ताज्या बातम्या

भारतासाठी दुःखद बातमी; विनोद कुमारला कांस्य पदक परत करण्याची वेळ

. वर्गीकरणादरम्यान खेळाडूंना त्यांचे प्रतिस्पर्धी ज्यांचा आजार किंवा त्रास एकसारखा असतो ते निवडण्याची संधी मिळते. याच दरम्यान विनोदच्या आजारावर प्रतिस्पर्धी खेळाडूंनी प्रश्न उचलले, ज्यामुळे चौकशीनंतर विनोदचं पदक अयोग्य ठरवण्यात आलं.

Navarashtra News Network

टोकियो, भारतासाठी एक निराशाजनक बातमी समोर आली आहे. टोक्यो पॅरालिम्पिकमध्ये भारताच्या विनोद कुमारने (Vinod Kumar) जिंकलेलं कांस्य पदक त्याला परत करावं लागणार आहे.   भारतीय खेळाडूंवर टोक्यो पॅरालिम्पिकमध्ये (Tokyo Paralympic 2020) पदकांचा अक्षरश: वर्षाव होत आहे. दोन दिवसांमध्ये भारताने बरीच पदकं खिशात घातली आहेत. पण यामध्ये काल थाळीफेक स्पर्धेत  विनोदला असणारा आजार हा वर्गीकरण निरीक्षणामध्ये ‘अयोग्य’ ठरवण्यात आला आहे.

आयोजकांनी दिलेल्या माहितीत सांगितले की, ‘पॅनल भारताचा थाळीफेकपटू विनोद कुमारला पॅरालिम्पिकमध्ये त्याच्या आजाराच्या पार्श्वभूमीवर पुरुषांच्या F52 थाळीफेक स्पर्धेत अयोग्य मानण्यात आले आहे. त्यामुळे त्याने जिंकलेले पदकही अयोग्य म्हणून करार दिले जात आहे.’

विनोद कुमारने पुरुषांच्या थाळीफेक स्पर्धेत भारताकडून 19.91 मीटर लांब थाळी फेकत हे तिसरं स्थान मिळवलं होतं. पण इतर प्रतिस्पर्धी खेळाडूंनी त्याला संबधित श्रेणीत समाविष्ट करण्यावर काही प्रश्न उचलले. ज्यामुळे त्याचं पदक होल्डवर ठेवण्यात आले होते. ज्यानंतर 30 ऑगस्ट रोजी सायंकाळी पदक वितरणादरम्यान हे पदक बाद म्हणून घोषित करण्यात आलं.

काय आहेत नियम आणि F52 स्पर्धा?

विनोद कुमार असलेल्या F52 स्पर्धेत सहभागी होणारे स्पर्धक यांच्या मांसपेशींमध्ये कमजोर असते. त्यांना अधिक हालचाली करता येत नाही. तसंच काहींच्या हातात, पायातही विकार असतो. तसंच ज्याच्या मणक्यात त्रास असतो, त्याचा एखादा शरीराचा भाग तुटलेला असतो असे खेळाडूही यामध्ये सहभाग घेतात. वर्गीकरणादरम्यान खेळाडूंना त्यांचे प्रतिस्पर्धी ज्यांचा आजार किंवा त्रास एकसारखा असतो ते निवडण्याची संधी मिळते. याच दरम्यान विनोदच्या आजारावर प्रतिस्पर्धी खेळाडूंनी प्रश्न उचलले, ज्यामुळे चौकशीनंतर विनोदचं पदक अयोग्य ठरवण्यात आलं.

वाघोलीत भीषण अपघात; ३ जणांचा मृत्यू, जखमींचाही आकडा समोर

David Beckham : 'बाल विवाह' विरोधात आवाज उठवणाऱ्या आदिवासी तरुणीच्या कामगिरीचे डेविडकडून कौतुक

मराठी दिग्दर्शक सचिन धोत्रेचे सामाजिक पाऊल, 'मिरांडा वॉर्निंग' चित्रपटाचा संपूर्ण नफा दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी

Jhansi Liquor News : पोलिसांनी हातपंप चालवला अन् पाण्याऐवजी दारू वाहू लागली; व्हिडिओ व्हायरल

पहाटेच्या धुक्यात भीषण अपघात, राँग साईडने आलेल्या वाहनाची दुचाकीला धडक; दोन सुरक्षा रक्षकांचा मृत्यू