हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणूक २०२२

हिमाचलमध्ये दुपारी ३ वाजेपर्यंत ५६ टक्के मतदान, लाहौल स्पीतीमध्ये सर्वाधिक मतदान

संपूर्ण हिमाचलमधून ४१२ उमेदवार रिंगणात आहेत. राज्यातील सुमारे ५६ लाख मतदार त्यांचे भवितव्य ठरवणार आहेत. यामध्ये २८ लाख ५४ हजार ९४५ पुरुष, २७ लाख ३७ हजार ८४५ महिला आणि ३८ तृतीय लिंग मतदार आहेत. ८ डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे.

Sunil Chavan

नवी दिल्ली - हिमाचलच्या ६८ विधानसभा जागांवर मतदान होत आहे. दुपारी ३ वाजेपर्यंत ५६ टक्के मतदान झाले आहे. लाहौल स्पितीमध्ये सर्वाधिक ६२.७५% मतदान झाले आहे. दुसऱ्या क्रमांकावर, सिरमौर जिल्ह्यात ६०.३८% मतदान झाले आहे. मुख्यमंत्री जयराम ठाकूर यांचा गृह जिल्हा मंडी आता ५८.९०% मतदानासह तिसऱ्या क्रमांकावर आहे. चंबा जिल्ह्यात सर्वात कमी ४६% मतदान झाले. सायंकाळी ५ वाजेपर्यंत मतदान सुरू राहणार आहे.

संपूर्ण हिमाचलमधून ४१२ उमेदवार रिंगणात आहेत. राज्यातील सुमारे ५६ लाख मतदार त्यांचे भवितव्य ठरवणार आहेत. यामध्ये २८ लाख ५४ हजार ९४५ पुरुष, २७ लाख ३७ हजार ८४५ महिला आणि ३८ तृतीय लिंग मतदार आहेत. ८ डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. २०१७ मध्ये राज्यात ७५.५७% मतदान झाले होते. मतदान संपल्यानंतर ईव्हीएम कडेकोट बंदोबस्तात स्ट्राँग रूममध्ये ठेवण्यात येणार आहे. या खोल्यांवर निमलष्करी दल आणि पोलीस कर्मचारी रात्रंदिवस पहारा ठेवणार आहेत. ८ डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे.

वाघोलीत भीषण अपघात; ३ जणांचा मृत्यू, जखमींचाही आकडा समोर

David Beckham : 'बाल विवाह' विरोधात आवाज उठवणाऱ्या आदिवासी तरुणीच्या कामगिरीचे डेविडकडून कौतुक

मराठी दिग्दर्शक सचिन धोत्रेचे सामाजिक पाऊल, 'मिरांडा वॉर्निंग' चित्रपटाचा संपूर्ण नफा दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी

Jhansi Liquor News : पोलिसांनी हातपंप चालवला अन् पाण्याऐवजी दारू वाहू लागली; व्हिडिओ व्हायरल

पहाटेच्या धुक्यात भीषण अपघात, राँग साईडने आलेल्या वाहनाची दुचाकीला धडक; दोन सुरक्षा रक्षकांचा मृत्यू