लाइफ स्टाइल

'या' रक्षाबंधनला करा भावासाठी 'कलाकंद' खास रेसिपी; अगदी झटपट

Rashmi Dongre

दोन दिवसांवर रक्षाबंधनचा सण आला आहे. भावा-बहिणीच्या नात्याला कायमस्वरूपी गोड आठवणीत बांधून ठेवणारा या सणाला काही गोड पदार्थ तुम्ही घरीच तयार करु शकता. जर तुम्ही वर्किंग महिला असाल तर तुम्हाला वेळेच गणित बऱ्याचवेळा जमत नाही किंवा या सणादिवशी काही पदार्थ करण्यासाठी वेळ मिळत नाही. अशावेळी झटपट तयार होणारी कलाकंद मिठाई तुम्ही बनवू शकता.

साहित्य

  • २५० ग्रॅम पनीर
  • २ मोठे चमचे
  • १ मोठा चमचा मिल्क पावडर
  • अर्धा चमचा इलायची पावडर
  • कापलेले पिस्ताचे तुकडे
  • गुलाबाची पाने

कृती

  • २५० ग्रॅम पनीरला एकत्र मिक्स करुन वाटून घ्या.
  • यानंतर पॅन गरम करुन त्यात २ मोठे चमचे साखर आणि पनीर टाकून भाजून घ्या.
  • पाच मिनीटांपर्यंत गरम होईपर्यंत या मिश्रणाला भाजून घ्या.
  • आता वरून एक मोठा चमचा मिल्क पावडर टाकून मिश्रण परतत रहा.
  • पाच मिनीटांनंतर या मिश्रणात इलायची पावडर टाकून हलवत रहा.
  • हे सर्व पदार्थ एकमेकांत चांगले एकत्रित झाले की, एका प्लेटमध्ये काढून घ्या.
  • यानंतर या मिश्रणाला वरून कापलेले पिस्ताचे तुकडे आणि गुलाबाच्या पानांनी सजवून घ्या.
  • थंड झाले की हे कलंकद खाण्यासाठी तयार आहेत.

वाघोलीत भीषण अपघात; ३ जणांचा मृत्यू, जखमींचाही आकडा समोर

David Beckham : 'बाल विवाह' विरोधात आवाज उठवणाऱ्या आदिवासी तरुणीच्या कामगिरीचे डेविडकडून कौतुक

मराठी दिग्दर्शक सचिन धोत्रेचे सामाजिक पाऊल, 'मिरांडा वॉर्निंग' चित्रपटाचा संपूर्ण नफा दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी

Jhansi Liquor News : पोलिसांनी हातपंप चालवला अन् पाण्याऐवजी दारू वाहू लागली; व्हिडिओ व्हायरल

पहाटेच्या धुक्यात भीषण अपघात, राँग साईडने आलेल्या वाहनाची दुचाकीला धडक; दोन सुरक्षा रक्षकांचा मृत्यू