ताज्या बातम्या

म्हणूनच शिक्षण सम्राट या नावाखाली लोक स्वत:चे खिसे भरत आहेत; बनावट पदवी प्रकरण उप्रचे उपमुख्यमंत्री मोर्य अडचणीत!

एक काळ असा होता की, वकिल-बॅरिस्टर आणि अभ्यासू लोकच राजकारणात सक्रिय होते. त्या काळात सभागृहात विधेयकांवर मुद्देसूद चर्चा होत होती. आता तर असे-असे मंत्री आहेत की, ज्यांची शैक्षणिक पात्रताही शंकास्पद आहे.

Navarashtra News Network

पुढारीपण करण्यासाठी शिक्षणाची आवश्यकता नाही. पुढाऱ्यांना जनतेला खोटी आश्‍वासने देऊन निवडणुकीत त्यांची मते मिळविण्याची कला अवगत असणे मात्र आवश्यक आहे. असे कितीतरी आमदार-खासदार आहेत की, त्यांना संसदेत सादर करण्यात येणाऱ्या बिधेयकांबाबत काहीही माहिती नसते किंबहुना त्यांनी ती विधेयके वाचलीसुद्धा नसतात. असे असतानाही ते पक्षाच्या धोरणानुसार त्या विधेयकाचे समर्थन किंवा विरोध करीत असतात.

त्या विधेयकात काय नमूद केले आहे, याची माहितीही या जनप्रतिनिधींना नसते. या विधेयकांचा मसुदा सरकारच्या निर्देशानुसार अनुभवी नोकरशहाच तयार करीत असतात. एक काळ असा होता की, वकिल-बॅरिस्ट आणि अभ्यासू लोकच राजकारणात सक्रिय होते. त्या काळात सभागृहात विधेयकांवर मुद्देसूद चर्चा होत होती. आता तर असे- असे मंत्री आहेत की, ज्यांची शैक्षणिक पात्रताही शंकास्पद आहे.

उत्तरप्रदेशचे उपमुख्यमंत्री केशवप्रसाद मौर्य यांच्या कथित बोगस पदवीबाबत प्राथमिक चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. अतिरिक्‍त मुख्य न्यायदंडाधिकाऱ्यांनी मौर्य यांच्या पदवीची चौकशी करण्याचे आदेश दिलेले आहे. हिंदी साहित्य संमेलन प्रयागने त्यांना दिलेली द्वितीय वर्षाची पदवी खरी आहे का, असा प्रश्‍न न्यायालयाने विचारला आहे.

चौकशीचा दुसरा मुद्दा असा आहे की, मौर्य यांनी निवडणुकीच्या वेळी जेव्हा उमेदवारी अर्ज सादर केला तेव्हा त्यांनी शपथपत्रात या कथित बोगस पदवीचा उल्लेख केला होता का? याबरोबरच न्यायालयाने उपमुख्यमंत्री मौर्य यांनी जेव्हा पेट्रोल पंपाचा परवाना मिळविला तेव्हा त्यांनी जे हायस्कूलचे प्रमाणपत्र सादर केले होते, ते बनावट होते का? याचीही चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

न्यायालयाने आठवडाभरात या प्रकरणाची चौकशी करून अहवाल सादर करण्यास सांगितले आहे. यापूर्वी सुद्धा केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्या शैक्षणिक पात्रतेचाही मुद्दा पुढे आला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्ली विद्यापीठातून उत्तीर्ण केलेल्या पदवी परीक्षेबाबतचा मुद्दाही गाजला होता. याप्रकरणी रेकॉर्ड तपासल्यानंतर कोणीतरी नरेंद्र महावीरप्रसाद मोदी यांनी या विद्यापीठातून पदवी परीक्षा पास केल्याचे स्पष्ट झाले.

Fake degree case Uttar Pradesh Deputy Chief Minister Keshav Prasad Maurya in trouble

वाघोलीत भीषण अपघात; ३ जणांचा मृत्यू, जखमींचाही आकडा समोर

David Beckham : 'बाल विवाह' विरोधात आवाज उठवणाऱ्या आदिवासी तरुणीच्या कामगिरीचे डेविडकडून कौतुक

मराठी दिग्दर्शक सचिन धोत्रेचे सामाजिक पाऊल, 'मिरांडा वॉर्निंग' चित्रपटाचा संपूर्ण नफा दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी

Jhansi Liquor News : पोलिसांनी हातपंप चालवला अन् पाण्याऐवजी दारू वाहू लागली; व्हिडिओ व्हायरल

पहाटेच्या धुक्यात भीषण अपघात, राँग साईडने आलेल्या वाहनाची दुचाकीला धडक; दोन सुरक्षा रक्षकांचा मृत्यू