पंढरपूर नगरपालिकेचा सत्तासंघर्ष ऐन थंडीत 'हाय व्होल्टेज'; भावकीचे राजकारण सुरू (File Photo) 
India

आता पॅनकार्डप्रमाणेच मतदार ओळखपत्रही 'आधार'शी केले जाणार लिंक; निवडणूक आयोगाची तयारी सुरु

सध्या निवडणूक आयोग पॅन कार्डप्रमाणेच आता मतदार ओळखपत्राला आधारशी लिंक करण्याच्या योजनेवर गांभीर्याने काम करत आहे. या संदर्भात पुढील आठवड्यात निवडणूक आयोगाची एक महत्त्वाची बैठक होणार आहे.

कृपादान आवळे

नवी दिल्ली : भारतात सध्या पॅनकार्ड आधारकार्डशी लिंक करण्यात येत आहे. यापूर्वी देशातील लाखो नागरिकांनी हे लिंक केले आहे. त्यानुसार, निवडणूक पारदर्शकता वाढवण्याच्या उद्देशाने आता मतदार ओळखपत्र आधारशी लिंक करण्याच्या प्रक्रियेला गती दिली जाऊ शकते. या संदर्भात पुढील आठवड्यात निवडणूक आयोगाची एक महत्त्वाची बैठक होणार

सध्या निवडणूक आयोग पॅनकार्डप्रमाणेच आता मतदार ओळखपत्राला आधारशी लिंक करण्याच्या योजनेवर गांभीर्याने काम करत आहे. या संदर्भात पुढील आठवड्यात निवडणूक आयोगाची एक महत्त्वाची बैठक होणार असून, त्यात गृह मंत्रालय, कायदा मंत्रालय आणि आधार जारी करणारी संस्था यूआयडीएआय यांचे उच्चपदस्थ अधिकारी उपस्थित राहणार आहेत. बनावट मतदारांची ओळख पटवून मतदार यादी शुद्ध करणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे.

दरम्यान, सुधारणा केल्यानंतर निवडणूक आयोगाने मतदारांकडून स्वेच्छेने आधार क्रमांक गोळा करण्यास सुरुवात केली. मात्र, अद्यापपर्यंत निवडणूक आयोगाने आधार आणि मतदार ओळखपत्राचा डेटाबेस लिंक केलेला नाही. डुप्लिकेट मतदार नोंदणी ओळखून मतदार यादी शुद्ध करता यावी यासाठी ही प्रक्रिया सुरू करण्यात आली होती, परंतु आधारशी लिंक करणे अनिवार्य करण्यात आले नव्हते.

18 मार्च रोजी महत्त्वाची बैठक

18 मार्च रोजी मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार, निवडणूक आयुक्त सुखबीर सिंग संधू आणि निवडणूक आयुक्त विवेक जोशी या विषयावर केंद्रीय गृह सचिव गोविंद मोहन, सचिव राजीव मणी आणि यूआयडीएआयचे मुख्य कार्यकारी अधिकारी भुवनेश कुमार यांची भेट घेणार आहेत. त्यानंतर आता पॅनकार्डप्रमाणेच मतदार ओळखपत्रही 'आधार'शी करण्यावर चर्चा केली जाणार असल्याची माहिती दिली जात आहे.

MarMarathi Theatre News : ‘एक तिची गोष्ट’चा रौप्यमहोत्सवी टप्पा! २५ प्रयोग पूर्ण, पंकज त्रिपाठींकडून कौतुकाची थाप

फक्त 6 रुपयांत बेड गरम? Heated Blanket चा वीज वापर जाणून घ्या!

नाशिकमध्ये दुष्कळाची तीव्रता वाढली; २०१ गाव-वाड्यांना ६० टँकरने पाणीपुरवठा

Laxman Hake: 'पवार कुटुंबाचं राजकारण संपेल!' सुप्रिया सुळे यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या चर्चेवर लक्ष्मण हाके स्पष्टच बोलले

रुग्णालयातही मौल्यवान दागिने सुरक्षित नाहीत? कल्याणच्या वैष्णवी हॉस्पिटलमध्ये मंगळसूत्र चोरीला