ताज्या बातम्या

पश्चिम बंगाल निवडणुकीचा निकाल मोठ्या मनाने स्वीकार करा, रडीचा डाव खेळू नका - शरद पवारांनी व्यक्त केला संताप

पश्चिम बंगालमधील नंदीग्राम मतदारसंघात ममता बॅनर्जी आधी विजयी झाल्याचे जाहीर करण्यात आले होते. मात्र कालांतराने त्या हरल्याचे जाहीर करण्यात आले. यावर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार(sharad pawar) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

साधना

संपूर्ण देशाचं लक्ष लागलेल्या पश्चिम बंगालमध्ये(West Bengal Election 2021) तृणमूल काँग्रेसने ऐतिहासिक विजय मिळवला आहे. तृणमूल काँग्रेसने २०० हून अधिक जागा मिळवत स्पष्ट बहुमत मिळवलं आहे. तर दुसरीकडे कडवं आव्हान देत जोरदार प्रचार केलेल्या भाजपाच्या हाती मोठी निराशा आली आहे.

भाजपाची शंभरी पूर्ण करतानाही दमछाक झाली आहे. अद्याप निवडणुकीच्या अधिकृत निकालाची घोषणा झालेली नाही, मात्र ममता बॅनर्जी यांनी विजयाची हॅटट्रिक साधल्याचं चित्र स्पष्ट आहे. मात्र पश्चिम बंगालमधील नंदीग्राम मतदारसंघात ममता बॅनर्जी आधी विजयी झाल्याचे जाहीर करण्यात आले होते. मात्र कालांतराने त्या हरल्याचे जाहीर करण्यात आले. यावर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

शरद पवार यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, “बंगालच्या मतदारांनी भरभरून ममतांना पाठींबा दिला आणि सबंध देशाच्या सत्तेला पराभूत केलं. हा निकाल मोठ्या मनाने स्वीकारायला हवा होता. पण ज्या पद्धतीने तिथे जे चाललंय याला 'रडीचा डाव' एवढंच म्हणता येईल.”

वाघोलीत भीषण अपघात; ३ जणांचा मृत्यू, जखमींचाही आकडा समोर

David Beckham : 'बाल विवाह' विरोधात आवाज उठवणाऱ्या आदिवासी तरुणीच्या कामगिरीचे डेविडकडून कौतुक

मराठी दिग्दर्शक सचिन धोत्रेचे सामाजिक पाऊल, 'मिरांडा वॉर्निंग' चित्रपटाचा संपूर्ण नफा दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी

Jhansi Liquor News : पोलिसांनी हातपंप चालवला अन् पाण्याऐवजी दारू वाहू लागली; व्हिडिओ व्हायरल

पहाटेच्या धुक्यात भीषण अपघात, राँग साईडने आलेल्या वाहनाची दुचाकीला धडक; दोन सुरक्षा रक्षकांचा मृत्यू