वर्षअखेरची Best Trip! 'पोर्ट ब्लेअर, हॅवलॉक, नील आयलंड...'; IRCTC ने पर्यटकांसाठी जाहीर केले 'हे' खास पॅकेज ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया)  
लाइफ स्टाइल

वर्षअखेरची Best Trip! 'पोर्ट ब्लेअर, हॅवलॉक, नील आयलंड...'; IRCTC ने पर्यटकांसाठी जाहीर केले 'हे' खास पॅकेज

Andaman Tour Package : IRCTCने डिसेंबर 2025 साठी एक खास अंदमान टूर पॅकेज लाँच केले आहे. याद्वारे तुम्हाला पोर्ट ब्लेअरमधील प्रमुख पर्यटन स्थळे पाहण्याची संधी मिळेल.

हर्षदा पाटोळे
  • IRCTC ने डिसेंबर 2025 साठी 6 रात्री–7 दिवसांचे खास ‘अंदमान टूर पॅकेज’ लाँच केले.

  • लखनऊहून सुरू होणाऱ्या या टूरमध्ये फ्लाइट, 3-स्टार हॉटेल, प्रमुख बीच व आयलंड्सचा समावेश.

  • पोर्ट ब्लेअर, हॅवलॉक, नील आयलंडवरील लोकप्रिय पर्यटन स्थळे एका पॅकेजमध्ये अनुभवण्याची संधी.

Andaman Tour Package : डिसेंबर हा महिनाच प्रवासाचा. वर्षभराच्या धावपळीचा थकवा घालवण्यासाठी बरेच जण समुद्रकिनाऱ्यांच्या सहलीला ( Trip) प्राधान्य देतात. आणि याच प्रवासप्रेमींसाठी आयआरसीटीसीने (IRCTC) एक भन्नाट भेट जाहीर केली आहे अंदमानचे निसर्गरम्य सौंदर्य अनुभवण्यासाठी खास टूर पॅकेज! स्वच्छ निळे पाणी, स्वर्गासारखे बीच, ऐतिहासिक स्थळे आणि अप्रतिम बेटांचे सौंदर्य… हे सर्व एका प्रवासात पाहण्याची ही उत्तम संधी आहे.

 डिसेंबर 2025 साठी खास ‘अंदमान टूर पॅकेज’

आयआरसीटीसीने डिसेंबर 2025 मध्ये 'अंदमान टूर पॅकेज' लाँच करताच प्रवासप्रेमींमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. हे विशेष पॅकेज 2 डिसेंबर 2025 ते 8 डिसेंबर 2025 दरम्यान उपलब्ध असून, 6 रात्री आणि 7 दिवसांचा अविस्मरणीय प्रवास देणार आहे. याची सुरुवात उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊ येथून होणार आहे. समुद्रकिनारी सुट्टीची योजना आखणाऱ्या परिवारांसाठी, कपल्ससाठी, सोलो ट्रॅव्हलर्स आणि साहसप्रेमींसाठी हे पॅकेज अगदी योग्य आहे. वर्षाच्या अखेरीस स्वतःला ‘मे-टाइम’ देण्यासाठी आणि 2026 ला नवीन उर्जेसह सुरुवात करण्याचा हा सर्वोत्तम मार्ग ठरू शकतो.

पॅकेजमध्ये काय मिळणार?

फ्लाइटसह सोयीस्कर प्रवास

या टूर पॅकेजमध्ये लखनऊ–पोर्ट ब्लेअर–लखनऊ असा रिटर्न एअरफेअर समाविष्ट आहे. म्हणजे प्रवासातील गुंतागुंत किंवा वेगळ्या बुकिंगची चिंता करावी लागणार नाही.

3-स्टार हॉटेलमध्ये आरामदायी मुक्काम

पूरे प्रवासात तुम्हाला आरामदायी आणि सुरक्षित मुक्कामाची व्यवस्था देण्यात आली आहे. कुटुंबासह पर्यटनासाठी हे हॉटेल्स अगदी योग्य.

स्वादिष्ट भोजनाची सोय

ब्रेकफास्ट आणि डिनरसह भोजनाची सोय असल्याने प्रवासादरम्यान कोणतीही अडचण राहणार नाही.

 या पॅकेजमध्ये कोणती ठिकाणे पाहायला मिळतील?

अंदमान म्हणजे स्वर्ग! आणि IRCTC या स्वर्गाचे सर्वात सुंदर तुकडे तुम्हाला दाखवणार आहे.

1. पोर्ट ब्लेअर

  • सेल्युलर जेल – स्वातंत्र्यसंग्रामाच्या आठवणी जपणारे ऐतिहासिक ठिकाण

  • लाईट अँड साउंड शो – स्वातंत्र्यवीरांच्या कहाण्या उजळवणारा अनुभव

  • कॉर्बिन कोव्ह बीच – वॉटर स्पोर्ट्ससाठी प्रसिद्ध

2. रॉस आयलंड

ब्रिटिशकालीन इमारतींचे अवशेष, हिरवाई आणि समुद्र यांचे अनोखे मिश्रण पाहायला मिळेल.

3. नॉर्थ बे आयलंड

स्कुबा डायव्हिंग आणि कोरल रीफ पाहण्यासाठी हे ठिकाण पर्यटकांचे आवडते.

4. हॅवलॉक आयलंड

  • राधानगर बीच – आशियातील सर्वात सुंदर बीचपैकी एक

  • काला पत्थर बीच – शांतता आणि फोटोग्राफी प्रेमींसाठी स्वर्ग

5. नील आयलंड

  • लखमनपूर बीच – सुर्यास्त पाहण्यासाठी परिपूर्ण

  • भरतपूर बीच – वॉटर अॅक्टिव्हिटी आणि कोरल व्ह्यू साठी प्रसिद्ध

 डिसेंबरमध्ये अंदमान का?

डिसेंबर हा अंदमानमध्ये पर्यटनाचा सर्वोत्तम काळ मानला जातो.

  • निसर्ग खुलून येतो

  • पाण्याचा रंग निळा-पारदर्शक

  • हवामान आल्हाददायक

  • बीच अॅक्टिव्हिटीजसाठी योग्य वातावरण

म्हणूनच, वर्षाअखेरची ही सुंदर सहल तुमच्या आठवणीत कायम राहील.

 हाच योग्य वेळ : सुवर्णसंधी गमावू नका!

अंदमानचे मोहक समुद्रकिनारे, घनदाट हिरवाई असलेली बेटं आणि भारताच्या स्वातंत्र्यलढ्याचे साक्षीदार असलेली ऐतिहासिक स्थळे… हे सर्व एका प्रवासात पाहणे म्हणजे स्वप्नच. IRCTC ने दिलेली ही सुवर्णसंधी तुमचा वर्षाअखेरचा आनंद द्विगुणित करू शकते.

💡Frequently Asked Questions

Que: IRCTCचे अंदमान टूर पॅकेज किती दिवसांचे आहे?
Ans: हे पॅकेज 6 रात्री आणि 7 दिवसांचे आहे.

Que: टूर पॅकेजमध्ये फ्लाइट आणि हॉटेलचा समावेश आहे का?
Ans: होय, रिटर्न फ्लाइट आणि 3-स्टार हॉटेल मुक्काम समाविष्ट आहे.

Que: पॅकेज कोणत्या तारखांना उपलब्ध आहे?
Ans: 2 डिसेंबर ते 8 डिसेंबर 2025 या कालावधीत.

NCP Sharad Pawar : शरद पवारांच्या राष्ट्रवादी महिला आघाडीत मोठी खांदेपालट, दोन महिला नेत्यांवर महत्त्वाची जबाबदारी

अल निनोचा धोका, दुष्काळाचे संकट! बदलत्या हवामानानुसार शेतीचे नियोजन करा; केंद्रीय राज्यमंत्री प्रताप जाधवांचे आवाहन

शिवाजी पार्क आंदोलन भोवलं! अभिजीत दीपके, आशुतोष रांका, सौरव दासविरोधात LOC जारी; मुंबई पोलिसांच्या कारवाईने खळबळ

धुक्याचा कहर रोखण्यासाठी वाशिम पोलीस अलर्ट! महामार्गावर गस्त अन् विशेष उपाययोजना, वाहनचालकांना सतर्कतेचे आवाहन

Bopdeo Ghat Accident प्रकरणात मोठी बातमी; चालकाला कोर्टाने थेट...; वाचा सविस्तर