ताज्या बातम्या

व्हॅट्सऍपवर सर्वात जास्त कोणाशी बोलता? या ट्रिकने सर्व रहस्ये उघडतील

व्हॅट्सऍपच्या या फीचरविषयी खूप कमी लोकांना कल्पना आहे. या फीचरमुळे तुम्हाला तुमच्या व्हॅट्सऍपच्या डेटाची संपूर्ण माहिती कळू शकते. (फोटो सौजन्य: istock)

नुपूर भगत

जगभरातील नामांकित कंपन्यांपैकी व्हाट्सऍप एक आहे. हे एक ऑनलाईन प्लॅटफॉर्म असून यावर जगभरातील लाखों ऍक्टिव्ह यूजर्स जोडलेले आहेत. व्हॅट्सऍपवर अनेक नवनवीन फीचर्स पुरवले जातात. कॉलिंगपासून ते स्टेटस ठेवण्यापर्यंत यूजर्स अशा अनेक गोष्टी इथे करून शकतात. कोणाशीही कोणत्याही कोपऱ्यात सहज बोलता यावे, यासाठी व्हाट्सऍप एक महत्त्वाचे माध्यम बनले आहे. व्हाट्सऍपवर असे अनेक फीचर्स आहेत, जे तुम्हाला माहितीही नसावेत. आज आम्ही तुम्हाला अशाच काही फीचर्सविषयी सांगणार आहोत.

आम्ही तुम्हाला अशा फीचरची माहिती सांगणार आहोत, ज्याद्वारे तुम्हाला कळेल की, तुम्ही व्हाट्सऍपवर सर्वात जास्त कोणाशी बोलता. एक तर याने तुम्हाला समजेल की, सर्वात जास्त कोणाशी बोलता आणि त्याचबरोबर एका कॉन्टॅक्टशी चॅट केल्यावर तुमच्या फोनचे स्टोरेज किती भरले जाते, याची कल्पना तुम्हाला येईल. याचा फायदा असा होईल की, तुमच्या फोनमध्ये किती अतिरिक्त निकामी गोष्टी आहेत ज्या तुम्ही हटवू शकता, ते तुम्हाला समजेल.

कशाप्रकारे शोध लागेल?

  • यासाठी सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या फोनमध्ये व्हॅट्सऍप ओपन करावे लागेल
  • आता वरच्या बाजूला जाऊन तीन डॉटवर क्लिक करा
  • तीन डॉट्सवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला ड्रॉप डाउन नावाचा मेनू दिसेल, तुम्हाला यावर क्लिक करायचे आहे
  • आता तुम्हाला इथे सेटिंग्ज दिसतील, या सेटिंग्जवर टॅप केल्यानंतर, तुम्हाला डेटा आणि स्टोरेज युजेसवर जावे लागेल
  • इथे गेल्यानंतर तुम्हाला काँटॅक्ट्स आणि ग्रुप्सची संपूर्ण लिस्ट शो होईल
  • इथे तुम्हाला मेसेज, काँटॅक्ट्स, फोटो, व्हिडिओ, ऑडिओ अशा सर्वच गोष्टींचे डिटेल्स दिसू लागतील
  • यासोबतच खाली उजवीकडे 'free up space' नावाचे ऑप्शन तुम्हाला दिसू लागेल
  • ऑप्शनच्या मदतीने तुम्ही तुमच्या फोनमधील अतिरिक्त डेटा हटवू शकता

व्हॅट्सऍपच्या या फीचरचा तुम्हाला खूप फायदा होऊ शकतो. फुल स्टोरेजमुळे स्मार्टफोनचा वेग कमी होत असतो, त्यामुळे व्हॅट्सऍपचा डेटा आणि स्टोरेज पर्याय वापरणे तुमच्यासाठी खूप उपयुक्त ठरू शकते.

Chandrapur News: ११ वर्षांनंतरही चंद्रपूर मेडिकल कॉलेज नव्या इमारतीत नाहीच; प्रतीक्षा संपणार कधी?

Silver Chain Astrology: गळ्यात चांदीची साखळी घालण्याचे काय आहेत फायदे, जाणून घ्या ज्योतिषशास्त्रीय महत्त्व

Millets: मिलेट्सचे प्रकार कोणते? जाणून घ्या 'या' पौष्टिक धान्यांपासून बनवता येणारे चविष्ट पदार्थ आणि त्यांचे फायदे!

लातूर जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदी धीरज देशमुख यांची बिनविरोध निवड; अविनाश जाधव उपाध्यक्षपदी

'बाबा ऐकत नाहीत…', शरद पवारांना अॅडमिट केल्यानंतर काय म्हणाल्या सुप्रिया सुळे?