(फोटो सौजन्य: Pinterest) (फोटो सौजन्य: Instagram) (फोटो सौजन्य: X)  
लाइफ स्टाइल

Navratri 2026 : नवरात्रीच्या उपवासात काही चटकदार खाण्याची इच्छा होतेय? मग अशाप्रकारे बनवा 'उपवासाची चाट'

Farali Chaat Recipe : नवरात्रीच्या उपवासात जर तुम्हाला काही टेस्टी आणि चटपटीत खायची इच्छा होत असेल तर उपवासाची चाट तुमच्यासाठी चांगला पर्याय ठरेल. याची रेसिपी नोट करा.

नुपूर भगत
  • नवरात्रीत काही टेस्टी खायचंय का?
  • मग उपवासाची टेस्टी चाट बनवून खा.
  • ही चाट संध्याकाळच्या नाश्त्यासाठी परफेक्ट ठरेल.

नवरात्रोत्सवाला सुरुवात झाली असून १९ ऑक्टोबर रोजी नवरात्रीचा शेवटचा दिवस साजरा केला जाणार आहे. तसेच २० ऑक्टोबर हा दिवस दसरा म्हणून साजरा केला जाणार आहे. नवरात्रीत अनेक लोक मोठ्या श्रद्धेने उपवास करतात. पण नऊ दिवस फक्त उपवासाचे काही निवडक पदार्थ खाल्ल्याने जेवणाचा कंटाळा येऊ लागते, तसेच मन तृप्त होत नाही. तेच तेच उपवासाचे पदार्थ खाऊन जर तुम्हालाही कंटाळा आला असेल तर आजची रेसिपी तुमच्यासाठी खास ठरणार आहे. आज आपण या लेखात उपवासाची टेस्टी आणि चटपटीत चाट कशी तयार करायची याची एक सोपी रेसिपी जाणून घेणार आहोत. चाट हा पदार्थ लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांच्याच आवडीचा. अशात पदार्थाला थोडा ट्विस्ट देऊन आपण एक अशी चाट तयार करणार आहोत जी उपवासाच्या दिवशीही खाल्ली जाऊ शकते. चला यासाठी लागणारे साहित्य आणि कृती जाणून घेऊया.

साहित्य

  • ४ कच्चे बटाटे
  • ४ मोठे चमचे राजगिऱ्याचे पीठ
  • अर्धा छोटा चमचा सैंधव मीठ
  • ३ हिरव्या मिरच्या
  • २ इंच आले
  • अर्धा कप कोथिंबीर
  • २ मोठे चमचे दही

सजावटीचे साहित्य

  • पुदीना
  • दही
  • हिरवी चटणी
  • सैंधव मीठ
  • भाजलेल्या जिऱ्याची पूड
  • डाळिंब
  • कोथिंबीर
  • फराळी चिवडा

कृती

  • उपवासाची चाट तयार करण्यासाठी सर्वप्रथम बटाट्यांना कुकरमध्ये टाकून ४-५ शिट्ट्या करुन घ्या.
  • बटाट्यांना कुकरमधून काढून त्याच्या साली काढा.
  • आता बटाट्यांना चांगल मॅश करुन त्यात राजगिऱ्याचे पीठ आणि चवीनुसार घालून मिक्स करा.
  • तयार मिश्रणाला टिक्कीचा आकार देत तेल किंवा तूपात यांना छान कुरकरीत तळून घ्या.
  • आता हिरवी चटणी तयार करण्यासाठी हिरव्या मिरच्या, पुदीना, आले, कोथिंबीर, सैंधव मीठ आणि दही मिक्सरला बारीक वाटून घ्या.
  • एका प्लेटमध्ये तयार कुरकरीत टिक्कीचे तुकडे पसरवा.
  • यावर दही, पुदीना चटणी, भाजलेल्या जिऱ्याची पूड आणि फराळी चिवडा घालून चाटची चांगली सजावट करा.
  • शेवटी डाळींबाचे दाणे वरुन घालून चाटला फायनल टच द्या.

Todays Gold-Silver Price: मुंबई, पुणे, नाशिकसह प्रमुख शहरांत सोन्याचे दर काय? एका क्लिकवर जाणून घ्या 22 आणि 24 कॅरेटचा भाव

Numberlogy: मूलांक ४ असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस कसा राहील जाणून घ्या

तुकाराम मुंढेंचा FDA च्या सहाय्यक आयुक्तालाच दणका; निष्काळजीपणामुळे थेट निलंबितच केलं

Delimitation Bill : फेररचनेनंतर लोकसभेतील सदस्यसंख्या 273 ने वाढणार; एकूण संख्या 543 वरून 816 वर जाणार

Gajakesari Raja Yoga: ३० नोव्हेंबरला तयार होणार गजकेसरी योग, सिंह आणि कर्क राशीसह या राशींच्या लोकांना होणार फायदा