श्याम शरणम् दोन भाषांमध्ये होणार प्रदर्शित  हिंदी - गुजराती भाषेत प्रेक्षकांना पाहता येणार
Entertainment

Shyam Sharanam: श्रद्धा, आणि भक्तीचा भावस्पर्शी प्रवास उलगडणार ‘श्याम शरणम्’मधून! हिंदी-गुजरातीत होणार प्रदर्शित

Shyam Sharanam: श्माम शरणम् चित्रपटातून आता श्रद्धा, भक्तीचा भावस्पर्शी प्रवास उलगडणार असून हा आता हिंदी आणि गुजराती भाषेतूनही प्रदर्शित होणार आहे. २०२७ मध्ये होणार प्रदर्शित

दिपाली नाफडे
  • २०२७ मध्ये हिंदी आणि गुजराती भाषेत चित्रपट होणार प्रदर्शित!

  • श्माम शरणम् हिंदी - गुजराती भाषेत येणार 

  • श्रद्धा-भक्तीचा प्रवास उलगडणार 

Shyam Sharanam: काही नाती रक्ताची नसतात, ती श्रद्धेच्या धाग्यांनी जोडलेली असतात, काही प्रवास अंतराचे नसतात, ते विश्वासाच्या बळावर पूर्ण होतात आणि काही अनुभूती अशा असतात, ज्या शब्दांपलीकडे जाऊन थेट मनाला स्पर्श करतात. अशा अगाध श्रद्धेचा, भक्तीचा आणि बाबा श्याम यांच्या चरणी समर्पित भावविश्वाचा अनुभव प्रेक्षकांना देण्यासाठी ‘श्याम शरणम्’ हा हिंदी चित्रपट सज्ज होत आहे.

श्याम शरणम् आता दोन भाषांमध्ये पाहता येणार 

लाखो भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या बाबा श्याम यांच्या पावन जन्मोत्सवाच्या शुभमुहूर्तावर या चित्रपटाचे आकर्षक पोस्टर प्रकाशित करण्यात आले आहे. ‘श्री श्याम पिक्चर्स प्रॉडक्शन्स’ प्रस्तुत या चित्रपटाची निर्मिती संतोष पवार, आदेश पांडे आणि नितीन पोळ यांनी केली आहे. रमेश चौधरी चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहेत. या पोस्टर अनावरण  प्रसंगी मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष शक्तिसिंह चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती लाभली.

भक्ती-समर्पणाची झलक 

या पोस्टरमधून श्रद्धा, भक्ती आणि समर्पणाची एक सुंदर झलक पाहायला मिळते. प्रदर्शित झालेल्या पोस्टरमध्ये एका भक्ताचा हातात बाबा श्याम यांची पताका घेऊन सुरू असलेला प्रवास, मागे दिसणारे वाळवंट आणि आकाशात उमटलेले बाबा श्याम यांचे दिव्य स्वरूप लक्ष वेधून घेते. या दृश्यातून भक्तीच्या प्रवासातील श्रद्धा, संघर्ष आणि विश्वासाची अनुभूती मिळते.

‘हारे का सहारा... खाटू श्याम हमारा!’ या भक्तिभावाने ओतप्रोत असलेल्या चित्रपटातून असंख्य श्याम भक्तांच्या भावना, श्रद्धा आणि विश्वास मोठ्या पडद्यावर अनुभवायला मिळणार आहेत. हा केवळ एक चित्रपट नाही, तर प्रत्येक श्याम भक्ताच्या मनातील आस्थेला स्पर्श करणारी ही एक अनोखी सिनेमॅटिक अनुभूती ठरणार आहे.

२०२७ मध्ये होणार प्रदर्शित 

चित्रपटाची कथा मिलिंद खानविलकर यांची आहे. छायांकनाची (DOP) जबाबदारी सिद्धेश संतोष मोरे यांनी सांभाळली आहे, तर सहयोगी दिग्दर्शक म्हणून मनोज गडकर यांनी काम पाहिले आहे.विशेष म्हणजे, ‘श्याम शरणम्’ हा चित्रपट हिंदी आणि गुजराती या दोन भाषांमध्ये २०२७  चित्रपटगृहांत प्रदर्शित होणार आहे. बाबा श्याम यांच्या चरणी समर्पित भक्तीचा भाव… ‘श्याम शरणम्’चित्रपटाच्या माध्यमातून मोठ्या पडद्यावर अनुभवायला मिळणार आहे!

200MP कॅमेरा अन् नवीनतम स्नॅपड्रॅगन प्रोसेसर... Honor 5G स्मार्टफोनने वेधले सर्वांचे लक्ष; जाणून घ्या किंमत आणि इतर डिटेल्स

Konkan Tradition: सोनुर्लीच्या श्री देवी माऊलीची प्रसिद्ध लोटांगण जत्रा; जाणून घ्या अनोखी परंपरा आणि धार्मिक महत्त्व

Paach Futacha Bachchan: ‘पाच फुटाचा बच्चन’ आता घरबसल्या पाहता येणार, आला ॲमेझॉन प्राईम व्हिडीओवर

रात्री शोरमा खाल्ला अन् सकाळी थेट रुग्णालय गाठावं लागलं! भिवंडीत गर्भवती महिला व चिमुकल्यांसह १७ जणांना विषबाधा

Homemade Hair Oil: हिवाळ्यात केसांना द्या भरपूर पोषण! 'या' पदार्थांचा वापर करून बनवा खास घरगुती तेल, केस होतील मऊ