ताज्या बातम्या

कोरोना आणि भारतातील लसीकरणाची परिस्थिती

भारतात ३० जानेवारी २०२० रोजी केरळात कोरोनाचा पहिला रुग्ण आढळला होता. त्यानंतर दिल्ली, पुणे, बंगळरु असे करत-करत अख्या भारतात कोरोनाचे रुग्ण सापडत गेले, आणि २२ मार्च २०२० पासून देशात टाळेबंदीची घोषणा करण्याती आली होती. कोरोनावर औषध, कोणती लस प्रभावी ठरेल यासाठी जगातील वैज्ञानिक रात्रदिवस संशोधन करु लागले होते. भारतात सुद्धा कोरोनाच्या विषाणूवर औषध म्हणून काय प्रभावी ठरेल याचा शोध, संशोधन वैज्ञानिक, आरोग्यतज्ज्ञ, डॉक्टर करु लागले. आणि अखेर भारतात कोरोनावर प्रभावी औषध म्हणून पुण्यातील सिरम संस्थेकडून “कोव्हिशिल्ड” या पहिल्या लसीची निर्मिती करण्यात आली. आणि देशात जल्लोष करण्यात आला. भारताने अनेक देशांना मोफत लस निर्यात करुन, जगात भारताचे नाव रोशन केले आहे, तसेच लस निर्मितीचा देश अशी आपली आता जगात ओळख झाली आहे.

Amrut Sutar

कोरोनाचे उगमस्थान म्हणून चीनकडे पाहिले जाते. डिसेंबर २०१९ मध्ये चीनच्या ‘वुहान’ शहरात कोरोनाचा पहिला रुग्ण आढळला, आणि अख्या जगाने धास्ती घेतली. भारतात ३० जानेवारी २०२० रोजी केरळात कोरोनाचा पहिला रुगण आढळला होता. त्यानंतर दिल्ली, पुणे, बंगळरु असे करत अख्या भारतात कोरोनाचे रुग्ण सापडत गेले, आणि २२ मार्च २०२० पासून देशात टाळेबंदीची घोषणा करण्याती आली होती. कोरोनावर औषध, कोणती लस प्रभावी ठरेल यासाठी जगातील वैज्ञानिक रात्रदिवस संशोधन करु लागले होते. जगातील अनेक देशात कोरोनाच्या विषाणूवर औषध म्हणून लसीची निर्मित करण्यात आली.

भारतात तब्बल नऊ महिन्यांनतर म्हणजे १६ जानेवारी २०२१ रोजी कोरोनावर पहिली लस देण्यात आली. तेव्हापासून आजपर्यंत देशात लसीकरण सुरु आहे. कोरोनामुळं भीतीच्या वातावरणाखाली जगणारे लोकांना या लसीमुळं हायसे वाटले. परंतु कोरोनाची महामारी आणि लसीकरणासारखे मोठे आव्हान असताना, अनेकांनी मात्र याचे राजकारण केल्याचे दिसून आले. परंतु देशाची लोकसंख्या पाहता देशातील लसीकरणाचा वेग समाधानकारक आहे, लसीकरणामुळं आता आपण सर्व काही हळूहळू खुले करत असून, सकारात्मक पाऊल टाकत आहोत. आरोग्याची काळजी घेत, कोरोना लसीच्या बाबतीत मोठं ‘सीमोल्लंघन’ आपण करत आहोत. मागील ९-१० महिन्यात देशात लसीकरण कशा प्रकारे सुरु आहे? लस घेतल्याने कोरोना होत नाही का? आतापर्यंत देशात आणि राज्यात किती टक्के लसीकरण झाले आहे, याचा आपण मागोवा घेणार आहोत.

भारतात कोरोनाचा शिरकाव

कोरोनाच्या जागतिक महामारीमुळं जगातील अर्थव्यवस्थेवर परिणाम झाला. कोरोनाच्या थैमानाने करोडो लोकांचे जीव गेले. जगातील सर्व क्षेत्राला फटका आणि आर्थिक नुकसान सहन करावे लागले. उपासमारीमुळं अनेकांचे जीव गेले. कित्येकांनी आत्महत्या केल्या. डिसेंबर २०१९ मध्ये चीनच्या ‘वुहान’ शहरात कोरोनाचा पहिला रुग्ण आढळला होता, आणि अख्या जगाने धास्ती घेतली. कोरोनामुळं जगाची घबराट उडाली. ज्या कोरोनाची भारताला भीती होती, त्या कोरोनाने भारताले गाठलेच. भारतात ३० जानेवारी २०२० रोजी केरळात कोरोनाचा पहिला रुग्ण आढळला होता. त्यानंतर दिल्ली, पुणे, बंगळरु असे करत-करत अख्या भारतात कोरोनाचे रुग्ण सापडत गेले, आणि २२ मार्च २०२० पासून देशात टाळेबंदीची घोषणा करण्याती आली होती. कोरोनावर औषध, कोणती लस प्रभावी ठरेल यासाठी जगातील वैज्ञानिक रात्रदिवस संशोधन करु लागले होते. भारतात सुद्धा कोरोनाच्या विषाणूवर औषध म्हणून काय प्रभावी ठरेल याचा शोध, संशोधन वैज्ञानिक, आरोग्यतज्ज्ञ, डॉक्टर करु लागले. आणि अखेर भारतात कोरोनावर प्रभावी औषध म्हणून पुण्यातील सिरम संस्थेकडून “कोव्हिशिल्ड” या पहिल्या लसीची निर्मिती करण्यात आली. आणि देशात जल्लोष करण्यात आला.

९ महिन्यानंतर देशात लसीकरणाला सुरुवात

प्रत्येक भारतीय ज्याची उत्कंठतेने वाट पाहतोय त्या कोरोना प्रतिबंधक “कोव्हिशिल्ड” लसीची देशातील पहिली मानवी चाचणी पुण्यात झाली. देशाच्या वैद्यकीय क्षेत्रातील ही एतिहासिक घटना पुण्यातील भारती हॉस्पिटलमध्ये घडली. २ जानेवारी २०२१ रोजी देशभरात कोरोना लशीची ड्राय रन झाली. त्यानंतर सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाच्या ‘कोव्हिशिल्ड’ आणि भारत बायोटेकच्या ‘कोव्हॅक्सिन’ला आपात्कालीन वापरासाठी परवानगी देण्यात आली. ३ जानेवारी रोजी ड्रग्ज कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाने भारतात दोन कोरोनाविरोधी लशींना मंजुरी दिली. सीरम इन्स्टिट्यूट आणि भारत बायोटेकच्या कोव्हिड-१९ विरोधी लशीला आपात्कालीन वापराची परवानगी देण्यात आली. भारत बायोटेकची 'कोव्हॅक्सिन' ही भारतात तयार झालेली पहिली कोरोनाविरोधी स्वदेशी लस आहे. 'कोव्हॅक्सीन' ला भारतात आपात्कालीन परवानगी मिळाल्यानंतर ड्रग्ज कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाच्या निर्णयावर अनेकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलं.

कॉँग्रेससोबतच देशातील एका मोठ्या गटाने ही लस प्रभावी आहे का? यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. 'कोव्हॅक्सीन'ची तिसऱ्या टप्प्यातील चाचणी अजूनही पूर्ण झालेली नाही. त्याचे निष्कर्ष येणं बाकी आहे. तरीही देशात या लशीच्या वापरची परवानगी का देण्यात आली? असा प्रश्न उपस्थित करण्यात आला होता. या सर्व अडचणीवर मात करत “देशात १६ जानेवारी २०२१ पासून लसीकरणाला सुरुवात झाली” त्यानंतर देशात सर्वात आधी कोणाला लस मिळणार? याची उत्सुकता होती. सर्वांत आधी अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना लस देण्यात आली. "डॉक्टर, सरकारी, महापालिका कर्मचारी, फ्रंटलाइनवर कोव्हिडविरोधी लढ्यात उतरलेले अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना पहिल्यांदा ही लस दिली गेली. तसेच ५० वर्षांवरील आणि इतर आजारांनी ग्रस्त लोकांना ही पहिल्या टप्प्यात लस देण्यात आली. लसीचा पहिला किंवा दोन्ही डोस घेणाऱ्यांमध्ये कोरोनाविरूद्ध रोगप्रतिकार शक्ती वाढते असे बर्‍याच संशोधनात दिसून आले आहे. अशा परिस्थितीत सरकार सर्वच लोकांना लस घेण्यास प्रवृत्त करत आहे.

लसीचे परिणाम आणि प्रभाव

लस घेतल्यानंतर नागरिकांना काही इतर लक्षणं जाणवू शकतात. पण याविषयी सर्वांना स्पष्ट माहिती न दिल्यास त्याचा या मोहिमेवर परिणाम होऊ शकतो, असं तज्ज्ञांनी म्हटले आहे. भारतात लस घेतल्यानंतर त्याचे इतर परिणाम आढळल्याचे २३ हजार प्रकरण समोर आली आहेत. त्यामध्ये बहुतांश प्रकरणं ही थकवा, अशक्तपणा, किंचित ताप तसंच पाय दुखणं वगैरे स्वरुपाची होती. त्याशिवाय अनेकांना विपरीत लक्षणं दिसून आली आहेत. तर लस घेऊनसुद्धा ४८८ लोकांचे मृत्यू गेल्याचे जून महिन्यापर्यंत आढळून आले होते. पण केंद्र सरकारने हे मृत्यू लसीकरणामुळे झाले नसल्याचं म्हटले होते. लस घेतल्यानंतरही मृत्यू होण्याचं प्रमाण नगण्य आहे. त्यापेक्षा कितीतरी पटींनी जास्त धोका कोरोनामुळे मृत्यू होण्याचा आहे, असं केंद्र सरकारचं म्हणणं आहे. त्याचबरोबर अजूनही लहान मुलांचं लसीकरण ही समस्या आहे. या पातळीवरही लहान मुलांचं लसीकरणबाबत निर्णय होण्याची गरज आहे, तातडीची गरज आहे. कारण तिसरी लाटेची सुद्धा शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. तसेच लसीकरण केले तरी तिसरा डोस गरजेचा ठरण्याची शक्यता सुद्धा आहे असं तज्ज्ञांनी म्हटले आहे.

जितक्या जास्त लोकांपर्यंत ही लस पोहोचेल. तितक्या जास्त लोकांमध्ये हर्ड इम्युनिटी तयार होईल. कोरोनाविरोधी लशीचं संशोधन आणि चाचणीचा कालावधी ९-१० महिन्यांचा आहे. त्यामुळे याच्या सुरक्षिततेवर कोणतचं प्रश्नचिन्ह नाही. लशीचा बराच कालावधी उलटून गेल्यानंतर काय परिणाम होतो. हे तपासणं अजूनही बाकी आहे. लशीचा परिणाम काही वर्षांनंतर कळू लागतो. तज्ज्ञांच्या म्हणणानुसार 'सर्व लशींची सुरक्षितता चांगली आहे. लस घेतल्यानंतर थोडा ताप, लस घेतलेल्या जागी सूज येणं किंवा डोकेदुखी अशी लक्षणं दिसून येतात. कोणतीही लस ५०  टक्के प्रभावी असेल तर, ती लस फायदेशीर असं समजलं जातं. तसेच 'लस घेतल्यानंतर पुन्हा कोरोना होण्याची शक्यता फार कमी आहे'. असं तज्ज्ञांनी म्हटले आहे.‘कोव्हिशिल्ड’ लसीमुळं भारताचे नाव जगातजगात भारताने विक्रमी लसीकरण केले आहे, तसेच अधिक गतीने कोरोनावर लसीची निर्मिती करण्यात सुद्धा भारत अग्रेसर आहे. स्वत:च्या देशाबरोबर दुसऱ्या देशाला सुद्धा भारताने लसी निर्यात केली आहे, त्यामुळं भारताचे नाव जगात रोशन झाले आहे. पुण्यातील ‘सिरम संस्थेने’ निर्मित केलेली ‘कोव्हिशिल्ड’ हि लस अनेक देशांना विनामूल्य निर्यात केली आहे. तसेच भारताच्या सिरम या संस्थेच्या स्वस्त लसींमुळे आत्ता जगात भारताचं नाव मोठं झालं आहे. अविकसित देशांसाठी लस पुरविणारा देश अशी आपली आता जगात ओळख झाली आहे, आणि हेच खरे आपण ‘सीमोल्लंघन’ केले आहे. तसेच कमीतकमी दरात, प्रभावी लसनिर्मिती करणारा देश अशी ओळख भारताची निर्माण झालीये. जी आत्मनिर्भर भारतासाठी गरजेची आणि महत्त्वाची आहे. यामुळं भारताला एक वेगळा आत्मविश्वास मिळाला आहे.

लसीकरणावरुन न्यायालयाने केंद्राला सुनावले२०२१ या वर्षाच्या अखेरपर्यंत देशातील सर्व नागरिकांचं लसीकरण पूर्ण होण्याची आशा केंद्र सरकारनं सर्वोच्च न्यायालयात व्यक्त केली होती. लसीच्या पुरवठ्यावरून राज्य आणि केंद्रात समन्वयाचा अभाव, लसीकरण धोरण, लसीकरणाची गती आणि लसींच्या वेगवेगळ्या किंमतींवरून केंद्र सरकारला सध्या मोठ्या टीकेला सामोरं जावं लागलं होत. यावर, केंद्रानं यंदाच्या वर्षात देशभरातील नागरिकांचं लसीकरण पूर्ण होण्याची शक्यता व्यक्त केलीय. केंद्राकडून राज्यांना ४५ वर्षांवरील नागरिकांसाठी १०० टक्के लस पुरवली जात असेल तर १८ ते ४४ या वयोगटासाठी केवळ ५० टक्केच का पुरवठा केला जातोय? असा प्रश्न सर्वोच्च न्यायालयानं उपस्थित केला होता. '४५ वर्षांवरील नागरिकांसाठी केंद्राकडून संपूर्ण लस खरेदी केली जातेय. परंतु, १८ ते ४४ या वयोगटासाठी मात्र विभागणी करण्यात आलीय. लस निर्मात्यांकडून राज्यांना ५० टक्के लस पुरवली जातेय, किंमती केंद्राकडून निश्चित केल्या जात आहेत. तसंच खासगी रुग्णालयांनाही लसी पुरवल्या जात आहेत, याला काय अर्थ आहे?' असा सवाल न्यायालयानं केंद्राला विचारलाय. केंद्राच्या म्हणण्यानुसार, ४५ वर्षांहून अधिक वयोगटात मृत्यूदर अधिक आहे परंतु, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत या वयोगटाला अधिक धोका दिसून आला नाही. तर १८ ते ४४ वयोगटातील लोक अधिक संकटात आहेत. सर्व नागरिकांना लस उपलब्ध व्हावी हे लक्ष्य असेल तर, केंद्र सरकारकडून केवळ ४५ वर्षांवरील नागरिकांसाठीच लस खरेदी का केली जातेय?, असा प्रश्न विचारत न्यायालयानं केंद्राला विचारला होता. आणि लसीकरणावरुन न्यायालयाने नाराजी व्यक्त केली होती. तसेच दुसऱ्या लाटेत आरोग्यसेवेतील त्रुटी आणि समस्या तसेच दुसऱ्या लाटेत लसीकरणापासून दुर्लक्षित राहिल्याने अनेकांना जीव गमवावा लागला होता असं सुद्धा न्यायालयाने नमूद केलंय, तसेच कोरोनामुळं बेरोजगारी वाढल्याचं सुद्धा न्यायालयाने म्हटलं होतं.ग्रामीण भागातील लसीकरणन्यायालयानं केंद्राच्या डिजिटल लसीकरणावरही टीका केली होती. लसीकरणासाठी कोविन प्लॅटफॉर्मवर नोंदणीची अनिवार्यता केल्यामुळे गावांतील लसीकरणाच्या प्रयत्नांवर परिणाम होण्याची शक्यताही न्यायालयानं व्यक्त केली होती. 'सर्वांना कोविन अॅपवर रजिस्टर करावं लागणार आहे. परंतु, गावातील सर्व लोक स्वत:हून कोविन अॅपवर नोंदणी करू शकतील, का? असाही सवाल न्यायालयानं केंद्राला विचारला होता, ग्रामीण भागात अनेक तांत्रिक अडचणी असतात, त्यामुळं गाव खेड्यात लसीकरण कसे होईल याबद्दल न्यायालयाने चिंता व्यक्त केली होती. राज्यात १ मेपासून १८ ते ४४ वर्षे वयोगटातील लाभार्थ्यांना लसीकरणाला सुरुवात झाली होती. त्यामुळं लसीकरण नोंदणीसाठी शहरी भागात अनेक सुविधा आहेत, विविध ठिकाणी केंद्र आहेत, परंतू ग्रामीण भागातील लसीकरण कसे होणार याबाबत न्यायालयाने प्रश्न उपस्थित केला होता.भारतातील लसीकरणाची स्थितीदेशातील अवाढव्य लोकसंख्या पाहता, लसीकरणाचा वेग समाधानकारक असल्याचे बोलले जात आहे. भारतात सध्या ३ कंपन्यांच्या लशी देण्यात येत आहेत. ऑक्सफोर्ड-अॅस्ट्राझेन्काने संयुक्तपणे बनवलेली कोव्हिशिल्ड, भारत बायोटेकची कोव्हॅक्सिन तर रशियात बनलेली स्पुटनिक-व्ही या लशींचा त्यात समावेश आहे. १६ जानेवारी २०२१ पासून  सप्टेंबर २०२१ पर्यंत देशात सुमारे ६८ कोटी ६० लाख जणांना कोरोना लस देण्यात आली आहे. ऑगस्ट महिन्यात प्रतिदिन ६० लाख नागरिकांना लस देण्यात आली. जुलैमध्ये हेच प्रमाण सरासरी ४३ लाख इतकं होतं.तज्ज्ञांच्या मते, केंद्र सरकारने निर्धारित केलेल्या उद्दिष्टापर्यंत पोहोचण्यासाठी भारतात प्रतिदिन १ कोटी जणांना लस दिली जाणं आवश्यक आहे, तसंच आगामी काळात लशीबाबत उदासीनता, उपलब्धता यावरही काही गोष्टी अवलंबून आहेत. भारतातील कोरोना रुग्णांची संख्या गेल्या काही दिवसांपासून घटली आहे. देशात आता प्रतिदिन ४० हजारपेक्षाही कमी नवे रुग्ण आढळून येतात. गेल्या महिन्यात बहुतांश रुग्ण केरळ राज्यातूनच आढळून येत होते. सध्या देशभरातील बहुतांस ठिकाणं पुन्हा अनलॉक करण्यात आल्याने येत्या काही दिवसांत कोरोनाची तिसरी लाट पाहायला मिळू शकते, असा इशारा तज्ज्ञांनी दिला आहे. सध्या लसीकरण वेगाने होत असलं तरी यामध्ये लैंगिक विषमताही दिसून येते. देशात महिलांचं पुरुषांच्या तुलनेत ६ टक्क्यांनी कमी लसीकरण झाल्याचं आकडेवारीतून दिसतं. सध्या ग्रामीण भागातही मोठ्या संख्येने लसीकरण होत असलं तरी शहरी भागाच्या तुलनेत ते कमीच आहे. ग्रामीण भागात नागरिकांची लसीप्रति कमी जागरुकता आणि उदासीनता असल्यानेच असं चित्र आहे, हे वास्तव आहे. भारत हा जगातील सर्वात मोठा लस उत्पादक देश मानला जातो. दरम्यान, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे या मोहिमेत किंचित बाधा निर्माण झाली. जून महिन्यात केंद्र सरकारने सुप्रीम कोर्टासमोर याविषयी आपलं म्हणणं मांडलं. ऑगस्ट ते डिसेंबर या काळात १३५ कोटी लशी उपलब्ध केल्या जातील, असं सरकारने म्हटलं. त्यामुळं आगामी काळात जास्तीत जास्त लसीकरण करणं सरकारसमोर आव्हान आहे. लसीकरणावरुन राजकारण्यांनी राजकारण, आरोप प्रत्यारोप केल्याचे सुद्धा आपण पाहिले.महाराष्ट्रातील लसीकरणाची सध्या परिस्थितीमहाराष्ट्राची ११ करोडपेक्षा अधिक लोकसंख्या आहे, देशात मागील दिड दोन वर्षात राज्यात आणि मुंबईत कोरोनाचे सर्वांधिक रुग्ण होते. परंतु आता राज्यात लसीकरण मोठ्या प्रमाणात झाले आहे, एकिकडे राज्यातील कोरोनाची परिस्थिती हाताळण्यास राज्य सरकार अपयशी ठरत असल्याचे वारंवार भाजपा नेते ठासून सांगत असताना, दुसरीकडे लसीकरणावरुन राजकारण झाल्याचे सुद्धा मोठ्या प्रमाणात झाल्याचे पाहयला मिळाले. राज्यात सध्या म्हणजे ८ ऑक्टोबर २०२१ पर्यंत ८ करोड़ ६४ लाख ३० हजार २०९१ जणांचे लसीकरण झाल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी माहिती दिली आहे. लसीकरणाच्या बाबतीत देशातील इतर जिल्ह्यांच्या तुलनेत महाराष्ट्र आघाडीवर आहे. आगस्ट, सप्टेबंर महिन्यात राज्यात विक्रमी लसीकरण झाले आहे. त्यामुळं राज्यातील कोरोनाची परिस्थिती आणि कोरोना रुग्ण पाहता, लसीकरण समाधानकारण झाल्याचे बोलले जात आहे. त्यामुळं भारताची लोकसंख्या पाहता, ज्याप्रमाणे लसीकरणाचा वेग आहे, तो समाधानकारक आहे, तसेच सध्या कोरोना रुग्णांच सुद्धा कमी असल्यामुळं आपण सर्व काही खुले होत आहे, सध्या लसीकरणामुळं बराच सकारात्मक बदल झाला आहे, त्यामुळं अधिकाधिक लसीकरणामुळं कोरोनाच्या संकटावर मोठं “सीमोल्लंघन” करत आहोत. आणि भविष्यात सुद्धा करत राहू यात शंका नाही.

वाघोलीत भीषण अपघात; ३ जणांचा मृत्यू, जखमींचाही आकडा समोर

David Beckham : 'बाल विवाह' विरोधात आवाज उठवणाऱ्या आदिवासी तरुणीच्या कामगिरीचे डेविडकडून कौतुक

मराठी दिग्दर्शक सचिन धोत्रेचे सामाजिक पाऊल, 'मिरांडा वॉर्निंग' चित्रपटाचा संपूर्ण नफा दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी

Jhansi Liquor News : पोलिसांनी हातपंप चालवला अन् पाण्याऐवजी दारू वाहू लागली; व्हिडिओ व्हायरल

पहाटेच्या धुक्यात भीषण अपघात, राँग साईडने आलेल्या वाहनाची दुचाकीला धडक; दोन सुरक्षा रक्षकांचा मृत्यू