लाइफ स्टाइल

पानवर नैवेद्यची मांडणी 'या' प्रकारे करावी

Rashmi Dongre

नैवेद्याचं पान वाढायची योग्य पद्धत जाणून घेणार आहोत. तसेच हे पान देवासमोर कसे ठेवावे याचे नियमही आपण पाहणार आहोत. श्रावण महिना म्हणजे व्रत वैकल्यांचा महिना. अशावेळी सणाच्या निमित्ताने देवाला नैवद्य दाखवण्याची पद्धत आहेच. मुळात नैवैद्य म्हणजे काय तर.. देवाला “निवेदनीय” असे जे द्रव्य म्हणजे नैवेद्य. ईश्वराला अर्पण करता येण्यासारखी, त्याला देण्यासारखी खाद्य वस्तू, म्हणजे नैवेद्य. आपणही नैवेद्याला पाच किंवा त्याहून अधिक प्रकार हौशीने बनवता असाल पण त्याची मांडणी सुद्धा योग्य करणे आवश्यक आहे.

ताटाच्या निमुळत्या बाजूला म्हणजेच टोकाला उजवीकडे पुरी, पुरणपोळी असे पदार्थ तर डावीकडे लिंबू, मीठ, लोणचे, चटणी असे तोंडीलावणीचे पदार्थ ठेवावेत. मध्यभागी डावीकडे गोडाचा पदार्थ म्हणजेच खीर, गुलाबजाम (जे काही बनवलेले असेल ते) ठेवावे. तर उजव्या बाजूस दोन प्रकारच्या भाज्या ठेवतात, यात एक रस्सा भाजी व एक सुकी भाजी समाविष्ट असते. तर पानाच्या पसरट बाजूस उजवीकडे वरण भात, मसालेभात, ठेवला जातो तर डावीकडे तळलेले पदार्थ म्हणजे पापड, कुर्डई ठेवली जाते.

अनेक कुटुंबांमध्ये प्रथा वेगवेगळी असू शकते मात्र यात एक महत्त्वाचे शास्त्र म्हणजे जे पदार्थ अधिक प्रमाणात खायचे आहेत ते उजव्या बाजूस ठेवावे जेणेकरून सहज खाता येईल आणि जे तोंडलावणीचे पदार्थ आहेत ते डावीकडे ठेवावेत ज्यामुळे ते अधून मधून खाल्ले जातील.

वाघोलीत भीषण अपघात; ३ जणांचा मृत्यू, जखमींचाही आकडा समोर

David Beckham : 'बाल विवाह' विरोधात आवाज उठवणाऱ्या आदिवासी तरुणीच्या कामगिरीचे डेविडकडून कौतुक

मराठी दिग्दर्शक सचिन धोत्रेचे सामाजिक पाऊल, 'मिरांडा वॉर्निंग' चित्रपटाचा संपूर्ण नफा दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी

Jhansi Liquor News : पोलिसांनी हातपंप चालवला अन् पाण्याऐवजी दारू वाहू लागली; व्हिडिओ व्हायरल

पहाटेच्या धुक्यात भीषण अपघात, राँग साईडने आलेल्या वाहनाची दुचाकीला धडक; दोन सुरक्षा रक्षकांचा मृत्यू