फोटो सौजन्य - Social Media  
Entertainment

Gaurav More : "फिल्टरपाडा ते पवई..." आठवण की मुळांची जाणीव? घराच्या 'त्या' पाटीवरून अखेर व्यक्त झाला गौरव मोरे!

अभिनेता गौरव मोरे सध्या पवईतील नव्या घरामुळे चर्चेत आहे. अनेक मराठी कलाकारांनी त्याच्या घरी भेट देत सोशल मीडियावर शुभेच्छा दिल्या.

दिवेश चव्हाण
  • गौरवच्या पवईतील नव्या घरी भेट देऊन सोशल मीडियावर त्याला शुभेच्छाही दिल्या
  • गौरवच्या दारावरील पाटीवर 'फिल्टरपाड्याचा बच्चन' असे लिहले आहे
  • भेट घेऊन त्याचे अभिनंदन केले

अभिनेता गौरव मोरे सध्या त्याच्या नव्या घरामुळे चर्चेत आहे. मराठी सिनेसृष्टीतील अनेक कलाकारांनी गौरवच्या पवईतील नव्या घरी भेट देऊन सोशल मीडियावर त्याला शुभेच्छाही दिल्या आहेत. अनेकांनी सोशल मीडियावर पोस्ट करत गौरवचे अभिनंदन केले आहे. अशामध्ये गौरवच्या दारावरची पाटी फार चर्चेत आली आहे. सहजा, या पाटीवर घरातील मालकाचे नाव असते किंवा कुटुंबियांचे नाव असते. पण गौरवच्या दारावरील पाटीवर 'फिल्टरपाड्याचा बच्चन' असे लिहले आहे. मुळात, फिल्टरपाड्याचा बच्चन हे नाव गौरवसाठी शोमध्ये वापरण्यात येतो. त्यातील फिल्टरपाडा म्हणजे पवईची ती वस्ती, जिथे गौरवचे बालपण गेले, जिथे गौरव लहानाचा मोठा झाला. मुळात, 'फिल्टरपाड्याचा बच्चन' हे गौरव मोरेचे टोपण नाव!

एका प्रसिद्ध वृत्तवाहिनेला दिलेल्या मुलाखतीत, गौरवने त्याच्या नवीन घराच्या पाटीवर लिहलेल्या नावामागचे कारण सांगितले आहे. त्याचे म्हणणे आहे की, "आता स्वतःचं घर झालंय या गोष्टीमुळे जर मी हवेत उडू लागलो, तर दारावरचं ते नाव मला पुन्हा जमिनीवर आणेल. मी ज्या वस्तीतून आलोय, त्या मुळांची जाणीव मला सदैव राहावी त्यामुळे मी दारावर ‘फिल्टरपाड्याचा बच्चन’ असं लिहून घेतलं आहे." हे सांगताना गौरवच्या डोळ्यात त्याच्या मुळांविषयी असलेले प्रेम आणि सार्थ अभिमान झळकून येत होते. पुढे गौरव म्हणतो की, "फिल्टरपाडा आणि पवई, दोघांमधील अंतर फक्त 1 ते दीड किलोमीटर आहे. तरी मला ते पार करण्यासाठी तीस वर्षांचा काळ लागला."

सोशल मीडियावर गौरव मोरेच्या चाहत्यांनी त्याला शुभेच्छा दिल्या आहेत, त्याची भेट घेऊन त्याचे अभिनंदन केले आहे. अनेक चाहत्यांनी 'आपलासा वाटणारा आपल्यातला कलाकार' अशी उपमा गौरव मोरेला दिली आहे.

गौरवने केले लग्न, कोण आहे पत्नी?

गौरवने लग्न केले आहे. प्रसिद्ध प्रियांका कारेकरसह तिने लग्नगाठ बांधली आहे. प्रियांका मनोरंजसृष्टी संबंधित आहे. तिने बॉलिवूडमधील अनेक दिगदर्शकांसह काम केले आहे. गौरवची खास मैत्रीण आणि सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्री ऋतुजा बागवेने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत गौरवच्या गुपचूप लग्नाबाबत खुलासा केला आहे तसेच अभिनंदन केले आहे.

Chandrapur News: ११ वर्षांनंतरही चंद्रपूर मेडिकल कॉलेज नव्या इमारतीत नाहीच; प्रतीक्षा संपणार कधी?

Silver Chain Astrology: गळ्यात चांदीची साखळी घालण्याचे काय आहेत फायदे, जाणून घ्या ज्योतिषशास्त्रीय महत्त्व

Millets: मिलेट्सचे प्रकार कोणते? जाणून घ्या 'या' पौष्टिक धान्यांपासून बनवता येणारे चविष्ट पदार्थ आणि त्यांचे फायदे!

लातूर जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदी धीरज देशमुख यांची बिनविरोध निवड; अविनाश जाधव उपाध्यक्षपदी

'बाबा ऐकत नाहीत…', शरद पवारांना अॅडमिट केल्यानंतर काय म्हणाल्या सुप्रिया सुळे?