ताज्या बातम्या

‘तुम्ही टप्प्यात आणून कार्यक्रम केलात’ जयंत पाटील यांनी केलं भारतीय हॉकी संघाचं अभिनंदन

ट्वीटरच्या माध्यमातून जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी भारतीय हॉकी संघाला आपल्या वेगळ्या शैलीत शुभेच्छा दिल्या आहेत. आपला राजकीय प्रतिस्पर्धी टप्प्यात आल्यावर त्याचा करेक्ट कार्यक्रम करण्याची मंत्री जयंत पाटील यांची राजकारणाची पध्दत प्रसिध्द आहे. आपल्या याच स्टाइलमध्ये त्यांनी “तुम्ही करेक्ट कार्यक्रम केलात” अशा शब्दात कौतुक केलं आहे.

Navarashtra Staff

तुम्ही टप्प्यात आणून कार्यक्रम केलात. अभिनंदन टीम इंडिया Indian Hockey Team अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील Jayant Patil यांनी भारतीय हॉकी संघाचे कौतुक केले आहे. आज ४१ वर्षाने हॉकी संघाला ऑलिंपिक स्पर्धेत Tokyo Olympics कांस्यपदक मिळवता आले आहे. हॉकी संघाने मिळवलेलं हे यश भारतीयांचा उर भरून आणणारे आहे. त्यामुळे संघावर कौतुकाचा वर्षांव केला जात आहे.

ट्वीटरच्या माध्यमातून जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी भारतीय हॉकी संघाला आपल्या वेगळ्या शैलीत शुभेच्छा दिल्या आहेत. आपला राजकीय प्रतिस्पर्धी टप्प्यात आल्यावर त्याचा करेक्ट कार्यक्रम करण्याची मंत्री जयंत पाटील यांची राजकारणाची पध्दत प्रसिध्द आहे. आपल्या याच स्टाइलमध्ये त्यांनी “तुम्ही करेक्ट कार्यक्रम केलात” अशा शब्दात कौतुक केलं आहे.

काय म्हटलंय ट्वीटमधे

“३-१ ने पिछाडीवर असूनही तुम्ही डोकं शांत ठेवले आणि टप्प्यात आल्यावर करेक्ट कार्यक्रम केलात. या जोरदार विजयाबद्दल अभिनंदन. तुमच्यामुळे 41 वर्षांनी ऑलिम्पिकमध्ये भारताला पदक मिळाले केले. अभिनंदन” अशा शब्दात पाटील यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.

“तुम्ही टप्प्यात कार्यक्रम केलात” जयंत पाटील यांचं ट्वीट

दरम्यान, जळगाव पालिका निवडणूक आणि सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेतील भाजपची सत्तापालटून तिथं राष्ट्रवादीचा झेंडा फडकवल्यामुळे जयंत पाटील यांचा ‘टप्प्यात आल्यावर करेक्ट कार्यक्र’ करण्याचा पॅटर्न चांगलाच गाजला होता.

वाघोलीत भीषण अपघात; ३ जणांचा मृत्यू, जखमींचाही आकडा समोर

David Beckham : 'बाल विवाह' विरोधात आवाज उठवणाऱ्या आदिवासी तरुणीच्या कामगिरीचे डेविडकडून कौतुक

मराठी दिग्दर्शक सचिन धोत्रेचे सामाजिक पाऊल, 'मिरांडा वॉर्निंग' चित्रपटाचा संपूर्ण नफा दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी

Jhansi Liquor News : पोलिसांनी हातपंप चालवला अन् पाण्याऐवजी दारू वाहू लागली; व्हिडिओ व्हायरल

पहाटेच्या धुक्यात भीषण अपघात, राँग साईडने आलेल्या वाहनाची दुचाकीला धडक; दोन सुरक्षा रक्षकांचा मृत्यू