ताज्या बातम्या

'ना खाऊंगा, ना खाने दूँगा'लाच फासला जातोय हरताळ; नोएडा ॲथॉरिटीज नव्हे, तर सर्वच सरकारी विभागाची हीच परिस्थिती

एक काळ असा होता की, भ्रष्टाचाऱ्यांकडे घृणित नजरेने पाहिले जात होते. तेव्हा कोण किती श्रीमंत किंबा पैसेवाला आहे, हे बघून त्यांचा सन्मान केला जात नव्हता, तर ती व्यक्ती किती चारित्र्यवान आहे, हे बघूनच त्यांना सन्मान मिळत होता.

Navarashtra News Network

काळाबरोबर आता जीवनमूल्येही बदललेली आहेत. आता पैसेवाल्यांचा सर्वत्र सन्मान होतो. मग ती संपती त्या व्यक्तीने कशी मिळविली हेसुद्धा बघितले जात नाही. काळे धंदे करणारे किंबहुना चुकीच्या मार्गाने संपती मिळविणाऱ्यांना प्रतिष्ठित समजल्या जाऊ लागले. यात समाधानाची बाब अशी आहे की, आपल्या देशातील न्यायपालिका देशातील प्रसिद्ध उद्योगपतींना त्यांच्या चुकीच्या आचरणाबद्दल न्यायालयाच्या कटघऱ्यामध्ये उभे करते.

सर्वोच्च न्यायालयाने नुकतेच ट्विन टॉवर एक्स्प्रेस आणि सियानप्रकरणी सुनावणी करताना नोएडा ॲथॉरिटीवर जोरदार ताशेरे ओढले आहे. सर्वोच्च न्यायालयाने नोएडा ॲथॉरिटीला सर्वात भ्रष्ट म्हटले आहे. केवळ नोएडा ॲथॉरिटीच नाही तर सरकारच्या कोणत्याही-विभागाची सध्या अशीच परिस्थिती आहे. विकासाबरोबर भ्रष्टाचाराने हातमिळवणी केलेली आहे. सरकारच्या प्रत्येक विभागात अगदी खालपासून तर वरपर्यंत भ्रष्टाचार बोकाळलेला आहे.

रस्तेबांधणी, पूल बांधणे किंबहुना सरकारच्या सर्वच उपक्रमामध्ये काळी कमाई करण्याची संधी शोधली जाते. काही मोजके लोक काळी कमाई करतात तर याचा विपरीत परिणाम जनतेला भोगावा लागतो. इ.स. २०१४ मध्ये अलाहाबाद उच्च न्यायालयाने एका याचिकेवर सुनावणी करताना एपेक्स आणि सियान टॉवरचे बांधकाम करणार्‍या नोएडा ॲथॉरिटीच्या अधिकार्‍यांवर खटला दाखल करण्याचे आदेश दिले होते.

उच्च न्यायालयाने ४० मजली टॉवर पाडण्याचाही आदेश दिला होता. या आदेशाला सुपरटेक, नोएडा ॲथॉरिटी आणि काही फ्लॅटधारकांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. न्यायालयाने सर्व पक्षकारांचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर यावरील निर्णय राखून ठेवला आहे.

This is the situation of all government departments not the Noida authorities

वाघोलीत भीषण अपघात; ३ जणांचा मृत्यू, जखमींचाही आकडा समोर

David Beckham : 'बाल विवाह' विरोधात आवाज उठवणाऱ्या आदिवासी तरुणीच्या कामगिरीचे डेविडकडून कौतुक

मराठी दिग्दर्शक सचिन धोत्रेचे सामाजिक पाऊल, 'मिरांडा वॉर्निंग' चित्रपटाचा संपूर्ण नफा दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी

Jhansi Liquor News : पोलिसांनी हातपंप चालवला अन् पाण्याऐवजी दारू वाहू लागली; व्हिडिओ व्हायरल

पहाटेच्या धुक्यात भीषण अपघात, राँग साईडने आलेल्या वाहनाची दुचाकीला धडक; दोन सुरक्षा रक्षकांचा मृत्यू