India

निवडणूका जाहीर! हिमाचल प्रदेशात १२ नोव्हेंबरला मतदान, ८ डिसेंबरला निकाल

निवडणूक आयोगाने  (Election Commission Of India)शुक्रवारी हिमाचल प्रदेशमधील विधानसभा (Himachal Pradesh Legislative Assembly Election) निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या. हिमाचलमध्ये १२ नोव्हेंबरला मतदान होणार आहे. हिमाचलमध्ये एकाच टप्प्यात मतदान पूर्ण होईल.

Aparna

निवडणूक आयोगाने  (Election Commission Of India)शुक्रवारी हिमाचल प्रदेशमधील विधानसभा (Himachal Pradesh Legislative Assembly Election) निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या. हिमाचलमध्ये १२ नोव्हेंबरला मतदान होणार आहे. हिमाचलमध्ये एकाच टप्प्यात मतदान पूर्ण होईल.

मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, हिमाचलमधील निवडणुकीचे निकाल ८ डिसेंबर रोजी जाहीर केले जातील. तारखा जाहीर झाल्यानंतर हिमाचलमध्ये निवडणूक आचारसंहिता लागू झाली आहे. हिमाचल प्रदेशातील ६८ जागांसाठी मतदान होणार आहे. मुख्य निवडणूक आयुक्त म्हणाले की, निवडणूक आयोग मुक्त, निष्पक्ष आणि प्रलोभनमुक्त निवडणुका घेण्यासाठी कटिबद्ध आहे.

निवडणूक आयुक्तांनी सांगितले की, काही मतदान केंद्रे अशी असतील जी केवळ महिलाच चालवतील, जिथे १०० टक्के महिला कर्मचारी तैनात असतील. मुख्य निवडणूक आयुक्त म्हणाले की, हिमाचल प्रदेशातील लोकांनी मोठ्या संख्येने मतदान करावे जेणेकरून प्रत्येक बूथवर मतदार 'इंद्रधनुष्य' दिसेल.हिमाचल प्रदेशमध्ये शेवटची विधानसभा निवडणूक ९ नोव्हेंबर २०१७ रोजी झाली होती. हिमाचलमध्ये भाजपचे सरकार आहे. हिमाचल प्रदेशात प्रत्येक बूथवर मतदारांचे 'इंद्रधनुष्य' दिसावे यासाठी लोकांनी मोठ्या संख्येने मतदान करावे.

वाघोलीत भीषण अपघात; ३ जणांचा मृत्यू, जखमींचाही आकडा समोर

David Beckham : 'बाल विवाह' विरोधात आवाज उठवणाऱ्या आदिवासी तरुणीच्या कामगिरीचे डेविडकडून कौतुक

मराठी दिग्दर्शक सचिन धोत्रेचे सामाजिक पाऊल, 'मिरांडा वॉर्निंग' चित्रपटाचा संपूर्ण नफा दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी

Jhansi Liquor News : पोलिसांनी हातपंप चालवला अन् पाण्याऐवजी दारू वाहू लागली; व्हिडिओ व्हायरल

पहाटेच्या धुक्यात भीषण अपघात, राँग साईडने आलेल्या वाहनाची दुचाकीला धडक; दोन सुरक्षा रक्षकांचा मृत्यू