ताज्या बातम्या

महाराष्ट्रात दारुच्या किंमती वाढणार, व्हॅटमध्ये ५ टक्क्यांपर्यंतची वाढ ; मद्यपींची नशा उतरणार

सर्व प्रकारच्या मद्यावरील व्हॅटचा दर ३५ टक्क्यांवरुन ४० टक्क्यांपर्यंत करण्यात आला आहे. देशी बनावटीच्या मद्याच्या उत्पादन शुल्कात निर्मिती मूल्याच्या २२० टक्के किंवा १८७ रुपये करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे मद्यावरील व्हॅटमध्ये ६० वरून ६५ टक्के इतकी वाढ करण्यात आली आहे.

Mayur Sawant

महाराष्ट्रात दारूच्या किंमती वाढणार असून मद्य प्रेमींसाठी हे अर्थसंकल्प धक्कादायक स्वरूपाचं ठरलं आहे. कोरोनाच्या संकटामुळे आणि अर्थव्यवस्थेला गती देण्यासाठी ही घोषणा राज्य सरकारकडून करण्यात आली आहे. दारूच्या किंमती वाढणार असून यामध्ये ५ टक्क्यांपर्यंतची वाढ होणार आहे. तसेच मद्यावरील मूल्यवर्धित करामध्ये सुद्धा वाढ करण्यात येणार आहे.

सर्व प्रकारच्या मद्यावरील व्हॅटचा दर ३५ टक्क्यांवरुन ४० टक्क्यांपर्यंत करण्यात आला आहे. देशी बनावटीच्या मद्याच्या उत्पादन शुल्कात निर्मिती मूल्याच्या २२० टक्के किंवा १८७ रुपये करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे मद्यावरील व्हॅटमध्ये ६० वरून ६५ टक्के इतकी वाढ करण्यात आली आहे.

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे संपूर्ण देशात लॉकडाऊन करण्यात आलं होतं. यामध्ये अनेक कारखाने, दुकाने आणि उद्योगधंदे बंद पडले होते. त्यामुळे राज्याची आर्थिक घडी प्रचंड प्रमाणात बिकट झाली होती. त्यामुळे अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी प्रथम वाईन शॉप सुरू करण्यात आले होते. परंतु उपमुख्यमंत्र्यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पातून दारूच्या किंमती वाढल्या असून मद्यपींची नशा चांगलीच उतरणार असल्याची चिन्हे दिसत आहेत.

वाघोलीत भीषण अपघात; ३ जणांचा मृत्यू, जखमींचाही आकडा समोर

David Beckham : 'बाल विवाह' विरोधात आवाज उठवणाऱ्या आदिवासी तरुणीच्या कामगिरीचे डेविडकडून कौतुक

मराठी दिग्दर्शक सचिन धोत्रेचे सामाजिक पाऊल, 'मिरांडा वॉर्निंग' चित्रपटाचा संपूर्ण नफा दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी

Jhansi Liquor News : पोलिसांनी हातपंप चालवला अन् पाण्याऐवजी दारू वाहू लागली; व्हिडिओ व्हायरल

पहाटेच्या धुक्यात भीषण अपघात, राँग साईडने आलेल्या वाहनाची दुचाकीला धडक; दोन सुरक्षा रक्षकांचा मृत्यू