडिया)
Entertainment

Amruta Khanvilkar Launches Amulya: अभिनयासोबत आता व्यवसायातही बाजी! अमृता खानविलकरची 'अमुल्य' साडी बॉलिवूडपर्यंत पोहोचली

अभिनेत्री अमृता खानविलकरने अभिनयासोबतच व्यवसाय क्षेत्रातही स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. 2026 मध्ये तिने 'अमुल्य बाय अमृता' हा साडी ब्रँड सुरू केला. बहिणीच्या लग्नासाठी अस्सल हातमागाच्या पैठणीचा शोध घेताना तिला विणकरांची कला आणि पारंपरिक कारागिरीची ओळख झाली.

Riddhi Vanne
  • अमृता खानविलकरची उद्योजक म्हणून नवी ओळख!

  • 'अमुल्य बाय अमृता' ब्रँडची बॉलिवूडमध्ये चर्चा.

  • माधुरी दीक्षितनेही परिधान केली अमुल्यची पैठणी!

Amruta Khanvilkar: भारताच्या लक्झरी मार्केटमध्ये अनेक कलाकार आता स्वतःचा व्यवसाय करताना दिसतायत. अभिनय आणि उद्योग या दोन्ही जबाबदाऱ्या सांभाळणारे इंडस्ट्रीत बरेच कलाकार आहेत. पण यातलं सगळ्यात जास्त लक्ष वेधून घेणारं आणि चर्चेत असलेलं नाव म्हणजे अभिनेत्री अमृता खानविलकर!

• शून्यातून ब्रँड उभारणारे कलाकार

नवीन उद्योजक पुढे येऊन नवे उद्योग सुरू करतायत आणि या उद्योगात नवी नजर घेऊन येतायत. काही कलाकार अगदी शून्यापासून ब्रँड उभारतायत आणि फॅशन, कापड आणि लाइफस्टाईल या क्षेत्रांमध्ये आज ते स्वतःची वेगळी ओळख बनवताना दिसतात.

• 'अमुल्य' ची सुरुवात कशी झाली?

2026 मध्ये अमृताने "अमुल्य बाय अमृता" सुरू केलं आणि अमुल्य हा ब्रँड सुरू होण्याआधीपासूनच तिचं या ब्रँडसोबत एक भावनिक नातं होतं. जवळपास बारा वर्षांपूर्वी, तिच्या बहिणीच्या लग्नाच्या वेळी, अमृताला जाणवलं की तिच्या घरातल्या कोणत्याच बाईकडे कधीही खरी हातमागाची पैठणी नव्हती.

• पैठणीच्या शोधातून सापडलं नवं जग

खऱ्या पैठण्यांच्या शोधातून सुरू झालेला प्रवास तिच्यासाठी विणकर, जुन्या कारागिरी आणि प्रत्येक साडीमागच्या गोष्टींच्या सुंदर जगाची ओळख ठरला. वैयक्तिक गोष्ट व्यवसायांना यशस्वी करते, कारण ती ब्रँडला त्याचा हेतू, खरेपणा आणि ओळख देते, असं तिला वाटतं. अमुल्य बाय अमृता मधून तिला सुंदर, खरी साड्या शोधण्याचा तोच अनुभव अजून जास्त बायकांपर्यंत पोहोचवायचा आहे विणकरांसोबत जवळून काम करून, त्यांची कला समजून घेऊन, आणि खास तरीही सहज परवडणारं कलेक्शन बनवून. अमुल्य ही अमृताची स्वतःची गोष्ट आहे, आणि ती तुमच्या गोष्टीचा भाग पण व्हावी, अशी तिची इच्छा आहे.

• बॉलिवूडमध्येही 'अमुल्य' ची चर्चा

अमुल्य बाय अमृताच्या साड्या या बॉलिवूडमध्ये पण चर्चेत आहेत. काही दिवसांपूर्वी धकधक गर्ल माधुरी दीक्षित यांनी कोण होणार करोडपती? साठी अमुल्यचा मराठी साज घातला होता. तर एकीकडे आगामी खूप चर्चेत असलेल्या ईठा या सिनेमासाठी अमृताचा हा मराठमोळा ब्रँड ऑफिशियल साडी ब्रँड ठरला.

रुपेरी पडदा गाजवून सोबतीला व्यवसायाच्या जगात स्वतःची अमुल्य ओळख अमृता बनवताना दिसतेय आणि येणाऱ्या काळात अमृता हा ब्रँड जगभर नक्कीच घेऊन जाईल यात शंका नाही!

Health tips: सतत जंक फूड खाताय? वेळीच व्हा सावध! शरीराला होऊ शकतात 'हे' गंभीर आजार

उत्तर प्रदेशात जागावाटपावरून काँग्रेस-समाजवादी पक्षात संघर्ष; अखिलेश यादवांचं 'ते' विधान चर्चेत

Mahabharat Katha: शिखंडी कोण होता? अंबाचा पुनर्जन्म आणि भीष्मांच्या पतनाची रंजक कथा जाणून घ्या

Gokul Milk Union Hearing : गोकुळ सत्तासंघर्षावर हायकोर्टात सुनावणी! न्यायालयाने महायुतीच्या वकिलांना सुनावले

Cairo Fire : कैरो रिंग रोडवर आगीचे तांडव! इंधन टँकर उलटून भीषण स्फोट; 31 जणांचा मृत्यू, अनेक वाहने जळून खाक