वृद्ध आई-वडिलांना सांभाळण्याबाबत दिल्ली उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय (फोटो - नवभारत) 
India

आई-वडील मुलांना संपत्तीतून करू शकतात का बेदखल? दिल्ली उच्च न्यायालयाने दिला महत्त्वपूर्ण निकाल

वृद्ध आई-वडिलांच्या मालमत्ता हक्कांबाबत दिल्ली उच्च न्यायालयाने महत्त्वपूर्ण निरीक्षण नोंदवले आहे. मुलांनी मारहाण किंवा छळ केल्याचे पुरावे सादर करण्याची अट न ठेवता ज्येष्ठ नागरिकांना मुलांना घरातून बाहेर काढता येऊ शकते.

प्रीति माने
  • वृद्ध पालकांच्या मालमत्ता हक्कांबाबत एक महत्त्वपूर्ण निकाल

  • दिल्ली हायकोर्टाने नोंदवले महत्त्वपूर्ण निर्देश

  • गैरवर्तन किंवा छळ सिद्ध करण्याची नसणार गरज

नवी दिल्ली : दिल्ली उच्च न्यायालयाने वृद्ध पालकांच्या मालमत्ता हक्कांबाबत एक महत्त्वपूर्ण निकाल दिला आहे. न्यायालयाने आई-वडिलांना मुलांनी दिलेल्या वाईट वागणुकीबद्दल काहीही सिद्ध न करता, त्यांना मालमत्तेतून वगळता येणार आहे. यापुढे जर एखाद्या वृद्ध व्यक्तीला त्यांच्या मुलांना मालमत्तेतून वगळायचे असेल, तर मुले मारहाण, गैरवर्तन किंवा छळ करत असल्याचे सिद्ध करून दाखवण्याची गरज नसणार आहे.

पालकांना त्यांच्या प्रॉपर्टीमध्ये सन्मानाने आणि शांततेने राहण्याचा हक्क आहे. न्यायमूर्ती अमित महाजन यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने एका ८५ वर्षीय व्यक्तीने दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी करताना हे निरीक्षण नोंदवले. विशेष म्हणजे, न्यायालयाने त्यांच्या मुलाला आणि सुनेला चार आठवड्यांच्या आत घर खाली करण्याचे आदेश दिले. एका ८५ वर्षीय व्यक्तीने आपला मुलगा आणि सून यांना घर खाली करण्याचा आदेश मिळावा यासाठी मागणी केली होती.

दक्षिण दिल्लीतील मस्जिद मोठ भागातील ही केस असून यामध्ये ८५ वर्षीय सुभाष चंदर मल्होत्रा ​​यांनी त्यांचा मोठा मुलगा, रमण मल्होत्रा, आणि सून यांना घरातून बाहेर काढण्यासाठी न्यायालयात धाव घेतली होती. त्या व्यक्तीचा आरोप होता की, वारंवार विनंती करूनही त्यांचा मुलगा आणि सून घर खाली करण्यास नकार देत होते.

शरद पवार गटाकडून तीन ओळींचा व्हीप जारी; संसदीय खासदारांना दिला 'हा' आदेश

पुढे त्यांचे कौटुंबिक संबंध आणखी बिघडले. याचिकाकर्त्यांनी पालक आणि ज्येष्ठ नागरिक देखभाल व कल्याण अधिनियम, २००७ अंतर्गत संबंधित अधिकाऱ्यांकडे मदत मागितली. मात्र मुलाने पालकांचा छळ केल्याचा पुरावा नसल्याचे कारण देत जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांची विनंती फेटाळून लावली. त्यानंतर विभागीय आयुक्तांनी हा निर्णय कायम ठेवला आहे.

संसदेचे एक दिवसीय विशेष अधिवेशन; पण कारण काय? किरेन रिजिजू यांची घोषणा

घरगुती हिंसाचाराचे पुरावे गोळा करणं अवघड - उच्च न्यायालय

दिल्ली उच्च न्यायालयाने, कनिष्ठ न्यायालयांचे निर्णय रद्द करताना म्हटले आहे की, वृद्ध व्यक्तींवरील अत्याचार अनेकदा घराच्या चार भिंतींच्या आतच घडतात. अशा प्रकरणांमध्ये, स्वतंत्र साक्षीदार किंवा ठोस पुरावे गोळा करणे शक्य नसते. त्यामुळे, केवळ अत्याचार सिद्ध करण्यात अपयश आल्याच्या आधारावर एखाद्या वृद्ध व्यक्तीला त्यांच्या मालमत्तेच्या हक्कांपासून वंचित ठेवता येणार नाही.

न्यायालयाने यावेळी स्पष्टपणे सांगितले की, एखाद्या ज्येष्ठ नागरिकाला त्यांच्या इच्छेविरुद्ध स्वतःच्याच घरात मुलांसोबत राहण्यास भाग पाडले जाऊ शकत नाही. ८५ वर्षांच्या वयात, याचिकाकर्तीला तिच्या स्वतःच्या घरात शांततेने आणि सन्मानाने राहण्याचा हक्क आहे.

Honda Avancier हायब्रिड SUV चे प्रोडक्शन सुरू; डिसेंबरमध्ये होणार लाँच, मिळणार नवीन AWD टेक्नोलॉजी

ओडिशातून तब्बल १ कोटी २५ लाखांचा गांजा पुण्यात आणण्याचा डाव फसला! स्टेट बँक कॉलनीत पोलिसांनी रचला सापळा!

भारतात सुरू होणार Apple चे सातवे अधिकृत रिटेल स्टोअर, कंपनीने केली या शहराची निवड

इन्स्टाग्रामवर मैत्री, गणपती दर्शनाच्या बहाण्याने तरुणीला बोलावले अन्...; पुण्यातील धक्कादायक प्रकार

Alpana art: अल्पना आर्टचा वाढतोय ट्रेंड! जाणून घ्या बंगालच्या या पारंपरिक कलेचे महत्त्व आणि खास वैशिष्ट्ये