चेन्नई: तामिळनाडूच्या राजकारणातील(Tamilnadu Politics) उत्तराधिकारी निश्चित झाला आहे. (Assembly election 2021)द्रमुकच्या स्टॅलिन यांची भुरळ तामिळनाडूच्या जनतेवर पडली आहे. स्टॅलिन यांच्या नेतृत्वात निवडणूक लढविलेली द्रमुक आघाडी तामिळनाडूत सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर आला आहे.
गेल्या विधानसभा निवडणुकांपेक्षा यावेळी द्रमुकला जास्त यश मिळताना दिसत आहे. गेल्या वेळीपेक्षा ३५ ते ४० जास्त जागा द्रमुकच्या पारड्यात पडल्या आहेत. एआयडीएमके आणि भाजपा युतीने राज्यात शंभरीचा आकडा गाठला आहे. दुसरीकडे पुद्दुचेरीमध्ये एआयएनआरसी आणि भाजपा युती सत्ता स्थापेल असे चित्र आहे.
करुणानिधी आणि जयललिता यांच्या राजकारणाचा काही दशके तामिळनाडूच्या राजकारणावर पगडा होता. या दोन्ही नेत्यांच्या मृत्यूनंतर, पहिल्यांदाच मोठ्या नेतृत्वाशिवाय होणारी ही पहिलीच निवडणूक होती. या परिस्थितीत या राज्यव्यापी नेतृत्वाची जागा कोण भरुन काढणार, याकडे सगळ्या देशाचे लक्ष होते.
करुणानिधी यांचे पुत्र स्टॅलिन यांनी आपणच उत्तराधिकारी असल्याचे दाखवून दिले आहे. स्टॅलिन यांच्याबरोबरच एआयडीएमचे पलानीस्वाम, एनटीकेचेसीमनस एमएनएमचे कमल हासन आणि एएमएमकेचे टीटीव्ही दिनाकरण हेही मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत होते.
अण्णा द्रमुकला पराभवाचा फटका
एकूण २३४ जागा असलेल्या तामिळनाडू विधानसभेत २०१६ साली एआयडीएमकेने १३४ जागांवर विजय मिळविला होता. त्यावेळी सलग दुसऱ्यांदा जयललिता यांच्या गळ्यात मुख्यमंत्रीपदाची माळ पडली होती.तर करुणानिधी यांच्या नेतृत्वात निवडणूक रिंगणात असलेल्या डेमकेचा केवळ ९८ जागांवर समाधान मानावे लागले होते. ५ डिसेंबर २०१६ रोजी जयललिता यांचे निधन झाले. त्यानंतर ओ पनीरसेल्वम यांना मुख्यमंत्रीपदाची खुर्ची मिळाली. मात्र ७३ दिवसच ते या पदावर राहू शकले. १६ डिसेंबंर २०१७ रोजी पलानीस्वामी हे राज्याचे मुख्यमंत्री झाले. त्यानंतंर एयाडीएमकेची कमान पलानीस्वामी यांच्याकडे होती.